मखाने (Makhane) अनेक पोषक तत्वांमुळे सुपर फूड म्हणून ओळखलं जातात. दुधात बरीच पोषक तत्व असतात याच कारणामुळे मखान्यांना दुधासोबत खाणे संपूर्ण आहार मानले जाते. हिवाळ्याच्या दिवसांत दुधासोबत मखान्यांचे सेवन केल्यानं शरीरावर बरेच चांगले परीणाम दिसून येतात. हे कॉम्बिनेशन लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच हाडं मजबूत होण्यासाठी तसंच एनर्जी लेव्हल बुस्ट होण्यासाठी फायदेशीर ठरतं. (Benefits Of Eating Makhana With Milk)
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी दूध आणि मखान्यांचे सेवन फायदेशीर ठरते. यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते. दुधासोबत मखाने खाल्ल्यानं शरीराला कोणकोणते फायदे मिळतात ते समजून घेऊया. (6 Health Benefits Of Eating Makhana With Milk)
हाडं मजबूत होतात
मखाने आणि दूध या दोन्हींमध्ये कॅल्शियम आणि इतर पोषक तत्व खनिजं भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे हाडं आतून बळकट होतात. लहान मुलं आणि वयस्कर लोकांसाठी हे फायदेशीर ठरते. वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
वजन नियंत्रणात राहतं
मखान्यांमध्ये फायबर्सचे प्रमाणात जास्त असते. ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं. याव्यतिरिक्त दुधातील प्रोटीनसुद्धा वजन कमी करण्यास मदत करते.
पचनक्रिया चांगली राहते
मखान्यांमधील फायबर्स पचनक्रिया चांगली ठेवतात. गॅसची समस्या उद्भवत नाही. ज्या लोकांची पचनक्रिया कमकुवत असते त्यांच्यासाठी मखाने फायदेशीर ठरतात.
हृदयाचे आरोग्य चांगले राहते
मखान्यांमधील एंटी ऑक्सिडेंट्स हृदयाचे आजार कमी करण्यास मदत करतात. दुधातील पोटॅशियम ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
उर्जेचा स्तर वाढतो
दूध आणि मखाने दोन्ही कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्सचा चांगला स्त्रोत आहेत. ज्यामुळे दीर्घकाळ तुम्हाला एनर्जेटीक राहण्यास मदत होते. दिवसाची सुरूवात मखाने खाऊन केल्यानं संपूर्ण दिवसभर शरीराल उर्जा मिळते.
ताण-तणाव कमी होतो
मखान्यांमधील मॅग्नेशियम ताण-तणाव कमी करते आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. रात्री झोपण्याच्या आधी दुधात मखाने घालून खाल्ल्यानं काही दिवसांतच तुम्हाला फरक दिसून येईल.