Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी नाश्त्यात खा 'हे' पदार्थ, शुगर वाढणार नाही - दिवसभर रहाल एनर्जेटिक...

डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी नाश्त्यात खा 'हे' पदार्थ, शुगर वाढणार नाही - दिवसभर रहाल एनर्जेटिक...

6 Best Breakfast Foods for People with Diabetes : Healthy Breakfast Foods For Diabetes : Best Breakfast Foods That Help Lower & Control Blood Sugar : 6 Breakfast Foods That Control Your Blood Sugar Level - Diabetes Diet : डॉक्टर सांगतात, योग्य नाश्त्याच्या पदार्थांची निवड करून आपण डायबिटीसवर नियंत्रण ठेवू शकतो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2025 13:16 IST2025-06-07T12:59:07+5:302025-06-07T13:16:41+5:30

6 Best Breakfast Foods for People with Diabetes : Healthy Breakfast Foods For Diabetes : Best Breakfast Foods That Help Lower & Control Blood Sugar : 6 Breakfast Foods That Control Your Blood Sugar Level - Diabetes Diet : डॉक्टर सांगतात, योग्य नाश्त्याच्या पदार्थांची निवड करून आपण डायबिटीसवर नियंत्रण ठेवू शकतो..

6 Best Breakfast Foods for People with Diabetes Healthy Breakfast Foods For Diabetes Best Breakfast Foods That Help Lower & Control Blood Sugar 6 Breakfast Foods That Control Your Blood Sugar Level | डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी नाश्त्यात खा 'हे' पदार्थ, शुगर वाढणार नाही - दिवसभर रहाल एनर्जेटिक...

डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी नाश्त्यात खा 'हे' पदार्थ, शुगर वाढणार नाही - दिवसभर रहाल एनर्जेटिक...

डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी औषधोपचाराबरोबरच योग्य आहार घेणे देखील तितकेच गरजेचे असते. दिवसभरातील आहारात देखील दिवसाची सुरुवात कोणत्या प्रकारच्या नाश्त्याने केली जाते, याचा साखरेच्या पातळीवर थेट परिणाम होतो. सकाळचा नाश्ता हा शरीराला ऊर्जा देतो आणि दिवसभरातील रक्तातील साखरेच्या नियंत्रणासाठी (6 Best Breakfast Foods for People with Diabetes) अतिशय फायदेशीर ठरतो. त्यामुळे डायबिटीस (Healthy Breakfast Foods For Diabetes) असलेल्या व्यक्तींनी सकाळचा नाश्ता करताना अधिक जागरूक असणे आवश्यक असते. डायबिटीस (Best Breakfast Foods That Help Lower & Control Blood Sugar) असणाऱ्यांनी संतुलित आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्नपदार्थ, फायबर, प्रथिने आणि गुड फॅटस असलेले पदार्थ सकाळच्या नाश्त्यात समाविष्ट केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते( 6 Breakfast Foods That Control Your Blood Sugar Level).

डायबिटिक व्यक्तींनी जर सकाळचा नाश्ता योग्य पद्धतीने केला तर, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हृदयाचं आरोग्य, पचनक्रिया आणि वजन नियंत्रण करण्यास देखील मदत करतात. यासाठीच, आपण असे काही सोपे, घरच्याघरी तयार करता येणारे आणि चवीलाही उत्तम असलेले नाश्त्याचे पर्याय पाहणार आहोत, जे डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी आरोग्यदायी आणि संतुलित आहेत. योग्य नाश्त्याची निवड करून आपण आपल्या डायबिटीसवर नियंत्रण ठेवू शकतो. drbhagyeshkulkarni यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन डायबिटीस असणाऱ्यांसाठी उत्तम नाश्त्याचे पदार्थ कोणते आहेत, याबद्दल अधिक माहिती देणारा व्हिडिओ शेअर केला आहे.  

डायबिटीस असणाऱ्यांसाठी उत्तम नाश्त्याचे पदार्थ कोणते आहेत ?

