Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डाळ खाल्ल्यानंतर गॅस, अ‍ॅसिडिटी, ब्लोटिंगचा त्रास? न्यूट्रिशनिस्ट सांगतात ५ उपाय - पचन होईल सहज...

डाळ खाल्ल्यानंतर गॅस, अ‍ॅसिडिटी, ब्लोटिंगचा त्रास? न्यूट्रिशनिस्ट सांगतात ५ उपाय - पचन होईल सहज...

5 Easy Ways To Avoid Bloating After Eating Dal : How to Prevent Bloating After Eating Dal : Tips to Avoid Gas and Bloating from Dal : Dal Eating Tips to Prevent Gas and Acidity : डाळ खाल्ल्यामुळे आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारी सतावतात, अशावेळी करावेत सोपे उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2025 13:25 IST2025-07-18T13:15:01+5:302025-07-18T13:25:27+5:30

5 Easy Ways To Avoid Bloating After Eating Dal : How to Prevent Bloating After Eating Dal : Tips to Avoid Gas and Bloating from Dal : Dal Eating Tips to Prevent Gas and Acidity : डाळ खाल्ल्यामुळे आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारी सतावतात, अशावेळी करावेत सोपे उपाय...

5 Easy Ways To Avoid Bloating After Eating Dal How to Prevent Bloating After Eating Dal Tips to Avoid Gas and Bloating from Dal Dal Eating Tips to Prevent Gas and Acidity | डाळ खाल्ल्यानंतर गॅस, अ‍ॅसिडिटी, ब्लोटिंगचा त्रास? न्यूट्रिशनिस्ट सांगतात ५ उपाय - पचन होईल सहज...

डाळ खाल्ल्यानंतर गॅस, अ‍ॅसिडिटी, ब्लोटिंगचा त्रास? न्यूट्रिशनिस्ट सांगतात ५ उपाय - पचन होईल सहज...

'डाळ' हा आपल्या भारतीय आहारातील सर्वात महत्वाचा पदार्थ आहे. रोजच्या आहारात आपण हमखास वेगवेगळ्या डाळींचा समावेश करतोच. डाळीमध्ये  फायबर, प्रथिने, लोह, झिंक, फोलेट आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. विशेषतः शाकाहारी लोकांसाठी डाळी प्रथिनांचा (5 Easy Ways To Avoid Bloating After Eating Dal) एक उत्कृष्ट स्रोत मानल्या जातात. त्यामुळे भारतातील बहुतांश घरांमध्ये दररोज आहारात डाळ ( How to Prevent Bloating After Eating Dal) तयार केली जाते. डाळ आहारातील महत्वाचा पदार्थ असला तरी अनेकांना डाळ खाल्ल्यानंतर गॅसेस, ॲसिडिटी किंवा ब्लोटिंगसारख्या पचनाच्या तक्रारी होतात. पोट फुगणे, जड वाटणे, जळजळ होणे किंवा सतत ढेकर येणे (Tips to Avoid Gas and Bloating from Dal) ही सामान्य लक्षणं असू शकतात. यामागे डाळी योग्य रीतीने न शिजवणे, अतिरिक्त मसाल्यांचा वापर, किंवा एखाद्या विशिष्ट डाळीचा वेगळा गुणधर्म अशी अनेक कारणे असू शकतात(Dal Eating Tips to Prevent Gas and Acidity).

अनेकदा डाळ खाल्ल्यामुळे आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारी सतावतात ज्यामुळे डाळ खाणं अनेकांना त्रासदायक वाटू लागतं. पण याचा अर्थ असा नाही की आपण डाळ खाणं बंदच करावं. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी डाळ करताना काही खास उपायांचा वापर केल्यास  डाळ खाल्ल्यानंतर पोटाशी संबंधित अनेक समस्या टाळतात येतात. यामुळे फक्त त्रास कमी होणार नाही, तर डाळींची चव देखील अधिक स्वादिष्ट होईल. यासाठी काय करायचं ते पाहा... 

