Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दातांना ठणक लागण्यामागची ४ कारणं, थंड- गरम खाताच दात ठणकत असल्यास कशी काळजी घ्यावी?

दातांना ठणक लागण्यामागची ४ कारणं, थंड- गरम खाताच दात ठणकत असल्यास कशी काळजी घ्यावी?

Teeth Care Tips: दातांना ठणक का लागते किंवा दात सेन्सिटीव्ह होण्यामागची कारणं काय याविषयीची ही खास माहिती...(4 main reasons for teeth sensitivity)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2025 17:10 IST2025-02-20T17:09:20+5:302025-02-20T17:10:10+5:30

Teeth Care Tips: दातांना ठणक का लागते किंवा दात सेन्सिटीव्ह होण्यामागची कारणं काय याविषयीची ही खास माहिती...(4 main reasons for teeth sensitivity)

4 main reasons for teeth sensitivity, why teeth get sensitive, causes and remedies for teeth sensitivity | दातांना ठणक लागण्यामागची ४ कारणं, थंड- गरम खाताच दात ठणकत असल्यास कशी काळजी घ्यावी?

दातांना ठणक लागण्यामागची ४ कारणं, थंड- गरम खाताच दात ठणकत असल्यास कशी काळजी घ्यावी?

Highlightsथंड, गरम पदार्थ खाताच दातांना ठणक का लागते? दात सेन्सिटीव्ह होण्यामागची नेमकी कारणं काय?

हल्ली आपण बघतो आहोत की बहुतांश लोकांच्या दातांच्या तक्रारी खूप जास्त वाढल्या आहेत. थंड किंवा गरम पदार्थ खाण्यात आले की लगेचच काही लोकांचे दात ठणकतात. त्यांच्यातून अक्षरश: वेदना होतात आणि त्या स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसून येतात. लहान मुलांनाही हल्ली असाच त्रास बऱ्याच प्रमाणात होत आहे (why teeth get sensitive?). हा त्रास नेमका का होतो, दात सेन्सिटीव्ह होण्यामागची कारणं काय आणि त्यावर काय उपाय करता येऊ शकतो, याविषयीची ही खास माहिती..(causes and remedies for teeth sensitivity)

 

थंड, गरम पदार्थ खाताच दातांना ठणक का लागते?

थंड, गरम पदार्थ खाताच दातांना ठणक का लागते, दात सेन्सिटीव्ह होण्यामागची नेमकी कारणं काय याविषयी डॉ. सेबा परवीन यांनी दिलेली माहिती झी न्यूजने प्रकाशित केली आहे. 

नूडल्स खाण्याची खूप इच्छा होतेय? ५ गोष्टी करा- मैद्याच्या नूडल्सही होतील हेल्दी-खा पौष्टिक पोटभर

१. आपल्या दातांवर एक चमकदार पांढरट थर असतो. ज्याला आपण टूथ इनॅमल असंही म्हणतो. जर काही कारणांनी दातांवरचे इनॅमल कमी झाले तर दात सेन्सिटीव्ह होऊन त्यांना वारंवार ठणक लागते. 

२. दातांची योग्य ती काळजी घेतली नाही तर हिरड्या आणि दात यांच्यामध्ये एक सैलसरपणा येऊ लागतो. हा त्रास शक्यतो वयस्कर व्यक्तींना होतो आणि त्यामुळे दातांना ठणक लागते.

 

३. काही जण ब्रश करताना खूप हार्ड ब्रिसल्स असणारे टुथब्रश वापरतात. गरजेपेक्षा जास्त वेळ आणि जास्त जोर देऊन ब्रश करतात. असं जर वारंवार केलं तर त्यामुळे दातांवरचं इनॅमल कमी होत जातं आणि दात संवेदनशील होतात. 

'हे' ३ पदार्थ एकत्र करून केसांना लावा, ३ आठवड्यांतच केसांचे सगळे प्रॉब्लेम्स जातील

४. काही जण खाण्यापिण्याचे नियम पाळत नाहीत. गरम पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच गार पदार्थ खातात. किंवा थंड पदार्थांनंतर लगेचच गरम पदार्थ खातात. अशा विरुद्ध प्रकृतीच्या पदार्थांचा मारा दातांवर वारंवार झाल्यास दात सेन्सिटीव्ह होतात.

५. दातांचं आरोग्य जपण्यासाठी योग्य आहार घेणं गरजेचं आहे. जर तुमच्या शरीरात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर दात कमजोर आणि संवेदनशील होत जातात. 
 

Web Title: 4 main reasons for teeth sensitivity, why teeth get sensitive, causes and remedies for teeth sensitivity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.