थंडीच्या दिवसात गरम पाण्याने अंघोळ करणे शरीराला आराम देणारे असतेच, पण त्या पाण्यात काही नैसर्गिक गोष्टी घातल्या तर त्वचेची काळजी अधिक चांगल्या प्रकारे घेता येते. थंडीत त्वचा कोरडी पडते, खाज सुटते आणि नैसर्गिक ओलावा कमी होतो. (Add these 5 natural ingredients to your bath water, sweat will not smell bad, skin will remain healthy)अशावेळी घरच्या घरी सहज उपलब्ध असलेले काही घटक गरम पाण्यात मिसळल्यास त्वचेला पोषण, आराम आणि संरक्षण मिळते. या चार नैसर्गिक वस्तू त्वचेवर सौम्यपणे काम करतात आणि अंघोळ अधिक फायदेशीर होते.
१. कडुलिंबाचा पाला हा नैसर्गिक जंतुनाशक मानला जातो. गरम पाण्यात काही पाने टाकून अंघोळ केल्यास त्वचेवरील बॅक्टेरिया कमी होतो. शरीरावर येणारा रॅश, खाज किंवा लालसरपणा यावरही कडुलिंब आराम देतो. थंडीत त्वचा संवेदनशील होण्याची शक्यता वाढते, अशावेळी या पाल्यातील गुणधर्म त्वचेला स्वच्छ आणि सुरक्षित ठेवतात. त्यामुळे अंघोळीच्या पाण्यात हा पाला नक्की घालावा.
२. जाड मीठ सुज कमी करण्यासाठी फायद्याचे ठरते. शरीराला येणारी खाज या मीठामुळे कमी होते. त्वचेसाठी त्याचा फायदा फार आहे. तसेच ताणतणाव कमी करण्यासाठी हे मीठ उपयोगी ठरते. त्यामुळे दमल्यावर किंवा कष्टाचा दिवस गेल्यावर या मीठाच्या पाण्याने अंघोळ करावी. अगदी चमचाभर मीठ पुरेसे आहे. जास्त घालू नका.
३. अंघोळीच्या पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि गुलाबपाणी घालून अंघोळ करणे फार फायद्याचे ठरते. त्याचा सुगंध सुंदर असतो. तसेच त्वचेला कोमलता मिळते. मऊपणा येतो आणि काही त्रास असेल तर तो ही कमी होतो.
४. लिंबाची सालं आणि संत्र्याची सालं घालू शकता. त्याचा फायदाही होतो आणि बॅक्टेरिया कमी होतो. घामामुळे येणारी दुर्गंधी कमी होते. नक्की वापरुन पाहा.
५. तुळशीची पाने घालू शकता. त्यापेक्षा तुळशीचे ड्रॉप्स मिळतात, जे जास्त फायद्याचे ठरतात. त्याचा वापर करावा. त्वचेला पोषण मिळते आणि प्रसन्नही वाटते. त्यामुळे नक्की वापरुन पाहा.
Web Summary : Enhance bath water with neem, rock salt, rose petals, citrus peels, or tulsi for healthy, odor-free skin. These natural ingredients soothe, protect, and nourish, making your bath more beneficial, especially during winter.
Web Summary : नीम, सेंधा नमक, गुलाब की पंखुड़ियां, खट्टे छिलके या तुलसी से स्नान के पानी को बढ़ाएं और स्वस्थ, गंध रहित त्वचा पाएं। ये प्राकृतिक तत्व आराम देते हैं, रक्षा करते हैं और पोषण देते हैं, जिससे आपका स्नान, खासकर सर्दियों में, अधिक फायदेमंद होता है।