Join us
Daily Top 2 Weekly Top 5

मध्यरात्रीपर्यंत पडून असता-झोपच येत नाही? अदा शर्मा सांगतेय १ उपाय, शांत झोप येईल पटकन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 16:16 IST

Adah Sharma Reveals A Unique Way To Fall Asleep In Just 2 Minutes : झोप येण्यासाठी लोक वेगवेगळी औषधं घेतात. महागड्या ट्रिटमेंट्सही घेतात.

झोप न येण्याची समस्या आजकाल सर्वांनाच उद्भवत आहे. मोबाईल, ताण-तणाव, थकवा येणं यामुळे झोपेवर परिणाम होतो. यामुळे आळस येतो, कामात लक्ष लागत नाही. दिवसभर ताण-तणाव येतो अनेक गंभीर आजारांचाही धोका वाढतो. झोप येण्यासाठी लोक वेगवेगळी औषधं घेतात. महागड्या ट्रिटमेंट्सही घेतात. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री अदाह शर्मानं आपल्या इंस्टाग्राम पेजवर याबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात अदानं एक सोपा,असरदार उपाय शेअर केला आहे. हा उपाय करून तुम्ही लवकरात लवकर झोपू शकता. (Actress Adah Sharma Reveals A Unique Way To Fall Asleep In Just 2 Minutes Insomnia Symptoms And Treatment)

झोप येण्याची सोपी पद्धत कोणती?

अदा शर्मानं या व्हिडिओमध्ये सांगितलेला उपाय खूपच सोपा आहे. घरी बसून कोणत्याही वेळी तुम्ही हा उपाय करू शकता. तिनं सांगितलेला हा उपाय करण्यासाठी फोन सायलेंट मोड किवा फ्लाईट मोडवर ठेवा जेणेकरून कोणत्याही प्रकारचे डिस्ट्रॅक्शन्स होणार नाहीत. नंतर आपल्या उशीवर डोकं ठेवून पडून घ्या. मग डोळे बंद करा. मग डोळ्यांचा एक सोपा व्यायाम करा ज्यामुळे लगेचच तुम्हाला झोप येईल.

झोप येण्यासाठी कोणता  व्यायाम करावा?

अदा शर्मा सांगते की सगळ्यात आधी डोळे डाव्या मग उजव्या बाजूला नंतर मधोमध आणा. नंतर डोळे अप, सेंटर पुन्हा खालच्या बाजूला आणा. नाकावर लक्ष देत पुन्हा डोळे क्लॉकवाईज फिरवा. त्यानंतर एंटी क्लॉकवाईज फिरवा. दोन ते तीन वेळा ही क्रिया करा ज्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर झोप येईल.

केस पिकलेत? जावेद हबीब सांगतात मेहेंदीत 'हा' पदार्थ कालवून लावा, काळे-शायनी होतील केस

या ट्रिकनं लगेच झोप का येते

अदा शर्माच्या मते काही लोकांना हा उपाय केल्यावर लवकर झोप येते तर काहींना पुन्हा हा उपाय करावा लागू शकतो. या टेक्निकमागे मनोवैज्ञानिक आणि शारीरिक सिद्धांत आहे. डोळे आणइ नाकाच्या मुव्हमेंटवर लक्ष दिल्यास माईंड फोकस राहतं. ताण-तणाव आणि विचार मागे हटतात. ही टेक्निक मेडीटेशन आणि रिलॅक्सेशल यांसारख्या एक्टिव्हीजना सक्रीय करते. ज्यामुळे मेंदू, शरीर दोन्ही शांत राहतात. झोप न येण्याचं कारण तणाव आणि अनियमित झोपेचा पॅटर्न असू शकतो. 

रात्री झोपण्याआधी १० ते १५ मिनिटं ही टेक्निक फॉलो करा. दिवसभर फोन किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसपासून थोडं अंतर ठेवा. खोलीत हलका प्रकाश आणि शांत वातावरण असावं. रोज ही सवय लावल्यानं झोप चांगली येईल आणि दिवसभराचा थकवा कमी होण्यास मदत होईल.

घरच्या इडल्या कडक होतात? ८ ट्रिक्स, मऊसूत-पांढऱ्याशुभ्र होतील इडल्या-पीठ दुप्पट फुलेल

झोप सुधारण्याच्या इतर पद्धती

फोन आणि लॅपटॉप झोपण्याच्या कमीत कमी ३० मिनिटं आधी बंद करा. हलके संगीत किंवा व्हॉईस नॉईज ऐकू शकता. झोपण्याची रोजची वेळ फिक्स ठेवा. कॅफिनसारखे हेवी अन्नपदार्थ झोपण्याआधी खाऊ नका. दीर्घ श्वास घ्या आणि हळू हळू व्यायाम करा.

English
हिंदी सारांश
Web Title : Adah Sharma's trick for instant sleep: Try this eye exercise.

Web Summary : Struggling to sleep? Actress Adah Sharma shares a simple eye exercise to fall asleep quickly. Focus on eye movements and breath to calm the mind and body, promoting relaxation and better sleep. Try it before bed for relief.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअदा शर्मा