lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका हे ९ पदार्थ, टिकण्याऐवजी खराब होण्याचीच शक्यता जास्त...

चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका हे ९ पदार्थ, टिकण्याऐवजी खराब होण्याचीच शक्यता जास्त...

9 things you should not store in fridge : काही पदार्थ मात्र फ्रिजमध्ये ठेवल्याने ते टॉक्सिक किंवा खराब होण्याची शक्यता असते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2024 05:13 PM2024-02-28T17:13:46+5:302024-02-28T17:15:06+5:30

9 things you should not store in fridge : काही पदार्थ मात्र फ्रिजमध्ये ठेवल्याने ते टॉक्सिक किंवा खराब होण्याची शक्यता असते.

9 things you should not store in fridge : Don't keep these 9 foods in the fridge by mistake, they are more likely to spoil instead of last... | चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका हे ९ पदार्थ, टिकण्याऐवजी खराब होण्याचीच शक्यता जास्त...

चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका हे ९ पदार्थ, टिकण्याऐवजी खराब होण्याचीच शक्यता जास्त...

फ्रिज ही प्रत्येक घरातली हल्ली इतकी सामान्य गोष्ट झाली असून आपण असंख्य गोष्टी ठेवण्यासाठी या फ्रिजचा वापर करतो. अन्न शिळे होऊ नये आणि दिर्घकाळ टिकावे म्हणून निर्माण झालेला फ्रिज आता घरोघरी एखाद्या कपाटाप्रमाणे वापरतात. भाजीपाला, फळं, दुग्धजन्य पदार्थ, मसाले, सुकामेवा अशा बऱ्याच गोष्टी जास्त दिवस टिकण्यासाठी अगदी नियमितपणे फ्रिजमध्ये ठेवल्या जातात. बाहेरच्या तापमानात  पदार्थ खराब होत असल्याने तो फ्रिजमध्ये ठेवणे सोयीचे असते. हे जरी खरे असले तरी कोणते पदार्थ फ्रिजमध्ये ठेवायचे आणि कोणते नाही याचे काही नियम असतात. खराब होऊ नयेत म्हणून सर्रास सगळेच पदार्थ तुम्ही फ्रिजमध्ये ठेवत असाल तर ते आरोग्यासाठी फारसे चांगले नसते.  काही पदार्थ मात्र फ्रिजमध्ये ठेवल्याने ते टॉक्सिक किंवा खराब होण्याची शक्यता असते. असे पदार्थ कोणते आणि फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांचे नेमके काय होते पाहूया (9 things you should not store in fridge)...

१. टोमॅटो - फिजमध्ये ठेवल्याने त्याचे टेक्सचर आणि फ्लेवर खराब होते. 

(Image : Google)
(Image : Google)

२. बटाटा - फ्रिजच्या गारठयाने बटाट्यामध्ये असलेल्या स्टार्चचे साखरेत रूपांतर होते आणि बटाट्याची चव बदलते. 

३. कांदा - फ्रीजमध्ये एकप्रकारचा ओलावा असतो त्यामुळे कांदे कोमेजल्यासारखे होतात. 

४. लसूण - फ्रिजमधील गारठयामुळे लसणाला कोंब येतात आणि ते रबरासारखे चिवट होतात. 

५. केळी - केळी कच्ची असतील तर फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांची पिकण्याची प्रक्रिया बंद होते. 

६. ब्रेड - फ्रीजमध्ये ब्रेड कोरडा होतो तसेच तो लवकर शिळाही होतो. 

७. मध - फ्रीजमध्ये मधातील साखरेचा भाग वेगळा होतो. 

८. कॉफी - फ्रिजमध्ये असणारी आर्द्रता आणि वास खेचून घेतला जातो. याचा कॉफीच्या फ्लेवरवर परिणाम होतो. 

९. केचअप  - टोमॅटो केचअप आपण बहुतांश वेळा फ्रीजमध्येच ठेवतो. मात्र ते बाहेर कोरड्या आणि मोकळ्या जागी ठेवलेले केव्हाही चांगले

 

Web Title: 9 things you should not store in fridge : Don't keep these 9 foods in the fridge by mistake, they are more likely to spoil instead of last...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.