Join us

एका मिनिटांत स्ट्रेस कमी करणारा उपाय, रोज रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांना आणि मानेला ‘असं’ करा तेल मालिश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2025 17:46 IST

A remedy to reduce stress in one minute, do this oil massage on your palms and neck every night before going to bed : सोपा आणि मस्त उपाय. झोपण्याआधी करा असे मालिश.

रोजच्या धावपळीच्या जीवनामुळे शरीर थकलेले असते. मनही तणावाखाली असते. डोक्याला, शरीराला आणि मनाला काय ती शांतता रात्रीच मिळते. अशा वेळी झोपण्यापूर्वी काही मिनिटे स्वतःसाठी द्यावीत. तर ती शरीरासाठी औषधासारखी ठरतात. (A remedy to reduce stress in one minute, do this oil massage on your palms and neck every night before going to bed)झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्याला, हातांना आणि मानेवर तेलाने हलक्या हाताने मालिश करणे ही अगदी साधी पण अत्यंत उपयुक्त सवय आहे. या सवयीचे फायदे केवळ शरीरापुरते मर्यादित नाहीत, तर मानसिक शांततेसाठीही ते महत्त्वाचे आहेत.

पायांच्या तळव्यांमध्ये शरीरातील अनेक महत्त्वाच्या नाड्या आणि स्नायूंचे केंद्र असते. दिवसभर चालणे, उभे राहणे, पायांवर ताण येणे यामुळे थकवा निर्माण होतो. झोपण्यापूर्वी पायांना गरम तिळाचे, नारळाचे किंवा कोणतेही चांगले तेल लावून मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते. थकवा कमी होतो आणि झोप गाढ लागते. या भागातील ताण कमी झाल्यामुळे पायातील वेदना, बधिरपणा किंवा सूजही कमी होते.

हातांची मालिश केल्याने दिवसभराच्या कामामुळे आलेला ताण कमी होतो. हातातील स्नायूं मोकळे होतात. विशेषत: स्वयंपाक, टायपिंग किंवा हाताच्या सतत हालचालीच्या कामांनंतर मालिश फार उपयोगी ठरते. उबदार तेलामुळे रक्तप्रवाह वाढतो आणि हातातील सांध्यांना लवचिकपणा मिळतो.

मानेला तेलाने मालिश करणे ही सवय आजच्या काळात अधिक गरजेची झाली आहे. मोबाइल आणि संगणक वापरामुळे मान आखडते, डोके जड होते किंवा खांदेदुखीची समस्या तयार होते. मालिश केल्यामुळे स्नायूंवरील ताण कमी होतो, डोकेदुखी कमी होते आणि मानसिक शांतता मिळते.

मालिशमुळे शरीरात उष्णता निर्माण होते, रक्ताभिसरण वाढते आणि नर्व्हस सिस्टमला विश्रांती मिळते. हे सर्व एकत्रितपणे शरीर आणि मन दोन्ही शांत करतात. परिणामी झोपेची गुणवत्ता सुधारते आणि दुसऱ्या दिवसाची सुरवात छान होते. म्हणूनच झोपण्यापूर्वीची ही काही मिनिटे तेलाने केलेली मालिश ही फक्त सवय नाही, तर ती एक नैसर्गिक उपचारपद्धती आहे जी थकलेल्या शरीराला नवी ऊर्जा आणि मनाला शांतता देते.

English
हिंदी सारांश
Web Title : One-minute stress relief: Massage palms and neck before sleep.

Web Summary : Daily oil massage on palms and neck before sleep reduces stress, improves blood circulation, and promotes relaxation. It eases muscle tension, relieves headaches, and enhances sleep quality for a refreshed start.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यहोम रेमेडीसोशल व्हायरलत्वचेची काळजी