Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हळद-मधाचं एक चमचा चाटण करते अनेक त्रास बरे, चेहऱ्यावरही येते सोनसळी सुंदर तेज

हळद-मधाचं एक चमचा चाटण करते अनेक त्रास बरे, चेहऱ्यावरही येते सोनसळी सुंदर तेज

a spoonful turmeric and honey cures many problems, and also gives a beautiful golden glow to the face, home remedies : रोज खा हे चाटण. आरोग्यासाठी फारच उपयुक्त. पाहा मध-हळद एकत्र खाण्याचे कमाल फायदे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2025 18:54 IST2025-08-06T18:52:55+5:302025-08-06T18:54:10+5:30

a spoonful turmeric and honey cures many problems, and also gives a beautiful golden glow to the face, home remedies : रोज खा हे चाटण. आरोग्यासाठी फारच उपयुक्त. पाहा मध-हळद एकत्र खाण्याचे कमाल फायदे.

a spoonful turmeric and honey cures many problems, and also gives a beautiful golden glow to the face, home remedies | हळद-मधाचं एक चमचा चाटण करते अनेक त्रास बरे, चेहऱ्यावरही येते सोनसळी सुंदर तेज

हळद-मधाचं एक चमचा चाटण करते अनेक त्रास बरे, चेहऱ्यावरही येते सोनसळी सुंदर तेज

भारतात थोडा काही त्रास झाला की थेट वैद्य कोणीही गाठत नाही. काही सामान्य समस्यांसाठी आपल्याकडे अनेक घरगुती उपाय आहेत. वर्षानुवर्षे चालत आलेले हे उपाय विश्वास ठेवण्यासारखे आहेत. ( a spoonful turmeric and honey cures many problems, and also gives a beautiful golden glow to the face, home remedies )प्रभावी आहेत. सर्दी, खोकला, ताप अशा काही त्रासांसाठी अनेक घरगुती उपाय केले जातात. असाच एक घरगुती उपाय म्हणजे चाटण. अनेक प्रकारचे काढे केले जातात. तसेच चाटण हा ही एक प्रभावी घरगुती पर्याय आहे.  अनेक प्रकारची चाटण केली जातात. त्यापैकी म्हणजे मध-हळद. चमचाभर हळद घ्यायची त्यात चमचाभर मध घालायचे आणि त्याचे चाटण तयार करायचे. हे चाटण खाणे आरोग्यासाठी फार फायद्याचे ठरते.  

हळद हा एक औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असलेला पदार्थ आहे. त्यात करक्यूमिन नावाचे शक्तीशाली अँण्टी ऑक्सिडंट्स आणि अँण्टी इंफ्लेमेटरी घटक असतात. मध हा देखील एक Natural Antibiotic पदार्थ आहे. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतो. हे दोन्ही घटक एकत्र घेतल्यास त्यांचे गुणधर्म अधिक प्रभावी ठरतात. हळद आणि मधाचे मिश्रण चवीलाही मस्त लागते. 

दररोज सकाळी उपाशीपोटी एक चमचा मध त्यात चिमूटभर हळद मिसळून खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सर्दी, खोकला, घसा खवखवणे किंवा इन्फेक्शन झाल्यास हे मिश्रण खाणे खूप उपयुक्त ठरते. हळदीचे अँण्टीबॅक्टेरियल गुणधर्म संसर्गाची लागण होऊ नये यासाठी फायद्याचे ठरते. तर मध घशाला आराम देतो आणि जंतूसंसर्ग रोखते. हळद व मधाचे सेवन पचनक्रियेस मदत करते. हे चाटण खाल्यामुळे अपचन, गॅस, आणि बद्धकोष्ठता असे त्रास कमी होतात. याशिवाय हे मिश्रण शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचे काम करते आणि यकृताच्या कार्यक्षमतेत सुधारणा करते.

या मिश्रणाचे अजून एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. नियमित हे चाटण खाल्यावर चेहर्‍यावरील पुरळ, डाग आणि त्वचा कोरडी होणे असे त्रास कमी होतात. हळदीतील अँण्टी ऑक्सिडंट्स त्वचेला उजळ आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. मध त्वचेला आर्द्रता आणि पोषण देते. मध-हळदीचे मिश्रण मानसिक आरोग्यावरसुद्धा परिणाम करते. करक्यूमिन मेंदूच्या आरोग्यासाठी फायद्याचे असते. 

Web Title: a spoonful turmeric and honey cures many problems, and also gives a beautiful golden glow to the face, home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.