Agarbatti Smoke Side Effects पावसाळा सुरू झाला की, वेगवेगळे सण-उत्सवही सुरू होतात. नागपंचमीनंतर एकापाठी एक सणवार येऊ लागतात. अशात या धार्मिक पूजा-पाठात अगरबत्ती खूप लावल्या जातात. अगरबत्त्यांचा सुगंध आणि धुराने प्रसन्न वाटतं असं मानलं जातं. एका शोधातून समोर आलं आहे की, अगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षाही नुकसानकारक असतो. ज्यामुळे आपल्याला फुप्फुसाचा कॅन्सर होण्याचाही धोका असतो.
या रिसर्चमध्ये सिगारेट आणि अगरबत्तीच्या धुरापासून होणाऱ्या नुकसानाचा तुलनात्मक अभ्सास करण्यात आला. यादरम्यान अगरबत्तीच्या धुराच्या सॅम्पलमध्ये ९९ टक्के अल्ट्राफाइन आणि फाइन पार्टिकल्स आढळून आले. या गोष्टींमुळे शरीराचं नुकसान होतं. साऊथ चीनच्या यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी आणि चायना टबॅको ग्वांगडंग इंडस रेल्वे कंपनीने मिळून याबाबत रिसर्च केला होता.
अगरबत्तीच्या धुराबाबत करण्यात आलेल्या या अभ्यासानुसार, अगरबत्ती लावल्यानंतर त्यातून निघणाऱ्या धुरासोबत काही बारीक कणही निघतात. हे कण हवेमध्ये मिसळतात. अगरबत्तींमधून निघणारे विषारी कण शरीरातील पेशींवर वाईट प्रभाव करतात.
कॅन्सरचा धोका
अभ्यासानुसार, अगरबत्तीच्या धुरामध्ये तीन प्रकारचे विशेष तत्व असतात जे फुप्फुसाचा कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरु शकतात. हे विषारी तत्व म्यूटाजेनिक, जीनोटॉक्सिक आणि सायटोटॉक्सिक या नावांनी ओळखले जातात.
अगरबत्तीमधून निघणारा धूर हा आरोग्यासाठी फारच नुकसानकारक आहे. याने आपल्या फुफ्फुसामध्ये जळजळ, उत्तेजना आणि वेगवेगळ्या प्रकारचे विकार निर्माण करतो. अगरबत्तीच्या धुराने श्वासनलिकेत खाज आणि जळजळ होण्याची समस्याही होऊ शकते.
डोळ्यांसाठी हानिकारक
धुरामध्ये असलेल्या घातक केमिकल्समुळे डोळ्यांमध्ये खाज, जळजळ आणि स्किन अॅलर्जीसारख्या समस्या होऊ शकतात. या धुराने दृष्टीही कमी होण्याचा धोका असतो.