झोप ही शरीरासाठी तितकीच महत्त्वाची आहे जितकं अन्न आणि पाणी. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकजण झोपेकडे दुर्लक्ष करतात. थोडी झोप कमी झाली तरी चालते, असं वाटतं, पण प्रत्यक्षात झोपेची कमतरता शरीर आणि मेंदूवर हळूहळू परिणाम करत राहते. (4 symptoms that indicate lack of sleep, your body tells about your mental health )आळस, डोळे जड होणं किंवा दिवसभर थकवा ही लक्षणं तर लगेच जाणवतातच, पण काही सूक्ष्म लक्षणं अशी असतात जी पटकन लक्षात येत नाहीत.
सर्वात महत्त्वाचं आणि दुर्लक्षित लक्षण म्हणजे विसरण्याची सवय वाढणं. लहानसहान गोष्टी विसरणं, कामं लक्षात न राहणं किंवा एखादी गोष्ट सांगताना मध्येच विसरणं, हे सगळं झोपेच्या कमतरतेचे संकेत असू शकतात. कारण झोप ही मेंदूच्या मेमरी प्रोसेससाठी खूप गरजेची असते.
एकाग्रता कमी होणं हे ही मोठं लक्षण आहे. काम करताना लक्ष न लागणं, वारंवार चूक होणं किंवा एखाद्या गोष्टीवर जास्त वेळ लक्ष केंद्रित न करता येणं, हे झोप अपुरी असल्यामुळे होतं. त्यामुळे कामाची गुणवत्ता देखील कमी होते. मूड स्विंग्स म्हणजेच मनःस्थितीत सतत बदल होणंही झोपेच्या कमतरतेचं लक्षण आहे. कधी चिडचिड, कधी अनावश्यक राग, कधी अचानक उदास वाटणं, हे सगळं झोपेचा अभाव दाखवतं. काही लोकांना अगदी छोट्या गोष्टींवरुनही राग येऊ लागतो.
भूक आणि खाण्याच्या सवयी बदलणं एक सूक्ष्म लक्षण आहे. झोप कमी झाली की शरीरातील हार्मोन्स बिघडतात आणि त्यामुळे कधी खूप भूक लागते तर कधी अजिबात खाण्याची इच्छा होत नाही. विशेषतः गोड किंवा जंक फूड खाण्याची इच्छा वाढते. त्वचेवरही त्याचा परिणाम दिसतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळे, त्वचा निस्तेज दिसणं किंवा पिंपल्स येणं, ही लक्षणंही झोप अपुरी असल्याचं सांगतात. शरीराला स्वतःची दुरुस्ती (repair) करण्यासाठी झोप आवश्यक असते.
इम्युनिटी कमी होणं हे आणखी एक महत्त्वाचं पण दुर्लक्षित लक्षण आहे. वारंवार सर्दी, खोकला किंवा इतर त्रास होणं हे झोपेच्या कमतरतेमुळे होऊ शकतं. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. डोळ्यांवर ताण येणं, डोळे कोरडे पडणं किंवा जड वाटणं हे संकेत आहेत. स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवणाऱ्यांमध्ये हे अधिक दिसून येतं, विशेषतः जेव्हा झोप अपुरी असते. काही वेळा शरीरात वेदना जाणवतात, मान, पाठ किंवा स्नायूंमध्ये दुखणं वाढतं. झोप पूर्ण न झाल्यामुळे स्नायूंना पुरेशी विश्रांती मिळत नाही आणि त्यामुळे हे त्रास जाणवू शकतात.
Web Summary : Insufficient sleep impacts memory, concentration, mood, and immunity. Changes in appetite, skin issues, and body aches also signal sleep deprivation. Prioritize rest for overall well-being.
Web Summary : पर्याप्त नींद न लेने से याददाश्त, एकाग्रता, मनोदशा और प्रतिरक्षा पर असर पड़ता है। भूख में बदलाव, त्वचा की समस्याएं और शरीर में दर्द भी नींद की कमी का संकेत देते हैं। समग्र कल्याण के लिए आराम को प्राथमिकता दें।