आजकाल अनहेल्दी लाईफस्टाईल आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लोकांमध्ये किडनीशी संबंधित समस्यांचा धोका वाढत आहे. किडनीची काही लक्षणं ओळखण्यात लोक चूक करतात ज्यामुळे आरोग्याशी संबंधित आजारांचा धोका वाढतो (5 symptoms indicate kidney damage). किडनीशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास दुर्लक्ष करू नये. नोएडच्या मेट्रो रुग्णालयातील नेफ्रोलॉजीचे कंसल्टंट डॉ. शिव चड्ढा यांनी किडनी खराब होण्याच्या सुरूवातीच्या लक्षणांबाबत सांगितले आहे. (These 5 Symptoms Indicate Kidney Damage)
किडनी खराब होण्याची सुरूवातीची लक्षणं काय आहेत?
डॉक्टर सांगतात किडनी खराब होणं ही सायलेंट कंडीशन आहे. ज्याची लक्षणं दिसून येत नाही पण शरीरात बदल मात्र दिसतात. हे बदल सहसा लोक लवकर ओळखत नाहीत. किडनीची समस्या उद्भवल्यास ब्लड प्रेशर, अनियंत्रित होणं, थकवा येणं, लघवीत फेस येणं, भूक न लागणं, मुत्रात रक्ताचे खडे होणं, चेहऱ्यावर सूज येणं, झोप न येणं, श्वास घ्यायला त्रास होणं अशा समस्या उद्भवतात. मांसपेशींमध्ये वेदना उद्भवल्यास खाज येणे, उलटीसारखे होणं अशा समस्या उद्भवतात.
लघवीमध्ये दिसणारे बदल
किडनी डॅमेज झाल्यास किडनीसंबंधित समस्या उद्भवतात आणि मुत्रात जास्त फेस येण्याची समस्या उद्भवते. युरिनच्या माध्यमातून प्रोटीन बाहेर येते. याव्यतिरिक्त रात्री वारंवार लघवी येणं, रक्ताचा रंग गडद होणं अशा किडनीच्या समस्या उद्भवतात.
त्वचेला खाज येणं
किडनीसंबंधीत समस्या उद्भवल्यास शरीर डिटॉक्स करू शकत नाही. ज्यामुळे शरीतील टॉक्सिन्स वाढू लागतात. अशा स्थितीत त्वचा कोरडी पडणं, खाज येणं, सूज येणं अशा समस्या उद्भवतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरतं.
जपानी मुलं इतकी शांत आणि हूशार का असतात? ६ पॅरेंटींग सिक्रेट्स, तुमची मुलंही गुणी होतील
भूक न लागणं
किडनी खराब झाल्याच्या सुरूवातीच्या लक्षणांमध्ये व्यक्तीला भूक न लागणं, तोंडाला कडवट वास येणं, उलटी होणं यांसारख्या समस्या उद्भवता. अशावेळी या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरतं.
शरीराला सूज येणं
अनेकदा शरीरात एक्स्ट्रा सोडीयम आणि पातळ पदार्थ तसेच राहतात. ज्यामुळे शरीरात टॉक्सिन्स जमा होतात आणि शरीराला सूज येते. याव्यतिरिक्त किडनीच्या समस्या उद्भवल्यास डोळ्यांखाली सूज येणं, पाय, हात आणि चेहरा सुजण्याच्या समस्या उद्भवतात.
कुकरमध्ये भात गचका होतो? तांदूळ शिजवताना 'हा' पदार्थ घाला, एका शिट्टीत मोकळा शिजेल भात
थकवा कमकुवतपणा
किडनीसंबंधित समस्या उद्भवल्यास रक्तात टॉक्सिन्स जमा होतात. ज्यामुळे थकवा येणे, कुमकुवत पणा, झोप न लागणं अशा समस्या उद्भवतात. याव्यतिरिक्त किडनीच्या समस्या उद्भवल्यास हॉमोनल असंतुलन उद्भवते आणि शरीरात रक्त कमी होण्याची समस्या उद्भवते.
Web Summary : Unhealthy lifestyles increase kidney problems. Early signs include high blood pressure, fatigue, foamy urine, and loss of appetite. Changes in urination, itchy skin, swelling, and persistent fatigue also indicate potential kidney damage. Consult a doctor if you notice these symptoms.
Web Summary : अस्वस्थ जीवनशैली से किडनी की समस्याएँ बढ़ती हैं। शुरुआती लक्षणों में उच्च रक्तचाप, थकान, झागदार पेशाब और भूख न लगना शामिल हैं। पेशाब में बदलाव, खुजली वाली त्वचा, सूजन और लगातार थकान भी संभावित किडनी क्षति का संकेत देते हैं। ये लक्षण दिखने पर डॉक्टर से सलाह लें।