Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रिसर्चचा दावा-व्यायाम केल्यानं कमी होतो कॅन्सरचा धोका, पण पाहा नेमका कोणता व्यायाम करायचा...

रिसर्चचा दावा-व्यायाम केल्यानं कमी होतो कॅन्सरचा धोका, पण पाहा नेमका कोणता व्यायाम करायचा...

According To The Research Workout In a Day Can Reduce Cancer Risk : Workout reduces cancer risk : Daily exercise cancer prevention : Exercise lowers cancer chances : how workout helps prevent cancer : कॅन्सरसारख्या आजाराचा धोका कमी करण्यासाठी व्यायाम किती फायदेशीर, ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2025 17:31 IST2025-08-05T17:12:03+5:302025-08-05T17:31:53+5:30

According To The Research Workout In a Day Can Reduce Cancer Risk : Workout reduces cancer risk : Daily exercise cancer prevention : Exercise lowers cancer chances : how workout helps prevent cancer : कॅन्सरसारख्या आजाराचा धोका कमी करण्यासाठी व्यायाम किती फायदेशीर, ते पाहा...

According To The Research Workout In a Day Can Reduce Cancer Risk Workout reduces cancer risk Daily exercise cancer prevention Exercise lowers cancer chances | रिसर्चचा दावा-व्यायाम केल्यानं कमी होतो कॅन्सरचा धोका, पण पाहा नेमका कोणता व्यायाम करायचा...

रिसर्चचा दावा-व्यायाम केल्यानं कमी होतो कॅन्सरचा धोका, पण पाहा नेमका कोणता व्यायाम करायचा...

'कॅन्सर' या आजाराचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी भीतीने थरकापं उडतो. कॅन्सर झालेल्या अनेक रुग्णांना किती वेदना सोसाव्या लागत असतील ते त्यांचे त्यांनाच ठाऊक असते. वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरमुळे लाखो लोक (According To The Research Workout In a Day Can Reduce Cancer Risk) दरवर्षी मृत्युमुखी पडतात. कॅन्सरपासून (Workout reduces cancer risk) बचाव करण्यासाठी आणि त्याचा धोका कमी करण्यासाठी अनेक उपाय सांगितले जातात, पण त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय म्हणजे नियमित व्यायाम करणे(how workout helps prevent cancer).

डॉक्टरांच्या मते, शारीरिकरित्या ॲक्टिव्ह राहणे हे कॅन्सरच्या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठीचा एक साधासरळ उपाय आहे. योग्य आहारासोबतच दररोज थोडा वेळ शरीरासाठी दिला तर शरीरात होणाऱ्या असामान्य पेशी वाढीवर नियंत्रण ठेवता येते. व्यायामामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, वजन नियंत्रणात राहते आणि शरीरातील पेशींचे (Daily exercise cancer prevention) कार्य सुधारते. यामुळे अनेक प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. दिल्लीतील अँड्रोमेडा हॉस्पिटलच्या सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागाचे संचालक डॉ. अरुण कुमार गोयल यांनी नवभारत टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत, कॅन्सरसारख्या आजाराचा धोका कमी करण्यासाठी व्यायाम किती फायदेशीर आहे याबद्दल सांगितले आहे(how workout helps prevent cancer).

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने केलेल्या संशोधनानुसार, दररोज फक्त ३० मिनिटे एक्सरसाइज केल्यास ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर किंवा कोलन कॅन्सरचा धोका सुमारे ३० % पर्यंत कमी होऊ शकतो. यासाठीच, आरोग्यतज्ज्ञ सांगतात की, दररोज ३० ते ४० मिनिटांचा व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. हा व्यायाम कोणत्याही स्वरूपात असू शकतो – चालणे, धावणे, सायकल चालवणे, योगा किंवा वेट ट्रेनिंग. नियमित हालचालीमुळे शरीरातले हार्मोन्स, प्रतिकारशक्ती आणि चयापचय प्रक्रिया संतुलित राहतात आणि यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.  

रात्री गाढ झोपेतच हार्ट ॲटॅक येण्याची ३ कारणं! अनेक दिवस आधी दिसतात 'ही' लक्षणं...

तज्ज्ञांच्या मते, रोज व्यायाम केल्यामुळे शरीरात 'एंडोर्फिन' नावाचं हार्मोन तयार होतं, जे मूड सुधारण्यात मदत करतं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतं. संशोधनानुसार, ३० मिनिटांच्या व्यायामामुळे 'TNF-Alpha' नावाचं एंटी-इन्फ्लेमेटरी हार्मोन्स तयार होऊ लागतात, जे कॅन्सरच्या पेशींना वाढण्यापासून रोखण्याचं महत्वाचं काम करतात. यामुळेच डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञ सुचवतात की दररोज थोडा वेळ शरीरासाठी द्यावा आणि तोच आपल्या आरोग्यासाठी  फायदेशीर ठरू शकतो.

उपवास सोडताना कोणता पदार्थ आधी खावा? तज्ज्ञ सांगतात, उपवासानंतरही मिळेल भरपूर एनर्जी...

संशोधनानुसार, जर आपण दररोज ३० ते ४० मिनिटे कोणत्याही प्रकारचा एक्सरसाइज केला, तर त्याचा आपल्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. यामुळे शरीरातील हार्मोन्सचं संतुलन राखलं जातं, आणि त्याचबरोबर आतड्यांची कार्यक्षमता सुधारते. याच कारणांमुळे ब्रेस्ट कॅन्सर आणि कोलन कॅन्सरचा धोका सुमारे ३०% ते ४०% पर्यंत कमी होऊ शकतो.

शारीरिक संबंधांनंतर महिलांच्या हार्मोनल बॅलन्सवर काय परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...

तज्ज्ञांच्या मते, नियमित व्यायामामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, ज्यामुळे गंभीर आजारांपासून बचाव करण्याची क्षमता वाढते. याचबरोबर, वर्कआउटमुळे शरीरात पांढऱ्या रक्त पेशींची संख्या देखील वाढते आणि शरीरातील दाह (Inflammation) कमी होतो. या दोन्ही क्रिया एकत्रितपणे कॅन्सरपासून संरक्षण करणारे एक नैसर्गिक सुरक्षा कवच निर्माण करतात. म्हणूनच दररोज थोडा वेळ व्यायामाला दिला तर तो दीर्घकाळ आरोग्यासाठी  लाभदायक ठरतो.

Web Title: According To The Research Workout In a Day Can Reduce Cancer Risk Workout reduces cancer risk Daily exercise cancer prevention Exercise lowers cancer chances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.