Winter Bathing Tips : पावसाचा जोर आता सगळीकडे जवळपास कमी झाला आहे. वातावरणात बदल होऊन उकाडा वाढला आहे. तर कुठे हलकी थंडी जाणवत आहे. एकदा का थंडी वाढली तर अनेकांना आंघोळीची भीती वाटू लागते. काही लोक गिझरचं बटन ऑन करून गरम पाण्यानं आंघोळ करू लागतात, तर काहींना सवय असते की, ते हिवाळ्यात सुद्धा थंड पाण्यानं आंघोळ करतात. अशात हिवाळ्यात थंड पाण्याणं आंघोळ करावी की नाही किंवा कोणत्या पाण्यानं आंघोळ करावी हेच आज आपण पाहणार आहोत. जेणेकरून आपलं आरोग्य चांगला राहील.
थंड पाण्यानं आंघोळ करण्याचे फायदे
अनेक लोकांना आपण आइस बाथ घेताना बघतो. याचं कारण ते सांगतात की, असं केल्यानं शरीराला आराम मिळतो आणि स्नायू रिलॅक्स होतात. आणि हे खरं आहे. थंड पाण्यानं आंघोळ केल्याचे अनेक फायदे आहेत.
- थंड पाण्यानं आंघोळ केल्यानं ताण-तणाव कमी होतो आणि इम्युनिटी बूस्ट होते.
- यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, ज्यामुळे शरीर अधिक सक्रिय राहतं.
- थंड पाणी केसांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. केस गळणे कमी होते आणि कोंडाही कमी होतो.
- थंड पाण्याने आंघोळ केल्यानं एंडॉर्फिन हार्मोन रिलीज होतो, ज्यामुळे मूड चांगला राहतो आणि उत्साह वाढतो.
काय काळजी घ्याल?
हिवाळ्यात पाणी खूप थंड असतं, त्यामुळे प्रत्येकाच्या शरीराला ते पेलवेलच असं नाही. जर तुम्हाला हृदयविकार किंवा ब्लड प्रेशरची समस्या असेल, तर थंड पाण्यानं आंघोळ करणं टाळा. अशा लोकांनी कोमट पाणी वापरणं अधिक सुरक्षित ठरेल. अचानक थंड पाण्याने आंघोळ केल्यास काही वेळा शरीराला शॉक बसू शकतो. वृद्ध व्यक्तींनी किंवा शरीराने दुर्बल असलेल्यांनी थंड पाण्यानं आंघोळ करू नये.
आंघोळीची योग्य पद्धत
जर तुम्ही हिवाळ्यात सुद्धा थंड पाण्यानं आंघोळ करण्याचा विचार करत असाल, तर काही नियम पाळा.
- थेट डोक्यावर पाणी ओतू नका. आधी शरीरावर पाणी शिंपडा आणि नंतर हळूहळू डोक्यावर ओता.
- आंघोळ झाल्यानंतर जास्त वेळ थंड वातावरणात राहू नका.
- खूप वेळ थंडीत राहिल्यास हायपोथर्मियाचा धोका वाढू शकतो.
एकंदर काय तर आपल्या शरीराची क्षमता आणि आरोग्य पाहूनच ठरवा की हिवाळ्यात गरम की थंड पाण्यानं आंघोळ करायची. योग्य पद्धतीनं थंड पाण्यानं आंघोळ केल्यास शरीरासाठी ताजेतवानं आणि फायदेशीर ठरू शकते.