Join us

हार्ट ॲटॅक येण्याच्या काही मिनिटे आधी शरीरात दिसतात ४ लक्षणं- चटकन ओळखली तर जीव वाचू शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2025 14:10 IST

4 Symptoms You Can Feel Before Few Minutes of Heart Attack: हार्ट ॲटॅक येण्याच्या काही मिनिटे आधी शरीरात काही बदल जाणवायला सुरुवात होते. ती लक्षणं आपण ओळखू शकलो तर धोका टळू शकतो..(what are the symptoms of heart attack?)

ठळक मुद्दे हार्ट ॲटॅक येण्याच्या आधी काही मिनिटे शरीरात काही बदल व्हायला सुरुवात होते. ते बदल नेमके कोणते?

कमी वयात हार्ट ॲटॅक येण्याचे प्रमाण हल्ली खूप जास्त वाढले आहे. अभिनेत्री करिश्मा कपूरचे पती उद्योजक संजय कपूर हे त्यापैकीच एक उदाहरण. संजय अतिशय फिट होते. जेव्हा त्यांना हार्ट ॲटॅक आला तेव्हा ते गोल्फ खेळत होते. यावरूनच त्यांचा फिटनेस किती चांगला होता हे दिसून येते. अशा फिट दिसणाऱ्या व्यक्तीला अचानक हार्ट ॲटॅक येतो आणि त्यात त्यांचा जीव जातो, अशा कितीतरी दुर्दैवी घटना आपण आपल्या आजुबाजुला पाहात आहोत. त्यामुळेच हार्ट ॲटॅक का येतो, तो येण्यापुर्वी शरीरात काय बदल होतात (4 symptoms you can feel before few minute of heart attack), एखाद्या व्यक्तीला किंवा आपल्यालाच स्वत:ला हार्ट ॲटॅक येत असेल तर लगेचच कोणत्या गोष्टी अगदी तातडीने करणं गरजेचं आहे, याची माहिती प्रत्येकाला असायला हवी (body shows 4 changes before heart attack). त्यापैकी हार्ट ॲटॅक येण्यापुर्वी शरीरात काय बदल होतात, याविषयीची माहिती आता घेऊया..(what are the symptoms of heart attack?)

 

हार्ट ॲटॅक येण्यापुर्वी शरीरात कोणती लक्षणं दिसू लागतात?

हार्ट ॲटॅक येण्याच्या आधी काही मिनिटे शरीरात काही बदल व्हायला सुरुवात होते. ते बदल नेमके कोणते याविषयी डॉ. कपिल त्यागी यांनी दिलेली माहिती नवभारत टाईम्सने प्रकाशित केली आहे. त्यामध्ये त्यांनी ३ प्रमुख  लक्षणं सांगितली आहेत.

तुमची कंबर रोजच दुखते का? ५ चुकीच्या गोष्टींमुळे होतो हा त्रास- बघा नेमकं कुठे चुकतंय

१. पहिलं लक्षण म्हणजे हार्ट ॲटॅक येण्याच्या आधी छातीचा भाग अगदी आवळून घेतल्याप्रमाणे होत आहे, असं जाणवते. आपल्या छातीवर खूप काहीतरी ओझं ठेवलं आहे, असं वाटू लागतं. श्वास घ्यायलाही त्रास होतो आणि छाती दबल्यासारखी वाटते.

 

२. आपल्या आसपास आपण काही उदाहरणं पाहिली असतील त्यामध्ये प्रामुख्याने असं दिसून येतं की हार्ट ॲटॅक येणाऱ्या व्यक्तीला दरदरून घाम येतो. डोकं, मान, पाठ हे भाग घाम येऊन थंड होतात.

Vitamin D Deficiency: उन्हात जाणं होत नाही? ५ पदार्थ रोज खा- व्हिटॅमिन डी भरपूर मिळेल

३. हार्ट ॲटॅक येण्याच्या आधी काही व्यक्तींचा जबडा, मानेचा भाग आखडून गेल्यासारखा होतो.

४. अचानक मळमळ होऊन उलटी होणे, पोट खराब असल्यासारखे वाटणे असा त्रासही हार्ट ॲटॅक येण्याच्या काही मिनिटे आधी होतो. त्यामुळे अशी काही लक्षणं दिसल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहृदयविकाराचा झटकाहृदयरोगकरिश्मा कपूरसंजय कपूर