Join us

रात्री झोपताना तोंडात एक लवंग ठेवल्यानं काय होतं? फायदे वाचाल तर रोज कराल 'हा' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 11:56 IST

Clove Eating Benefits : रात्री तोंडात एक लवंग ठेवून झोपण्याचा सल्ला अनेक एक्सपर्ट देतात. याचे अजून काय काय फायदे मिळतात हेही आपण पाहणार आहोत. 

Clove Eating Benefits : लवंग तशी वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरली जाते. याने वेगवेगळ्या पदार्थांची चव तर वाढतेच, सोबतच याचा मुखवास म्हणूनही वापर केला जातो. विड्यात टाकूनही लवंग खातात. याने तोंडाला चव येते. सोबतच आरोग्याला देखील अनेक फायदे मिळतात. जे जनरली आपल्याला माहीत नसतात. अनेक एक्सपर्ट तर रात्री तोंडात एक लवंग ठेवून झोपण्याचा सल्ला देतात. याचे अजून काय काय फायदे मिळतात हेही आपण पाहणार आहोत. 

लवंग ही फक्त मसाल्यात वापरली जाणारी गोष्ट नाही, तर आपल्या आजी-आजोबांच्या घरगुती उपचारांमधली महत्वाची गोष्टी आहे. बऱ्याच जणांना वाटतं की लवंग फक्त दातदुखीसाठी उपयोगी असते, पण तसं नाही. आज आपण जाणून घेणार आहोत एक छोटा पण प्रभावी उपाय झोपण्याआधी फक्त एक लवंग तोंडात ठेवायची!

आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. सीमा कुलकर्णी म्हणतात की, “झोपण्यापूर्वी एक लवंग तोंडात ठेवणं ही सोपा पण प्रभावी सवय आहे. लवंगमधील ‘यूजेनॉल’ हे तत्व तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करून घशातील सूज कमी करतात, पचन सुधारतात आणि झोपेची गुणवत्ता वाढवतात. दररोजच्या छोट्या सवयी आरोग्यात मोठा फरक घडवू शकतात.”

लवंग तोंडात ठेवण्याचे फायदे

तोंडाच्या समस्या होतील दूर

लवंगमध्ये असलेला मुख्य तत्व ‘यूजेनॉल’ हे एक शक्तिशाली अँटी-बॅक्टेरियल तत्व आहे. झोपताना तोंडात ठेवलेली लवंग हळूहळू लाळेत मिसळते आणि रात्रभर बॅक्टेरियांचा नाश करते. सकाळी झोपेतून उठल्यावर येणारा तोंडाचा घाणेरडा वास याने कमी होतो. तसेच हिरड्या सुजल्या असतील किंवा हलका दातदुखीचा त्रास असेल, तर लवंगातील अॅनेस्थेटिक गुण आराम देतो. इतकंच नाही तर लवंगची उष्णता घशाला आराम देते आणि खवखव कमी करते.

पचन आणि झोप सुधारते

आयुर्वेदानुसार लवंग थेट पोटाच्या आरोग्यावर प्रभाव टाकते. लवंग पचनासाठी आवश्यक एन्झाइम्स सक्रिय करते, त्यामुळे अन्न सहज पचतं. तसेच रात्री जड अन्न खाल्ल्यास छातीत जळजळ होत असेल, तर लवंग तो त्रास कमी करते. लवंगाचा सुगंध व चव मेंदूला शांत करतात, ज्यामुळे गाढ झोप लागते.

वापर कसा करावा?

रात्री झोपण्यापूर्वी दात घासून घ्या. एक लवंग तोंडात गाल आणि हिरड्यांच्या मध्ये ठेवा. ती लगेच चावू नका रस हळूहळू तोंडात पसरू द्या. सकाळी उठल्यावर ती काढून टाका.

English
हिंदी सारांश
Web Title : Clove at night: Benefits for oral health, digestion, and sleep.

Web Summary : Sleeping with a clove offers multiple benefits. Its eugenol fights bacteria, reduces throat inflammation, aids digestion, and promotes better sleep. A simple nightly habit for enhanced health.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स