डाळ खाल्ल्यानंतर गॅसेस, ॲसिडिटी किंवा ब्लोटिंग का होते ? 

मुळातच डाळींमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ज्या लोकांच्या रोजच्या आहारात फायबरचं प्रमाण कमी असतं, त्यांना डाळ खाल्ल्यानंतर पोट फुगणे किंवा गॅसची समस्या अधिक जाणवते. याशिवाय, डाळींमध्ये FODMAPs नावाचे काही प्रकारचे साखरेचे घटक असतात. हे घटक काही लोकांच्या शरीरात अधिक प्रमाणात गॅस तयार होण्याचं आणि पोट फुगण्याचं मुख्य कारण ठरू शकतात. त्यामुळे ही समस्या काही लोकांमध्ये अधिक तीव्रतेने जाणवते. 

शिल्पा शेट्टी करते एक उपाय, चेहऱ्यावर चमक-फिगर मेण्टेन! चाळिशीतही दिसतेय हॉट कारण...

डाळ खाल्ल्यानंतर गॅसेस, ॲसिडिटी किंवा ब्लोटिंग होऊ नये म्हणून... 

१. न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह पांचाळ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन डाळीमुळे होणाऱ्या ब्लोटिंगविषयी काही उपयुक्त उपाय सांगितले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, " खरी समस्या डाळीत नाही, तर ती तयार करण्याच्या पद्धतीत असू शकते. डाळ योग्य पद्धतीने शिजवली नाही तर ती पचनासाठी अवघड ठरू शकते.

२. जर डाळ खाल्ल्यानंतर ब्लोटिंगची समस्या टाळायची असेल, तर प्रत्येकवेळी डाळ शिजवताना त्यामध्ये हिंग घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे. श्वेता शाह यांच्या म्हणण्यानुसार, हिंग घालण्यामुळे डाळींमधील कार्बोहायड्रेट्सचे विघटन होण्यास मदत होते, जे अनेकदा पोटात गॅस तयार होण्याचं प्रमुख कारण असतात. त्यामुळे हिंग वापरल्यास डाळ अधिक सहज पचते आणि पोटाशी संबंधित तक्रारी टाळता येतात.

तीन तिघाडा काम बिघाडा ही विसरा, '३-३-३ चा नियम' पाळा - वजन होईल किमी जबरदस्त वेगाने...

३. डाळ अगदी सहजतेने पचायला हवी म्हणून मोहरी, जिऱ्याची फोडणी द्यावी. डाळीला जिरे, मोहरीची फोडणी दिल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. ज्यामुळे पोटाशी संबंधित त्रास, जसे की गॅस, फुगणे किंवा जडपणा, यापासून आराम मिळतो.

४. डाळ खाल्ल्यानंतर गॅसेस, ॲसिडिटी किंवा ब्लोटिंग होऊ नये म्हणून लिंबाचा रस फायदेशीर ठरतो. डाळ शिजून झाली की त्यात थोडासा लिंबाचा रस घाला. लिंबाचा रस फक्त डाळीचा स्वादच वाढवत नाही, तर आयर्नच्या शोषणात मदत करतो आणि पचन एन्झाईम्सना देखील ॲक्टिव्ह करतो, ज्यामुळे डाळी  सहजपणे पचायला मदत होते.

५. डाळीमुळे होणाऱ्या ब्लोटिंगपासून बचाव करण्यासाठी, डाळ शिजवण्याआधी ती कमीत कमी ८ ते १० तास भिजत ठेवणं आवश्यक आहे. हे केल्याने डाळींमधील फायटिक अ‍ॅसिड कमी होतो, ज्यामुळे ती पचायला अधिक सोपी होते. यामुळे पोटात गॅस, फुगणे किंवा जडपणा यांसारख्या समस्या टाळता येतात.


Web Title: 5 Easy Ways To Avoid Bloating After Eating Dal How to Prevent Bloating After Eating Dal Tips to Avoid Gas and Bloating from Dal Dal Eating Tips to Prevent Gas and Acidity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.