Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > तुमची कंबर रोजच दुखते का? ५ चुकीच्या गोष्टींमुळे होतो हा त्रास- बघा नेमकं कुठे चुकतंय

तुमची कंबर रोजच दुखते का? ५ चुकीच्या गोष्टींमुळे होतो हा त्रास- बघा नेमकं कुठे चुकतंय

What Are The Common Reasons For Back Pain? : काही जणांची कंबर रोजच दुखते. यामध्ये महिलांचं प्रमाण तर जास्त आहे. बघा असं होण्यामागे नेमकं कारण काय..(how to get relief from back pain?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2025 10:33 IST2025-06-19T10:32:51+5:302025-06-19T10:33:45+5:30

What Are The Common Reasons For Back Pain? : काही जणांची कंबर रोजच दुखते. यामध्ये महिलांचं प्रमाण तर जास्त आहे. बघा असं होण्यामागे नेमकं कारण काय..(how to get relief from back pain?)

5 basic reasons for constant back pain, how to get relief from back pain, what are the reasons for back pain  | तुमची कंबर रोजच दुखते का? ५ चुकीच्या गोष्टींमुळे होतो हा त्रास- बघा नेमकं कुठे चुकतंय

तुमची कंबर रोजच दुखते का? ५ चुकीच्या गोष्टींमुळे होतो हा त्रास- बघा नेमकं कुठे चुकतंय

Highlightsखाली वाकून नेहमीच ओझं उचलत असाल आणि खालच्या वस्तू उचलताना जर तुम्ही चुकीच्या पोश्चरमध्ये खाली झुकत असाल तर त्यामुळेही कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो.

ज्या महिला साधारण पस्तिशीच्या पुढे आहेत किंवा ज्यांचं पहिलं बाळंतपण तरी झालेलं आहे, अशा बहुसंख्य महिलांना कंबरदुखीचा त्रास होतो. एखाद्या दिवशी कामाची खूप दगदग झाली, धावपळ झाली तर कंबर दुखणं समजू शकतं. पण काही लोक मात्र असे आहेत की त्यांना रोजच कंबरदुखीचा त्रास होतो. रात्री अंथरुणावर पाठ टेकवल्यानंतर तर हा त्रास खूप जास्त वाढतो (5 basic reasons for constant back pain). यात पुरुषांचं प्रमाणही भरपूर आहे. कंबरदुखीचा त्रास असा रोजच होत असेल तर तुमच्या लाईफस्टाईलमधल्या काही गोष्टी त्यासाठी निश्चितच कारणीभूत असू शकतात (What Are The Common Reasons For Back Pain?). असं काही तुमच्या बाबतही चुकतंय का ते एकदा बघून घ्या..(how to get relief from back pain?)

 

कंबरदुखी कशामुळे होते?

१. बसण्याची चुकीची पद्धत हे कंबरदुखीचं एक महत्त्वाचं कारण आहे. काही लोक बसताना, चालताना पाठीला बाक काढतात. यामुळे मग कंबरेवर ताण येतो. बऱ्याचदा आपण कामासाठी ज्या खुर्चीवर जास्तीतजास्त बसतो, त्या खुर्चीची पोझिशन जर योग्य नसेल तर त्यामुळेही कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो.

स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येकाला माहितीच पाहिजेत 'या' गोष्टी, पोषण मिळेल भरपूर- स्वयंपाक होईल चवदार

२. काही लोकांना खूप जास्त दुचाकी चालविल्यामुळे कंबरदुखीचा त्रास होतो. कारण बऱ्याच शहरांमध्ये रस्त्यांवर असणारे खड्डे हा एक डोकेदुखीचा विषय झाला आहे. त्यामुळे तुमच्या बाबतीतही तेच होत आहे का, तुमच्या दुचाकीचे सस्पेंशन चांगले आहेत का, तिला सर्व्हिसिंग करण्याची गरज तर नाही ना हे एकदा तपासून पाहा.

 

३. शरीरात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम या दोन्ही पदार्थांची कमतरता असेल तर त्यामुळेही कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो.

पावसाळ्यात लाकडी दरवाजे फुगून गच्चं झाले? ३ घरगुती उपाय, दरवाजे उघडतील चटकन

४. रात्री तुम्ही ज्या गादीवर झोपता ती गादी वेडीवाकडी असेल, खूप जास्त मऊ किंवा खूप जास्त कडक असेल तर अशावेळीही कंबर दुखू शकते.

५. खाली वाकून नेहमीच ओझं उचलत असाल आणि खालच्या वस्तू उचलताना जर तुम्ही चुकीच्या पोश्चरमध्ये खाली झुकत असाल तर त्यामुळेही कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो.

 

Web Title: 5 basic reasons for constant back pain, how to get relief from back pain, what are the reasons for back pain 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.