Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सावधान! 'इन्टिमेट वॉश'चा अतिवापर पडला महागात; महिलेचे अवयव निकामी होण्याची आली वेळ

सावधान! 'इन्टिमेट वॉश'चा अतिवापर पडला महागात; महिलेचे अवयव निकामी होण्याची आली वेळ

एका ४० वर्षीय सुशिक्षित महिलेला केवळ 'व्हजायनल वॉश'च्या अतिवापरामुळे गंभीर संसर्ग झाला आणि तिचे अवयव निकामी होण्याची परिस्थिती ओढवली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 15:41 IST2026-01-20T15:37:44+5:302026-01-20T15:41:42+5:30

एका ४० वर्षीय सुशिक्षित महिलेला केवळ 'व्हजायनल वॉश'च्या अतिवापरामुळे गंभीर संसर्ग झाला आणि तिचे अवयव निकामी होण्याची परिस्थिती ओढवली.

40 year old suffers from UTIs for 6 months, urologist says she was ‘one step away from organ failure’: ‘If this story scared you…’ | सावधान! 'इन्टिमेट वॉश'चा अतिवापर पडला महागात; महिलेचे अवयव निकामी होण्याची आली वेळ

सावधान! 'इन्टिमेट वॉश'चा अतिवापर पडला महागात; महिलेचे अवयव निकामी होण्याची आली वेळ

महिलांच्या स्वच्छतेसाठी बाजारात मिळणारी विविध उत्पादनं कधीकधी फायद्याऐवजी जीवघेणी ठरू शकतात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एका ४० वर्षीय सुशिक्षित महिलेला केवळ 'व्हजायनल वॉश'च्या अतिवापरामुळे गंभीर संसर्ग झाला आणि तिचे अवयव निकामी होण्याची परिस्थिती ओढवली.

जालंधरमधील प्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉ. वरिंदर विरदी यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. संबंधित महिला एका नामांकित कॉर्पोरेट कंपनीत काम करते. तिला गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) होत होतं. दरवेळी अँटिबायोटिक्स घेतल्यावर तिला तात्पुरता आराम मिळे, पण काही दिवसांतच हा त्रास पुन्हा सुरू व्हायचा. तिला मधुमेह किंवा किडनी स्टोन यांसारखा कोणताही जुना आजार नव्हता, तरीही हा संसर्ग पाठ सोडत नव्हता.

एका रात्री या महिलेला अचानक १०४ ताप आला, उलट्या सुरू झाल्या. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या तपासणीत असं आढळलं की, संसर्ग इतका वाढला होता की तो रक्तामार्गे किडनीपर्यंत पोहोचला होता. ही अवस्था 'युरोसेप्सिस' नावाच्या गंभीर आजाराची होती, ज्यामध्ये शरीराचे महत्त्वाचे अवयव काम करणं बंद करू शकतात.

अति-स्वच्छता ठरली कारणीभूत

डॉक्टरांनी जेव्हा या महिलेला तिच्या सवयींबद्दल विचारणा केली, तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. ही महिला एका मैत्रिणीच्या सांगण्यावरून गेल्या सहा महिन्यांपासून दर ३-४ दिवसांनी 'व्हजायनल वॉश' वापरत होती. तिला वाटलं की, यामुळे स्वच्छता राहील आणि संसर्ग होणार नाही.

तज्ज्ञांच्या मते, योनीमार्गामध्ये (Vagina) नैसर्गिकरित्या काही 'चांगले बॅक्टेरिया' असतात, जे त्या भागाचे पीएच (pH) संतुलन राखून हानिकारक जंतूंपासून संरक्षण करतात. जेव्हा सुगंधी किंवा केमिकल असलेले वॉश वारंवार वापरले जातात, तेव्हा हे चांगले बॅक्टेरिया नष्ट होतात. परिणामी नैसर्गिक संरक्षण कवच निघून गेल्यामुळे संसर्ग अधिक वेगाने पसरतो.

तज्ज्ञांचा इशारा आणि खबरदारी

ठाणे येथील केआयएमएस (KIMS) रुग्णालयाचे युरोलॉजिस्ट डॉ. आकिल खान यांनी या संदर्भात खालील महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत:

नैसर्गिक स्वच्छता - योनीमार्ग हा स्वतःची स्वच्छता स्वतः करणारा अवयव आहे. बाह्य स्वच्छतेसाठी फक्त साधं पाणी पुरेसं आहे. 

सुगंधी उत्पादनं टाळा - सुगंधी साबण, स्प्रे किंवा केमिकल युक्त वॉश वापरल्याने नैसर्गिक ओलावा आणि बॅक्टेरियांचं संतुलन बिघडतं. 

UTI कडे दुर्लक्ष नको - जर सहा महिन्यांत दोन पेक्षा जास्त वेळा युटीआय होत असेल, तर फक्त औषधे न घेता 'युरिन कल्चर' आणि 'अल्ट्रासाऊंड' करून मूळ कारण शोधणं आवश्यक आहे. 

युरोसेप्सिसचा धोका - युटीआयवर वेळीच उपचार न झाल्यास तो किडनीपर्यंत पोहोचतो आणि जीवघेणा ठरू शकतो.

ही घटना अशा सर्व महिलांसाठी एक धडा आहे ज्या जाहिरातींना बळी पडून किंवा कोणाच्याही सल्ल्याने अशा उत्पादनांचा वापर करतात. स्वच्छतेसाठी  कोणतीही उत्पादनं वापरण्यापूर्वी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

Web Title : इंटिमेट वॉश के अत्यधिक उपयोग से अंग विफलता: एक चेतावनी

Web Summary : योनि धोने के अत्यधिक उपयोग से एक महिला को गंभीर संक्रमण हुआ, जिससे अंग विफलता का खतरा हो गया। डॉक्टर बार-बार उपयोग के खिलाफ चेतावनी देते हैं, प्राकृतिक पीएच संतुलन को बाधित करते हैं। बाहरी सफाई के लिए सादा पानी पर्याप्त है; किसी भी उत्पाद का उपयोग करने से पहले स्त्री रोग विशेषज्ञ से परामर्श लें।

Web Title : Intimate wash overuse leads to organ failure: A cautionary tale

Web Summary : Overuse of vaginal wash caused a woman severe infection, risking organ failure. Doctors warn against frequent use, disrupting natural pH balance. Simple water is sufficient for external cleaning; consult a gynecologist before using any products.