१. मोड आलेल्या कडधान्यांचे चाट :- डायबिटीस असणाऱ्यांसाठी उत्तम नाश्त्याच्या पदार्थांपैकी सर्वात पहिला पदार्थ म्हणजे, मोड आलेल्या कडधान्यांचे चाट. मोड आलेली कडधान्ये हलकीशी उकडवून त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर करून वर थोडासा चाट मसाला भुरभुरवून घालावा. डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी नाश्ता हा हलका, प्रथिनयुक्त आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेला असावा. यासाठी मोड आलेल्या कडधान्यांचा चाट हा एक उत्तम पर्याय आहे. चवदार, सहज पचणारा आणि पोषणमूल्यांनी भरलेला हा पदार्थ केवळ स्वाद वाढवत नाही, तर साखरेच्या नियंत्रणातही मदत करतो. 

व्यायामाला वेळ नाही? महिलांनो, 'या' ३ पद्धतीने रोज चाला-लोक विचारतील वजन कमी करण्याचं सिक्रेट...

२. बेसन चिला / धिरडं  :- बेसन पीठ किंवा इतर वेगवेगळ्या प्रकराची पौष्टिक पीठ एकत्रित घेऊन आपण त्यापासून पौष्टीक असा चिला किंवा धिरडं तयार करून खाऊ शकतो. डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी नाश्ता निवडताना अशा पदार्थांचा विचार करावा लागतो, जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवत असताना शरीराला आवश्यक ऊर्जा आणि पोषणही पुरवतील. अशावेळी बेसन चिला किंवा धिरडं हा एक चविष्ट, झटपट तयार होणारा आणि संतुलित नाश्त्याचा पर्याय ठरतो.

३.हिरव्या मुगाचा डोसा :- डायबिटीस असलेल्या व्यक्तींचा सकाळचा नाश्ता असा असावा जो पचायला हलका, पोषणमूल्यांनी समृद्ध आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणारा असेल. हिरवे मूग देखील डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी तितकेच पौष्टीक असतात. आपण हिरव्या मुगाचा पौष्टीक डोसा देखील सकाळच्या नाश्त्यात खाऊ शकतो. 

गुडघेदुखीचा त्रास सतावतो?घरीच करा 'हे' खास तेल - दुखणं कमी करणारा अस्सल घरगुती उपाय...

४. मिश्र धन्यांचं थालीपीठ :- डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी मिश्र धान्यांच पौष्टीक असं गरमागरम थालीपीठ देखील एक उत्तम पर्याय ठरु शकतो. नाचणी, ज्वारी, बाजरी, हरभरा पीठ अशा मिश्र धान्यांपासून बनवलेले थालीपीठ हळूहळू पचते, त्यामुळे रक्तातील साखरेत झपाट्याने वाढ होत नाही. मिश्र धान्यांमध्ये नैसर्गिक फायबर आणि प्रथिनांचं प्रमाण जास्त असल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोट अधिक वेळासाठी भरलेले वाटते. 

५. फ्रुटस आणि ड्रायफ्रुटस :- फ्रुटस आणि ड्रायफ्रुटस देखील डायबिटीस असलेल्या व्यक्ती सकाळच्या नाश्त्यात खाऊ शकतात. सकाळच्या नाश्त्यात हे पदार्थ खाल्ल्यास शरीराला नैसर्गिक साखर, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि गुड फॅट्सचा पुरवठा होतो. डायबिटीस असलेल्या व्यक्तींच्या आहारात फळं आणि ड्रायफ्रुट्स यांचा योग्य प्रमाणात समावेश केल्यास हा नाश्ता पोषणमूल्यांनी भरलेला आणि ऊर्जादायी ठरतो.  

६. सोया किंवा टोफू :- डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी सकाळच्या नाश्त्यात सोया किंवा टोफू यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. सोया किंवा टोफू यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते, यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.


Web Title: 6 Best Breakfast Foods for People with Diabetes Healthy Breakfast Foods For Diabetes Best Breakfast Foods That Help Lower & Control Blood Sugar 6 Breakfast Foods That Control Your Blood Sugar Level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.