Join us

कॅन्सर-हार्टॲटॅक-डायबिटीस नको असेल तर 'या' पद्धतीने तेल खा- FSSAI ने दिला महत्वाचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2025 19:10 IST

Health Tips About Eating Cooking Oil By FSSAI: आजारपणं, दुखणी टाळायची तर योग्य पद्धतीने, योग्य प्रमाणात तेल खाणं गरजेचं आहे. त्यासाठी नेमकं काय करावं, याविषयी FSSAI ने काही सूचना दिल्या आहेत..

ठळक मुद्दे FSSAI ने तेल खाण्याविषयी काही माहिती शेअर केली असून आजारपणं टाळण्यासाठी ती प्रत्येकालाच उपयोगी ठरणारी आहे.

हल्ली प्रत्येकाच्याच जीवनशैलीमध्ये खूप बदल झाले आहेत. पुर्वी लोकांना अंग मेहनत खूप जास्त असायची. त्यामुळे खाल्लेलं सगळं व्यवस्थित पचायचं आणि लोक निरोगी राहायचे. पण आता मात्र बैठ्या कामाचं स्वरुप खूप जास्त वाढलं आहे. कामानिमित्त लोकांना ८- ८ तास सलग एका जागी बसावं लागतं. त्यात आहारातलं जंकफूडचं प्रमाण खूप वाढलं आहे. बाहेर विकत मिळणारे तेलकट, तुपकट पदार्थही अगदी लहान वयापासूनच सर्रास खाल्ले जातात. या सगळ्या गोष्टींचा परिणाम आरोग्यावर होतो. चुकीच्या पद्धतीने चुकीच्या प्रमाणात तेल खाल्ल्यामुळे कोलेस्टेरॉल वाढणे, हृदयविकार असे त्रास होत आहेत. त्यामुळेच FSSAI ने तेल खाण्याविषयी काही माहिती शेअर केली असून आजारपणं टाळण्यासाठी ती प्रत्येकालाच उपयोगी ठरणारी आहे.(Health Tips About Eating Cooking Oil By FSSAI)

 

कॅन्सर, हार्टअटॅक, डायबिटीस अशी दुखणी टाळण्यासाठी...

FSSAI यांच्या सोशल मीडिया पेजवर जी माहिती शेअर करण्यात आली आहे, त्यानुसार तुम्ही जेवढ्या कमी प्रमाणात तेल खाल तेवढा तुमचा कॅन्सर, हार्टअटॅक, डायबिटीस, रक्तदाब, स्थुलता अशा आजारांचा धोका कमी होत जातो.

रोपांची सुकून गळालेली पानं फेकू नका! त्यापासून तयार होतं उत्कृष्ट खत- बघा कसं करायचं..

त्यामुळे तुमच्या आहारातून शक्य तेवढ्या प्रमाणात तेल कमी करायला हवं. भरपूर तेल खाण्याची सवय असल्यावर एकदम तेल कमी करणं अवघड आहे. कारण कमी तेलाचा स्वयंपाक अनेकांना बेचव वाटतो. त्यामुळे हळूहळू आहारातलं तेल कमी करा. 

 

एखादा पदार्थ तळण्यासाठी वापरलेलं तेल जर कढईमध्ये तसंच उरलं असेल तर ते तेल पुन्हा दुसरा पदार्थ तळण्यासाठी वापरू नका.

पाहुण्यांसाठी करा कांदा- बीट लाेणचं! सॅलेड म्हणून खायलाही मस्त- घ्या एकदम सोपी रेसिपी

कारण वारंवार तळून गरम होणाऱ्या तेलामध्ये अनेक असे केमिकल्स तयार होतात जे आराेग्यासाठी अतिशय घातक ठरतात. त्यामुळेच रस्त्यावर विकत मिळणारे तळलेले पदार्थ खाणं टाळावं किंवा खूपच कमी प्रमाणात खावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.मधुमेहकर्करोगहृदयविकाराचा झटका