जर तुम्ही केस विंचरण्यासाठी प्लास्टिकचा कंगवा वापरत असाल तर आताच थांबा. कारण लाकडी कंगवा वापरण्याचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्हीही जुना कंगवा सोडून नवीन लाकडी कंगवा वापरायला सुरुवात कराल. लाकडी कंगवा वापरण्याचे फायदे जाणून घेऊया...
ब्लड सर्क्युलेशन नीट होतं
लाकडी कंगवा वापरून जेव्हा तुम्ही केस विंचरता तेव्हा स्काल्पवर दाब पडतो, ज्यामुळे स्काल्पमधील अॅक्यूपंक्चर पॉइंट्स उत्तेजित होतात आणि ब्लड सर्क्युलेशन नीट होतं.
केसांची मुळं मजबूत होतात
ब्लड सर्क्युलेशन नीट झाल्यामुळे केसांची मुळं अधिक मजबूत होतात आणि केसही कमी गळतात.
केसांना पोषण मिळतं
लाकडी कंगवा वापरल्याने स्काल्पमध्ये असलेलं नॅचरल ऑईल तुमच्या केसांमध्ये सम प्रमाणात जातं. असे केल्याने केस तुटणं, केस गळणं अशा समस्या दूर होतात.
केस तुटण्याची समस्या कमी होते
लाकडी कंगवा वापरल्याने केस तुटणं आणि केस गळणं कमी होतं. लाकडी कंगवा केसांमधून सहजतेने फिरवता येतो.
स्काल्प अॅलर्जी कमी होते
सेन्सेटिव्ह स्काल्प असलेल्या लोकांसाठी लाकडी कंगवा अत्यंत बेस्ट आहे. स्काल्प अॅलर्जीची समस्या देखील दूर होते.