Join us   

कंबर-पाठ खूपच दुखते? कॅल्शियमचा खजिना आहेत ६ पदार्थ, रोज खा- हाडांची दुखणी कायमची गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 1:21 PM

5 Best Calcium Foods : कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. ज्यामुळे पोट थंड राहण्यास मदत होते.

ऊन्हाळ्याच्या दिवसांत अशा खाद्यपदार्थांचे सेवन करायला हवे ज्यात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. (Health Tips) कॅल्शियम एक असं तत्व आहे जे हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी, हाडांना मजबूत बनवण्यासाठी, मांसपेशींच्या विकासासाठी फायदेशीर ठरते. (Add These 7 Calcium Rich Food During Summer To Make Your Bones And Muscles Strong)

प्रियांशी भटनागर यांनी काही कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. ज्यामुळे मांसपेशी आणि हाडं चांगली राहण्यास मदत होते. आहारतज्ज्ञ प्रियांशी भटनागर यांनी कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. ज्यामुळे पोट थंड राहण्यास मदत होते.  (Food Sources Of Calcium For Your Bones)

१) दही

प्लेन किंवा ग्रीक दही कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे.  गरमीच्या दिवसांत तुम्ही दह्याचे सेवन करू शकता. स्वाद आणि पोषण वाढवण्यास मदत होते. गरमीच्या दिवसांत फळांचे सेवन करा. 

२) चीझ

चेदर, मोजरेला किंवा स्विस यांसारख्या कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. सॅलेड, सॅण्डविच पनीर स्लाईसचा आहारात समावेश करा. ताज्या फळांबरोबर चीझ प्लेटरचा आहारात समावेश करू शकता. 

३) गाईचे आणि बदामाचे दूध

गाईचे दूध, बदामाचे दूध कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहेत. फोर्टिफाईड सोया दूधाचे सेवन नियमित करत राहा. जास्त प्रमाणात कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन करू नका. 

दिवसातून २ वेळा चालता तरी ढेरी कमी होईना? पाहा चालण्याची योग्य पद्धत, पटकन स्लिम व्हाल

४) पालेभाज्या

केल पोषक तत्वांनी परिपूर्ण अशी पालेभाजी आहे. यात कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय सॅलेड, स्मूदी किंवा साईड डिशच्या स्वरूपात तुम्ही याचे सेवन करू शकता. पालक एक कॅल्शियमने परिपूर्ण भाजी आहे. कोलार्ड ग्रीन्स उकळून किंवा भाजून खा.  यात कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. 

५) नट्स आणि सिड्स

बदाम कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहेत. यात सॅलेड किंवा दह्याच्या स्वरूपात सेवन करू शका. चिया सिड्समध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. यात चिया सिड्स पुडींग तयार करण्यासाठी स्मूदी मिसळून याचे सेवन करा.

पोट सुटलं-पोटामुळे कंबर जाड दिसते? १ ग्लास पाण्यात हा पदार्थ घ्या-१५ दिवसांत चरबी गायब

६) फोर्टिफाईड फूड्स

सकाळच्यावेळी कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन करा. एक ग्लास फोर्टिफाईड संत्र्याच्या रसाचे सेवन करा. ऊन्हाळ्याच्या  दिवसांत कॅल्शियमयुक्त फोर्टिफाईड फुड्सचा आहारात  समावेश करा. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स