Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पदार्थ घालून आलेले प्लास्टिकचे काळे डबे पुन्हा पुन्हा वापरता? डॉक्टर सांगतात, वापरत असाल तर..

पदार्थ घालून आलेले प्लास्टिकचे काळे डबे पुन्हा पुन्हा वापरता? डॉक्टर सांगतात, वापरत असाल तर..

Healthy Tips: प्लास्टिकचे काळे डबे पुन्हा वापरणं आरोग्यासाठी चांगलं असतं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 14:20 IST2025-07-12T13:20:22+5:302025-07-12T14:20:16+5:30

Healthy Tips: प्लास्टिकचे काळे डबे पुन्हा वापरणं आरोग्यासाठी चांगलं असतं का?

Are Black Plastic Containers Safe For Health Know What Doctor Says | पदार्थ घालून आलेले प्लास्टिकचे काळे डबे पुन्हा पुन्हा वापरता? डॉक्टर सांगतात, वापरत असाल तर..

पदार्थ घालून आलेले प्लास्टिकचे काळे डबे पुन्हा पुन्हा वापरता? डॉक्टर सांगतात, वापरत असाल तर..

Healthy Tips: किचनमधील वेगवेगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिकचे डबे मिळतात.  जेव्हा आपण कुठून जेवण ऑर्डर करतो तेव्हा तेही अनेकदा काळ्या प्लास्टिकच्या डब्यात दिलं जातं. नंतर हे डबे पुन्हा धुवून  काही गोष्टी ठेवण्यासाठी वापरली जातात. पण हे प्लास्टिकचे काळे डबे पुन्हा वापरणं आरोग्यासाठी चांगलं असतं का? याचंच उत्तर डॉ. सलीम जैदी यांनी एका व्हिडिओतून दिलं आहे. 

काळे प्लास्टिक कंटेनर्स चांगले असतात का?

डॉ. सलीम जैदी सांगतात की, काळं प्लास्टिक रिसायकल्ड वेस्ट प्लास्टिकपासून बनवलं जातं. जुने रिमोट, इलेक्ट्रॉनिक सर्किट आणि मोबाइल फोनच्या पार्ट्सचा वापर डबे बनवण्यासाठी केला जातो. नंतर हे डबे कार्बन ब्लॅग पिगमेंटने डाय केले जातात. याच कारणानं या डब्यांमध्ये ब्रोमिनेटेड फ्लेम रिटार्डेंट्स, हेवी मेटल्ससारखे लेड, केडिअम किंवा मर्करी व बीपीए असे घातक तत्व असू शकतात. 

जेव्हा या डब्यांमधील पदार्थ मायक्रोवेवमध्ये गरम केले जातात किंवा या डब्यात गरम पदार्थ टाकले जातात तेव्हा ब्लॅक प्लास्टिक कटेंनर आपल्या खाण्यात विषारी तत्व रिलीज करू शकतं. अशात डॉक्टरांचं मत आहे की, स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी या डब्यांचा वापर अजिबात करू नका. 


कोणत्या डब्यांचा वापर सुरक्षित?

काही गोष्टी किंवा पदार्थ स्टोर करण्यासाठी प्लास्टिक कंटेनर्सऐवजी स्टील किंवा काचेच्या डब्यांचा वापर करा. यात जेवण चांगलं राहतं आणि आरोग्याचंही नुकसान होणार नाही.

Web Title: Are Black Plastic Containers Safe For Health Know What Doctor Says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.