Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > गाडी लागते- प्रवासात उलट्या, मळमळ होण्याचा त्रास? ५ उपाय- प्रवासाचा मस्त आनंद घ्याल

गाडी लागते- प्रवासात उलट्या, मळमळ होण्याचा त्रास? ५ उपाय- प्रवासाचा मस्त आनंद घ्याल

5 Tips To Avoid Vomiting While Travelling: उन्हाळी सहलीला जायची तयारी सुरू आहे पण उलट्या, मळमळ अशा त्रासामुळे प्रवासच करावा वाटत नाही?(how to stop vomiting while travelling?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2025 16:51 IST2025-04-30T16:50:45+5:302025-04-30T16:51:39+5:30

5 Tips To Avoid Vomiting While Travelling: उन्हाळी सहलीला जायची तयारी सुरू आहे पण उलट्या, मळमळ अशा त्रासामुळे प्रवासच करावा वाटत नाही?(how to stop vomiting while travelling?)

5 tips to avoid vomiting while travelling, tips to prevent vomiting while Traveling, how to stop vomiting while travelling | गाडी लागते- प्रवासात उलट्या, मळमळ होण्याचा त्रास? ५ उपाय- प्रवासाचा मस्त आनंद घ्याल

गाडी लागते- प्रवासात उलट्या, मळमळ होण्याचा त्रास? ५ उपाय- प्रवासाचा मस्त आनंद घ्याल

Highlightsप्रवासात उलट्या, मळमळ असा त्रास होऊ नये आणि छान आनंदाने सगळी सहल पार पडावी, यासाठी डॉक्टरांनी सांगितलेले हे काही उपाय लक्षात ठेवा.

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. मुलांनाही सुट्ट्या असतात. त्यामुळे बरेच जण उन्हाळी सहलीचा प्लॅन करतात. पण काही जणांच्या बाबतीत असं होतं की ट्रिपला जाण्याचा आनंद खूप मोठा असतो. त्यासाठी जय्यत तयारीही केली जाते. पण गाडी लागण्याचा त्रास होत असल्याने ऐन प्रवासाचा दिवस जेव्हा येतो, तेव्हा आनंद व्हायचं सोडून टेन्शन यायला लागतं. कारण गाडीमध्ये बसताच उलट्या होतात की काय अशी भीती वाटायला लागते. बऱ्याच लहान मुलांना आणि महिलांना हा त्रास होतो. या त्रासामुळे मग प्रवासाचा मनमुराद आनंद घेता येत नाही (tips to prevent vomiting while Traveling). आपल्या सहप्रवासींनाही याचा त्रास होतोच (5 tips to avoid vomiting while travelling). म्हणूनच प्रवासात उलट्या, मळमळ असा त्रास होऊ नये आणि छान आनंदाने सगळी सहल पार पडावी, यासाठी डॉक्टरांनी सांगितलेले हे काही उपाय लक्षात ठेवा.(how to stop vomiting while travelling?)

 

प्रवासात उलट्या, मळमळ असा त्रास होऊ नये म्हणून...

प्रवासात उलट्या, मळमळ असा त्रास होऊ नये म्हणून काय उपाय करता येतील याविषयीची माहिती डॉक्टरांनी dr_kiranphadtare_gharge या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेले उपाय पुढीलप्रमाणे...

अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय 'ओमकार' करण्याचे ४ महत्त्वाचे फायदे, अनेक आजारांवरचा अगदी सोपा उपाय...

१. प्रवासादरम्यान मोबाईल पाहाणे, वृत्तपत्र वाचणे, एखादे पुस्तक वाचणे असे कटाक्षाने टाळा. कारण यामुळे मळमळ, उलट्यांचा त्रास वाढतो. गाडीमध्ये बसताच मोबाईलला तात्पुरते बाय बाय करून टाका.

२. खिडकीतून बाहेर पाहताना पळणाऱ्या वाहनांकडे पाहण्याऐवजी एखाद्या स्थिर गोष्टीवर नजर केंद्रित करा. उदाहरणार्थ आकाश, दूरवर दिसणारा एखादा डोंगर किंवा दूरवरचे एखादे मोठे झाड अशा गोष्टींकडे पाहा.

 

३. टेम्पो, ट्रक किंवा एसटी बसच्या मागच्या सीटवर बसून प्रवास करणे टाळा. कारण अशा प्रवासामुळे खूप धक्के लागतात आणि मळमळ, उलट्यांचा त्रास वाढतो. 

शांत झोप लागत नाही, लगेच जाग येते? १ खास उपाय- मस्त झोप होऊन फ्रेश वाटेल

४. प्रवासादरम्यान तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थ खाणं टाळा. त्याऐवजी लवंग, वेलची, बडिशेप, एखाद्या गोळ्या चघळत राहा.

५. प्रवास सुरू होण्यापुर्वी आलं आणि लिंबाचा काढा करून प्या. यामुळेही प्रवासातल्या उलट्या आणि मळमळीचा त्रास नियंत्रणात राहू शकतो.


 

Web Title: 5 tips to avoid vomiting while travelling, tips to prevent vomiting while Traveling, how to stop vomiting while travelling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.