Join us

स्वयंपाकासाठी ‘ही’ भांडी वापरल्याने शरीरात वाढते टॉक्सिन, अन्न होतं विष- किडनी आणि हृदयसाठी घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 19:14 IST

Aluminium utensils Side Effects : भांड्यांवर करण्यात आलेल्या एका संशोधनातून समोर  आलं आहे की, भांडी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मेटल्समध्ये बरेच केमिकल्स असतात, जे आरोग्याचं मोठं नुकसान करतात.

Aluminium utensils Side Effects : स्वयंपाक करण्यासाठी किचनमध्ये वेगवेगळ्या भांड्यांचा वापर केला जातो. ही भांडी वेगवेगळी असतात. बरं ही भांडी स्वयंपाक करण्यासोबतच केवळ किचनचं सौंदर्य वाढवण्यासाठी नाही तर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप महत्वाची असतात. कारण काही भांड्यांमधून असे पोषक तत्व निघतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात. पण काही असेही तत्व असतात जे घातक असतात. भांड्यांवर करण्यात आलेल्या एका संशोधनातून समोर  आलं आहे की, भांडी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मेटल्समध्ये बरेच केमिकल्स असतात, जे आरोग्याचं मोठं नुकसान करतात.

अमेरिकन फड रेग्युलेटर, अमेरिकन खाद्य आणि औषधी प्रशासनाकडून अलिकडेच जारी केलं आहे की, भारतीय कंपनी सरस्वती स्ट्रिप्स प्रायव्हेट लिमिटेडच्या काही कुकवेअरमध्ये घातक शिसे आढळून आलं आहे. ही भांडी बाजारात प्युअर अ‍ॅल्यूमिनिअम यूटेंसिल्स किंवा टायगर व्हाइट नावाने विकली जातात.

यूएसएफडीएने स्पष्ट केलं आहे की, या भांड्यांमध्ये काही पदार्थ बनवले तर शिसे निघू शकतं. ज्यामुळे अन्नात विष पसरेल. हे एक टॉक्सिन आहे. जे शरीरात जमा होऊन मोठं नुकसान करतं. 

शरीराचं काय होईल नुकसान?

जेवणाच्या भांड्यांमध्ये मिळणारं शिसे हे घातक तत्व आरोग्यासाठी खूप नुकसानकारक असतं. कारण हे आपल्या शरीरात जमा होऊन वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढवतं. तसेच या विषारी तत्वांना लहान मुलं आणि गर्भवती महिलांना सुद्धा धोका असतो. याचा मेंदू आणि तंत्रिका तंत्रावर वाईट प्रभाव पडतो.

शिसे हे एक इतकं घातक विषारी तत्व आहे ज्यामुळे आपल्या अ‍ॅनीमिया, रक्तपेशी कमी होणे, थकवा, कमजोरी अशा समस्या होतात. शरीरात विषारी तत्व जमा होतात, जे फिल्टर होऊ शकत नाही. ज्यामुळे किडनीच्या समस्या होतात. हाय बीपीचीची समस्या होते. ज्यामुळे रक्तवाहिन्या वर हृदयावर दबाव पडतो. इतकंच नाही तर यामुळे मानसिक आरोग्यही बिघडतं. जसे की, स्मरणशक्ती कमजोर होणे, शिकण्याची क्षमता कमी होणे.

शरीरात 'हे' जमा कसं होतं?

जेव्हा आपण अ‍ॅल्यूमिनिअमच्या भांड्यात काही बनवतो तेव्हा शिसे हे विषारी तत्व त्यात मिक्स होतं. हेच अन्न खाऊन ते आपल्या शरीरात जातं आणि जमा होतं. अ‍ॅल्यूमिनिअमच्या भांड्यात अॅसिडिक काही बनवलं जातं तेव्हा हे होतं. जर वेळीच याकडे लक्ष दिलं नाही तर अनेक गंभीर आजार होण्याचा धोका खूप जास्त वाढतो. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स