Durva Grass Benefits : दूर्वा गवताचं धार्मिक महत्व सगळ्यांनाच माहीत आहे. गणेशोत्सवासोबतच इतरही अनेक धार्मिक कार्यात दुर्वाचा वापर केला जातो. मात्र, अनेकांना याचे आरोग्याला होणारे फायदे माहीत नसतात. आयुर्वेदात दुर्वाचं खूप महत्व सांगण्यात आलं आहे. दूर्वा गवत अनेक गुणांची खाण मानलं जातं. जर दूर्वा गवतावर उघड्या पायानं म्हणजे चप्पल न घालता चालाल तर शरीराला अनेक फायदे मिळतात. याचे काय फायदे होतात हे जाणून घेऊया.
हाय बीपी करा कंट्रोल
जर तुमचा बीपी नेहमीच हाय राहत असेल तर दूर्वा गवतावर चालणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकता. या गवतावर पायी चालल्यास ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत मिळते. त्याशिवाय मायग्रेनची समस्या सुद्धा दूर होऊ शकते. तसेच इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी, गट हेल्थ चांगली ठेवण्यासाठी, पोटासंबंधी समस्या दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही या गवतावर चालू शकता.
मानसिक आरोग्यासाठी
कामाचा वाढता ताण, वाढत्या जबाबदाऱ्या यामुळे सतत स्ट्रेसमध्ये राहत असाल तर हे गवत तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकता. या गवतावर रोज चप्पल न घालता चालल्यास तुमचा स्ट्रेस कमी होतो. काही आठवड्यांमध्ये तुमच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव दिसून येईल. त्याशिवाय या गवतावर चालल्यास डोळ्यांच्या दृष्टीमध्येही सुधारणा होते.
हृदयरोगांचा धोका कमी
रोज काही वेळ दुर्वा गवतावर चालल्यास हृदयासंबंधी गंभीर आणि जीवघेण्या आजारांचा धोका कमी केला जाऊ शकतो. त्याशिवाय या गवताचा रस प्यायल्यानं एनीमियाची समस्या दूर होऊ शकते. एकंदर काय तर आरोग्यासाठी दूर्वा गवत वरदान असल्यासारखंच आहे.