Healthy Tips: आपल्या किचनमध्ये असे अनेक मसाले असतात जे पदार्थांची टेस्ट तर वाढवतातच, सोबतच आपल्या आरोग्यालाही अनेक फायदे देतात. या मसाल्यांमध्ये असे अनेक पोषक तत्व असतात, जे औषधीसारखं काम करतात. त्यामुळेच आयुर्वेदातही या मसाल्यांना खूप महत्व आहे. मसाल्यांमधील हिरवी वेलची आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. वेगवेगळ्या भाज्या, पदार्थांमध्ये वेलचीचा वापर केला जातो. सोबतच वेलची मुखवास म्हणूनही वापरली जाते. दिसायला छोटी असली तरी वेलचीमध्ये भरपूर पोषक तत्व असतात. यातील पोषक तत्वांमुळे इम्यूनिटी बूस्ट होते. वेलची नियमितपणे खाल्ल्यास झोपण्याची क्वालिटी सुधारते आणि तोंडाची दुर्गंधी दूर होण्यासही मदत मिळते. सोबतच इतरही अनेक फायदे मिळतात, तेच आज जाणून घेऊया.
हिरव्या वेलचीचे फायदे
झोप येण्यास मदत मिळते
वेलचीमध्ये असे पोषक तत्व असतात, जे चांगली झोप येण्यास मदत करतात. अशात झोपण्याआधी दुधात वेलची टाकून प्यायल्यास किंवा नुसती वेलची चघळल्यास चांगली झोप लागले. वेलचीमुळे स्ट्रेस कमी होते आणि शरीर रिलॅक्स होतं. ज्यामुळे चांगली आणि गाढ झोप लागते. चांगली झोप झाली तरच सकाळी फ्रेश वाटतं.
तोंडाची दुर्गंधी होईल दूर
अनेक लोकांना तोंडाची दुर्गंधी येण्याची समस्या असते. अशात ही समस्या दूर करण्यासाठी वेलची खूप फायदेशीर ठरते. वेलचीमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात, जे तोंडातील बॅड बॅक्टेरिया नष्ट करतात. त्यामुळे तोंडाची येणारी दुर्गंधी दूर होण्यास मदत मिळते. यासाठी रात्री झोपण्याआधी एक वेलची खा.
मेटालबॉलिज्म बूस्ट होतं
रात्री वेलची खाऊन झोपल्यानं मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत मिळते. यात मेलाटोनिन असतं, जे मेटाबॉलिज्म बूस्ट करतं. मेटाबॉलिज्म बूस्ट झालं तर वजन वेगानं कमी करण्यास मदत मिळते. त्यामुळे जे लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांनी नियमितपणे वेलची खावी.
पचनक्रिया सुधारते
वेलचीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल्स असतात, जे पचनासंबंधी एंझाइम्सना बूस्ट करतात. ज्यामुळे पचनक्रिया चांगली होते. वेलचीमुळे केवळ पचनक्रिया चांगली होते असं नाही तर बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि गॅससंबंधी समस्याही दूर होते.
स्ट्रेस कमी होतो
आजकालच्या धावपळीच्या जीवनात वाढता कामाचा ताण आणि जबाबदाऱ्यांमुळे स्ट्रेसही वाढत चालला आहे. अशात ही समस्या दूर करण्यासाठी छोटीशी वेलची फायदेशीर ठरते. यातील काही पोषक तत्व मेंदुमध्ये सेराटोनिनची लेव्हल वाढवतात. हे एक न्यूरोट्रान्समीटर असतं, जे मूड चांगला ठेवतं. ज्यामुळे स्ट्रेसही कमी होतो. स्ट्रेस कमी झाला तर शरीरही हेल्दी राहतं.
हृदयासाठी फायदेशीर
वेलचीमध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमसारखे मिनरल्स असतात, जे ब्लड प्रेशर कंट्रोल करतात. ज्यामुळे हृदय निरोगी राहतं. जर हृदय निरोगी राहिलं तर शरीरातील अवयव सुद्धा निरोगी राहतात.
वेलचीचे अनेक फायदे असले तरी याचा अर्थ असा नाही की, वेलची खूप जास्त प्रमाणात खावी. कारण कोणत्याही गोष्टीची अति जशी घातक असते, तेच वेलचीला सुद्धा लागू पडतं. वेलची कमी प्रमाणात खावी. खूप जास्त खाल तर आरोग्यावर वाईट प्रभावही पडू शकतो.