Join us

हाय- हाय मिरची!वेटलॉसपासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत मिरची म्हणजे सुपरफूड, झणझणीत पण गुणकारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2025 13:37 IST

5 health benefits of eating green chilies with your meals : Top 5 Health Benefits Of Green Chillies : 5 surprising health benefits of green chilli : मिरच्या तिखट लागतात म्हणून आपण त्या काढून बाजूला ठेवतो, पण मिरच्या खाण्याचे आहेत अनेक फायदे....

रोजच्या स्वयंपाकात आपण हिरव्या मिरच्या आवर्जून वापरतोच. कोणतीही भाजी, आमटी, डाळ असो खमंग फोडणीसाठी हिरवी मिरची लागतेच. कोणत्याही पदार्थाला तिखटपणा आणण्यासाठी आपण त्यात हिरवी मिरची घालतोच. असे असले तरीही, हिरव्या मिरच्या फक्त तिखटपणा वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठी देखील (5 health benefits of eating green chilies with your meals) तितकीच फायदेशीर असते. शरीरातील चरबी वितळवण्यापासून हृदयाचं रक्षण करण्यापर्यंत मिरच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असतात. हिरव्या मिरच्यांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम आणि लोह यासारखे आवश्यक (Top 5 Health Benefits Of Green Chillies) पोषक घटक असतात. यासोबतच, तिच्यामध्ये असणारे अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स, कॅप्सेसिन (Capsaicin), आणि फायटोन्यूट्रिएंट्स हे वजन कमी करण्यास, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास, पचन सुधारण्यास, आणि अगदी हृदयविकाराचा धोका कमी करण्यासही मदत करतात(5 surprising health benefits of green chilli).

हिरव्या मिरच्या खाताना शक्यतो तिखट लागतात म्हणून आपण त्या काढून बाजूला ठेवतो. परंतु हिरव्या मिरच्या खाल्ल्याने त्याचे आपल्या आरोग्यासाठी दुप्पट फायदे मिळतात. नवी दिल्ली येथील जनरल फिजिशियन, एमबीबीएस डॉ. सुरेंद्र कुमार यांनी नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीनुसार, हिरव्या मिरच्यांमध्ये असलेले कॅप्सेसिन नावाचे घटक चयापचय क्रियेचा वेग वाढवते, ज्यामुळे वजन जलद गतीने कमी होण्यास मदत होते . हे घटक पचन सुधारते आणि भूक नियंत्रित करते, तसेच, हिरव्या मिरच्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण नगण्य असते, ज्यामुळे वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ते योग्य ठरते. यासाठीच हिरव्या मिरच्या खाण्याचे नेमके फायदे काय आहेत ते पाहूयात. 

हिरव्या मिरच्या खाण्याचे फायदे... 

१. हृदयासाठी :- हिरव्या मिरच्यांमध्ये असलेले कॅप्सेसिन रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. हे रक्तवाहिन्या निरोगी ठेवते आणि हृदयरोगाचा धोका कमी करते. याशिवाय, हिरव्या मिरच्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असतात. 

चालाल तर जगाल! डॉक्टर सांगतात, शुगर आणि वेटलॉससाठी किती वेळ चालावं? चालण्याचे मिळतील दुप्पट फायदे...

२. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास :- हिरव्या मिरच्यांमध्ये व्हिटॅमिन 'सी' चे प्रमाण जास्त असते, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. सर्दी, खोकला आणि इतर संसर्गांशी लढण्यास मदत करते. याशिवाय, हिरव्या मिरच्यांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात, जे हानिकारक बॅक्टेरिया आणि विषाणूंपासून शरीराचे संरक्षण करतात.

३. त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी :- हिरव्या मिरच्यांमध्ये व्हिटॅमिन 'ए' आणि 'सी' भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते. यासोबतच, त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्यास मदत करते आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करते. याशिवाय, व्हिटॅमिन 'ए' दृष्टी सुधारते आणि मोतीबिंदूसारख्या समस्या  कमी करण्यास मदत करते. 

स्वतःला लावलेल्या 'या' ६ सवयींमुळेच रेखाचं सौंदर्य आहे खास! वयाच्या सत्तरीतही सुंदरच..

४. पचनक्रिया सुधारते :- हिरव्या मिरच्यांमध्ये आढळणारे घटक पाचक एंजाइम्सचे स्राव वाढवतात, ज्यामुळे अन्नाचे पचन सुधारते. याचबरोबर, गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून आराम देण्यास मदत करते. सोबतच, हिरव्या मिरच्यांमध्ये असलेले फायबर आतडे स्वच्छ करण्यास मदत करते, ज्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते.

५. वेटलॉससाठी :- हिरव्या मिरच्यांमध्ये असलेले कॅप्सेसिन घटक चयापचय वाढवते, ज्यामुळे शरीर अधिक कॅलरीज बर्न करते. हे घटक शरीरात उष्णता निर्माण करते, ज्यामुळे चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगवान होते. याशिवाय, हिरव्या मिरच्यांमध्ये फायबर देखील असते, जे पोट बराच काळ भरलेले ठेवते आणि जास्त खाण्यापासून रोखते. हिरव्या मिरच्यांचा समावेश आहारात केल्यास वजन कमी करण्यास मदत होते.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सफिटनेस टिप्स