बोलताना किंवा हसताना तोंडातून दुर्गंध आला तर कसंतरी वाटतं. त्यात जर आपण चारचौघात असू तर खूपच अवघडल्यासारखं होतं. संधोधनानुसार बऱ्याच लोकांना ही समस्या असते. तोंडातून दुर्गंध येण्याची समस्या अनेक कारणांमुळे उद्भवते. टॉन्सिल्स संक्रमणामुळेही तोंडाला दुर्गंध येतो. (8 Effective Remedies For Bad Breath) इंडियन डेंटल असोशियेशननुसार तोंडाला दुर्गंध येण्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे अन्नाचे कण दातांमध्ये अडकलेले असतात. हे कुजतात. तसंच तोंडाची व्यवस्थित स्वच्छ न केल्यामुळे, फ्लोसिंग न केल्यामुळे दात खराब होतात. (How To Get Rid Of Bad Smell In Mouth)
नियमित ब्रश करा
कोलगेट.कॉमच्या रिपोर्टनुसार दातांची स्वच्छता करणं मौखिक स्वच्छतेचा एक भाग आहे. दात घासताना फ्लोराईडयुक्त टुथपेस्टचा वापर करा आणि सॉफ्ट ब्रिस्टलचा टुथब्रश असायला हवा. (Ref)
नियमित जीभ साफ करा
बरेच लोक दात तर नियमित घासतात पण जीभेची स्वच्छता व्यवस्थित करत नाही. जीभेमध्ये अन्नाच्या कणांमुळे छोटे छोटे बॅक्टेरिया जमा होतत जे दुर्गंधीचे कारण ठरतात. ब्रश करताना जीभेवर ब्रश फिरवून हळूहळू जीभेवरचा थर काढून घ्या.
दिवसातून एकदा फ्लॉस करा
दात घासण्यासोबत फ्लॉसिंगसुद्धा महत्वाचे आहे. ज्यामुळे दातांची स्वच्छता व्यवस्थित करता येते. टुथब्रश दातांच्या सर्व भागांत पोहोचू शकत नाही. दिवसांतून कमीत कमी एकदा तरी फ्लोसिंग केल्यानं दातांमध्ये लपलेले बारीक कण निघण्यास मदत होते.
काही पेय पदार्थ टाळा
कॉफी, चहा, कोल्डड्रिंक्स असा पदार्थांचे सेवन कमीतकमी करा. कारण अशा पदार्थांचे जास्त सेवन गंभीर आजारांचे कारण ठरू शकते.
नैसर्गिक माऊथ फ्रेशनरचा वापर करा
केमिकल्सयुक्त माऊथ फ्रेशनर्सचा वापर करण्याऐवजी नैसर्गिक माऊथ फ्रेशनरर्सचा वापर करा. स्वंयपाक घरातील मसाले जसं की लवंग, बडीशेप, ओवा तोंडात सुंगध निर्माण करतात. तुम्ही हे पदार्थ जेवणानंतर खाल्ल्यास खाल्लेल्या अन्नाचं पचनही नीट होते.
तोंड जास्तवेळ कोरडं पडू देऊ नका
तोंड जास्तवेळ कोरडं पडलं की दुर्गंध येऊ लागतो. म्हणून ठराविक अंतरानंतर पाणी पित राहा. रात्री झोपण्याआधी ब्रश करून मगच झोपा म्हणजे सकाळी तोंड कोरडं पडल्यामुळे दुर्गंध येणार नाही.
दातांचे चेकअप करा
ठराविक वेळेनंतर दातांचे चेकअप करायला विसरू नका. जर एखादी दाढ किडली असेल किंवा दात दुखत असेल तर त्वरीत दातांच्या डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार घ्या.
तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी घरगुती उपाय
तोंडाचा दुर्गंध दूर करण्यासाठी तुम्ही पेरूची पानं उकळवून या पाण्यानं गुळण्या करू शकता. पण २ दिवसांपेक्षा जास्त त्रास होत असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Web Summary : Bad breath is often due to food particles stuck in teeth. Regular brushing, flossing, tongue cleaning, and avoiding certain drinks help. Natural mouth fresheners and regular dental checkups are crucial for fresh breath.
Web Summary : मुंह से दुर्गंध अक्सर दांतों में फंसे भोजन के कणों के कारण होती है। नियमित ब्रशिंग, फ्लॉसिंग, जीभ की सफाई और कुछ पेय पदार्थों से परहेज मदद करते हैं। ताज़ी सांस के लिए प्राकृतिक माउथ फ्रेशनर और नियमित दंत जांच महत्वपूर्ण हैं।