Benefits Of Eating Bael Leaves On An Empty Stomach: बेलाच्या झाडाच्या पानांना पूजा-पाठात किती महत्व असतं हे काही कुणाला वेगळं सांगायला नको. धार्मिक मान्यतांनुसार भगवान शिवाला बेलाची पानं वाहतात. जास्तीत जास्त लोक बेलाची पानं पूजा-पाठात वापरतात. पण अनेकांना यांचे आरोग्याला होणारे फायदे माहीत नसतात. तुळशीची पानं, कढीपत्ता, कडूलिंबाची पानं तुम्ही नेहमीच खात असाल आणि यांचे फायदेही तुम्हाला माहीत असतील. मात्र, जेव्हा तुम्हाला बेलाच्या पानांचे फायदे माहीत होतील तर रोज तुम्ही हीच पानं खाल.
बेलाच्या पानांमध्ये अनेक औषधी गुण असतात. यात व्हिटामिन ए, व्हिटामिन बी1, व्हिटामिन बी6, व्हिटामिन सी, कॅल्शिअम आणि फायबरसारखे तत्व असतात. जे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खूप महत्वाचे असतात. आयुर्वेदातही वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी फार पूर्वीपासून बेलाच्या पानांचा वापर केला जातो. अशात आज आम्ही तुम्हाला ही पानं उपाशीपोटी खाल्ल्यानं शरीराला काय काय फायदे मिळतात हे सांगणार आहोत.
इम्यूनिटी वाढते
सध्या कोरोन व्हायरस पुन्हा एकदा परत आला असून रूग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनासोबत लढण्यासाठी इम्यूनिटी मजबूत असणं खूप गरजेचं आहे. अशात तुम्ही सकाळी उपाशीपोटी बेलाची पानं चावून खाऊ शकता. या पानांमुळे तुमची इम्यूनिटी वाढेल. कारण यात व्हिटामिन सी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. ज्यांमुळे तुमच्या वेगवेगळे इन्फेक्शऩ आणि आजारांपासून बचाव होतो.
पचन तंत्र सुधारतं
वेगवेगळे आजार आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी पचन तंत्र मजबूत राहणं सगळ्यात महत्वाचं असतं. कारण अनेक गंभीर आजार पोटापासूनच सुरू होतात. अशात बेलाची पानं रोज खाल्ल्यानं तुमचं पचन तंत्र मजबूत राहतं. तुम्ही नेहमीच जर ही पानं खाल्ली तर गॅस, अपचन, बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटी अशा समस्या दूर होतील.
हृदय राहील निरोगी
रोज सकाळी उपाशीपोटी बेलाची पानं खाल्ल्यास तुमचं हृदय सुद्धा निरोगी राहतं. कारण यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात, जे हृदय निरोगी ठेवतात. सोबतच हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट अॅटॅकचा धोका कमी करण्यास मदत करतात. तसेच वेगवेगळ्या हृदय रोगांचा धोकाही कमी राहतो.
डायबिटीसमध्ये फायदेशीर
आजकाल भरपूर लोक डायबिटीसनं पीडित आहेत आणि ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. बेलाची पानंही यात तुमची मदत करतील. यातील फायबर आणि इतर पोषक तत्वांमुळे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहते.
कशी खाल पानं?
तुम्ही बेलाची पानं रोज सकाळी उपाशीपोटी तशीच खाऊ शकता. जर तुम्ही पानं अशीच खाऊ शकत नसाल तर ही पानं तुम्ही चहा किंवा काढ्यातही टाकू शकता.