मधुमेहाचे रुग्ण भारतात खूप जास्त आहेतच पण ते खूप वेगाने वाढतही आहेत. आपल्याला माहितीच आहे की आपली बदललेली जीवनशैली त्यासाठी सगळ्यात जास्त कारणीभूत आहे. बैठं काम, व्यायामाचा अभाव, जंकफूडचे वाढते प्रमाण यामुळे मधुमेहाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. खरंतर आपलं शरीर जेव्हा आपल्याला त्यासंबंधी सूचना देत असतं, तेव्हाच खरंतर आपण सावध होण्याची गरज आहे. कारण कोणताही आजार काही एकदम होत नाही. शरीर ती लक्षणं दाखवतंच. पण आपल्याला माहिती नसल्याने ती लक्षणं ओळखता येत नाहीत आणि मग आजार वाढत जातो (Health Tips About Diabetes). तुमच्या शरीरातली साखर वाढत असेल किंवा तुम्ही अगदीच मधुमेहाच्या बॉर्डरलाईनवर असाल तर तुम्हाला काही लक्षणं दिसू लागतात. ती वेळीच ओळखा आणि लवकरच तुमच्या जवळच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या असं डॉक्टर सांगतात...(Warning signs you are heading towards Diabetes)
मधुमेह होण्यापुर्वी शरीरात कोणते बदल दिसून येतात?
मधुमेहाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात कोणते बदल दिसून येतात याची माहिती डाॅक्टरांनी healwithyogyata या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेली काही लक्षणं पुढीलप्रमाणे...
पोटाचा घेर कमी करायचाय? प्रत्येकाला सहज जमतील असे ५ सोपे नियम- पोटावरची चरबी झरझर उतरेल..
१. मान काळी होणे आणि त्यावर भेगा दिसणे. अनेक जणांना असं वाटतं की हे मानेवर झालेलं टॅनिंग आहे. पण प्रत्यक्षात मात्र तसं नसतं. शरीरातली साखर वाढल्याने हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि त्यामुळे मानेवर काळेपणा दिसू लागतो. असा काळेपणा काखेतही दिसू लागतो.
२. मानेवर जर अगदी तिळाएवढे किंवा त्यापेक्षाही लहान आकाराचे मस यायला सुरुवात झाली असे तर याबाबतीत मधुमेह तज्ज्ञांचा सल्ला एकदा घ्यायलाच हवा.
३. दंडावर चरबीचे थर जमा होणं ही देखील मधुमेहाच्या दृष्टीने एक वॉर्निंग असू शकते असं तज्ज्ञ सांगतात.
'या' छोट्याशा बियांचं दूध म्हणजे हाडांसाठी पॉवरफूल टॉनिक! ताकद येऊन हाडं होतील मजबूत
४. काही जणांच्या पाठीवर अगदी वरच्या बाजुला म्हणजेच मानेच्या खालच्या भागात एक उंचवटा तयार होतो आणि तो तसाच राहातो. हा देखील मधुमेहामुळे शरीरात झालेला एक बदल असू शकतो.
५. रात्री शांत झोप न येणे, डबल चीन दिसायला लागणे, तळपायांवर सूज येऊन ते दुखायला लागणे.
