Women Health: आपली लाइफस्टाईल फारच वेगाने बदलत आहे. त्यामुळे लहान मुले, पुरूष, महिला आणि वृद्ध सगळ्यांनाच वेगवेगळ्या समस्यांचा फटका बसतो आहे. आरोग्यासंबंधी अशा अनेक समस्या आहे ज्या महिला नॉर्मन मानून सहन करत राहतात. यात वेदना देणारी मासिक पाळी, पीसीओएस, फायब्रॉइड, एंडोमेट्रियोसिस किंवा पुन्हा पुन्हा होणारे इन्फेक्शन लाखो महिलांच्या जीवनातील रोजचं सत्य आहे. 'असंच होत असतं' असं म्हणून दुर्लक्ष केलं जातं. पण सततच्या वेदना, जास्त ब्लीडिंग, अचानक वजन वाढणं, केस गळणं किंवा ओटीपोट दुखणं या गोष्टी काही सामान्य नाहीत.
अनेकदा या समस्यांवर गप्प बसण्याची कारणं संगोपन आणि संकोच असतात. मासिक पाळी किंवा प्रायव्हेट पार्टबाबत मोकळेपणाने, बिनधास्त बोलण्यात लाज येते. तर काही महिलांना वाटतं की, त्यांना गंभीरतेने ऐकलं जाणार नाही. लहान शहरं किंवा ग्रामीण भागांमध्ये महिला रोग एक्सपर्टपर्यंत पोहोचणं जरा अवघड असतं, तर शहरांमध्ये बिझी रूटीन आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यात आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं.
काय सांगतात एक्सपर्ट?
स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. अखिला सी यांनी TOI ला सांगितलं की, महिलांच्या शरीरात सतत काहीना काही बदल होत असतात. भारतात अंदाजे ७० टक्क्यांपेक्षा अधिक महिला कधीना कधी स्त्री रोगांसंबंधी समस्यांचा सामना करतात. पण जागरूकता आणि वेळेवर तपासणी न केल्याने अनेक केसेस दुर्लक्षित राहतात.
त्यांच्यानुसार, सगळ्यात आधी मासिक पाळीला प्राथमिकता द्यायला हवी. नियमित आणि सहन करण्यायोग्य पाळी सामान्य आहे. पण जर दर तासाला पॅड बदलावे लागत असतील, रक्ताच्या गाठी येत असतील किंवा सात दिवसांपेक्षा जास्त ब्लीडिंग होत असेल तर तपासणी करण्याची गरज आहे. स्वच्छतेची काळजी घ्या, जास्त केमिकल उत्पादनं वापरणं टाळा. कारण प्रायव्हेट पार्टमध्ये स्वत:हूनही स्वच्छ होण्याची क्षमता असते.
लाइफस्टाईलवरही लक्ष द्या
पोषण आणि वजन दोन्ही गोष्टी हार्मोन संतुलनाशी निगडीत आहेत. आयर्न, कॅल्शिअम आणि व्हिटामिन भरपूर असलेला आहार महत्वाचा आहे. फार कमी किंवा जास्त वजन पीसीओएस वा वंध्यत्व यांसारख्या समस्या वाढवू शकतं. मानसिक आरोग्य चांगलं ठेवणंही तेवढंच महत्वाचं आहे. कारण तणाव आणि झोपेची कमतरता यांचा थेट मासिक पाळीवर प्रभाव पडतो. जर आपण लाइफस्टाईलमध्ये बदल केला आणि तब्येतीवर बारकाईने लक्ष दिलं तर मोठ्या आजाराचा धोका टाळता येऊ शकतो.
Web Summary : Many Indian women ignore health problems like painful periods, PCOS, and infections, often due to societal constraints and lack of awareness. Experts advise prioritizing menstrual health, nutrition, and mental well-being to prevent serious illnesses. Early checkups are crucial.
Web Summary : कई भारतीय महिलाएं दर्दनाक मासिक धर्म, पीसीओएस और संक्रमण जैसी स्वास्थ्य समस्याओं को अनदेखा करती हैं, अक्सर सामाजिक बाधाओं और जागरूकता की कमी के कारण। विशेषज्ञ गंभीर बीमारियों को रोकने के लिए मासिक धर्म के स्वास्थ्य, पोषण और मानसिक कल्याण को प्राथमिकता देने की सलाह देते हैं। शुरुआती जांच महत्वपूर्ण है।