रक्ताच्या कमतरतेमुळे शरीरावर अनेक प्रकारची लक्षणं दिसून येतात. काही लोकांना वारंवार सर्दी होते हे तुम्ही पाहिलं असेलच. अशा परिस्थितीत शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता भासू नये म्हणून लाईफस्टाईल सुधारली पाहिजे. शरीरात हिमोग्लोबिनची नॉर्मल रेंज राखणं खूप महत्त्वाचं आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असताना अनेक प्रकारची लक्षणं दिसून येतात. तुम्ही लक्ष दिलं नाहीत तर ते खूप धोकादायक ठरू शकतं.
शरीरात व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे वारंवार सर्दी होते. म्हणून, जेव्हा जेव्हा तुम्हाला वारंवार सर्दी होते तेव्हा तुम्हाला या लक्षणांकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. शरीरात रक्ताची कमतरता असल्याने चक्कर येणं, अशक्तपणा आणि बेशुद्ध होणं यासारख्या समस्या उद्भवू लागतात. यामागील कारण असं आहे की, जेव्हा शरीरातील लाल रक्तपेशी सामान्यपेक्षा कमी होऊ लागतात तेव्हा शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते.
अशा परिस्थितीत तुमच्या शरीरात अशक्तपणाची समस्या निर्माण होते. जर शरीरात रक्ताची कमतरता योग्य वेळी दूर झाली नाही तर त्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. शरीरात लोहाची कमतरता हे अशक्तपणाचं कारण मानलं जातं. शरीरातील अशक्तपणाची लक्षणं आणि रक्ताची कमतरता कशी दूर करावी हे जाणून घेऊया.
रक्त कमी होण्याची लक्षणं
- अशक्तपणा जाणवणं
- चक्कर येणं
- श्वास घेण्यास त्रास होणं
- डोकेदुखी
- हातपाय थंड पडणं
तुमच्या आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा
पालक
जेव्हा शरीरात लोहाची कमतरता असते तेव्हा रक्ताची कमतरता असते, अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात पालकाचा समावेश केला पाहिजे. पालकामध्ये भरपूर लोह असते, जे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत करतं.
टोमॅटो
जर तुम्हाला अशक्तपणाचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या जेवणात टोमॅटो जरूर खावा. रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी टोमॅटो खूप उपयुक्त आहे. तुम्ही दररोज सॅलड, भाजी किंवा सूप बनवून पिऊ शकता.
केळी
जर तुम्हाला अशक्तपणा असेल तर दररोज केळी खा. केळीमध्ये मुबलक प्रमाणात लोह आणि पोटॅशियम असते. ज्यामुळे रक्ताची कमतरता लवकर भरून निघू शकते. यामुळे अशक्तपणाची समस्या दूर होते.
मनुका
शरीरात रक्ताची कमतरता असल्यास दररोज ४ ते ५ मनुके धुवून दुधात उकळा. आता दूध कोमट झाल्यावर प्या. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ते दिवसातून दोनदा पिऊ शकता. मनुका शरीरात रक्त निर्मितीस मदत करतो आणि अशक्तपणा देखील दूर करतो.