Right Way of Water Drinking : पाणी आपल्या शरीरासाठी - आरोग्यासाठी किती महत्वाचं असतं हे काही वेगळं सांगायला नको. पाणी हेच जीवन आहे. म्हणूनच हेल्थ एक्सपर्ट सतत दिवसभर पुरेसं पाणी पिण्याचा सल्ला देतात. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहतं आणि अनेक आजारांपासून बचाव होण्यास मदत होते. मात्र, कळत म्हणा किंवा नकळत म्हणा पाणी पिताना जास्तीत जास्त लोक ही चूक करतात की, ते उभे राहून पाणी पितात. त्यांना जराही कल्पना नसते की, उभ्याने पाणी प्यायल्याने शरीरावर अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात. चला तर जाणून घेऊया याचे गंभीर तोटे.
फुफ्फुसांना होणारे नुकसान
उभ्याने पाणी पिण्याचा परिणाम केवळ पचनसंस्थेवरच नाही, तर फुफ्फुसांवरही होऊ शकतो. यामुळे आवश्यक पोषक घटक आणि जीवनसत्त्वे पचनसंस्था व लिव्हरपर्यंत योग्य प्रमाणात पोहोचत नाहीत. परिणामी हृदय व फुफ्फुसांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि शरीरातील ऑक्सिजन पातळीही बिघडू शकते.
किडनीशी संबंधित समस्या
उभ्याने पाणी प्यायल्यास ते कोणतीही योग्य गाळणी न होता अधिक दाबाने थेट पोटाच्या खालच्या भागात जातं. त्यामुळे किडनीशी संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो. याउलट बसून पाणी प्यायल्यास शरीर ते हळूहळू शोषून घेतं, ज्यामुळे किडनीला योग्य प्रकारे काम करणं सोपं जातं.
पचनक्रिया मंदावते
उभ्याने पाणी प्यायल्याने पचन प्रक्रियेवर वाईट परिणाम होतो. कारण पाणी वेगाने पोटात पोहोचतं, ज्यामुळे अपचन, गॅस आणि पोट फुगण्याची समस्या उद्भवू शकते.
स्नायू आणि सांध्यांवर परिणाम
उभ्याने पाणी प्यायल्यास नसांवर ताण येतो आणि शरीरातील टॉक्सिन्स योग्यरीत्या बाहेर पडत नाहीत. यामुळे कंबरदुखी, पाठीचा कडकपणा आणि सांधेदुखी यांसारख्या तक्रारी वाढू शकतात.
पाणी पिण्याची योग्य पद्धत
पाणी नेहमी बसून, पाठ सरळ ठेवून प्यावे. यामुळे पोषक घटक मेंदूपर्यंत नीट पोहोचतात आणि मेंदूचं कार्य सुधारतं. तसेच पचनसंस्था मजबूत होते व ब्लोटिंगसारख्या समस्यांचा धोका कमी होतो. प्रत्येक व्यक्तीने दिवसाला किमान ७–८ ग्लास पाणी नक्की प्यावे. यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि आरोग्य उत्तम टिकून राहते.
