Cause Of Trouble in Waking Up : बरेच लोक असे असतात ज्यांना सकाळी झोपेतून उठण्यासाठी ना कोणत्या गजराची गरज पडत ना कुणी उठवण्याची. ते पहाटेच झटक्यात झोपेतून उठतात आणि कामाला लागतात. पण काही लोक असे असतात ज्यांना सकाळी झोपेतून उठणं फारच अवघड जातं. गजर पुन्हा पुन्हा बंद करून ते झोप काढत राहतात. बरेच लोक या गोष्टीला आळस किंवा झोप पूर्ण न होणं असं समजतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, यामागे एखादा गंभीर आजारही असू शकतो. ज्यामुळे सकाळी झोपेतून उठायला तुम्हाला अडचण जाते.
डिप्रेशन
डिप्रेशनसारख्या मानसिक समस्येमुळेही व्यक्तीला सकाळी झोपेतून उठण्याची इच्छा होत नाही. अनेकांना असं वाटतं की, डिप्रेशन म्हणजे दु:खी होणे, पण असं नाहीये. ही एक मानसिक स्थिती आहे. जी मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर प्रभाव टाकते. अशा स्थितीत झोपण्याचा पॅटर्न बिघडण्यासोबतच कशात मन लागत नाही, सतत थकवा जाणवतो, निराशा वाटते आणि विनाकारण रडण्याची इच्छा होते.
थायरॉइड (हाइपोथायरॉयडिज्म)
थायरॉइडची समस्या असलेल्यांना सकाळी झोपेतून उठण्याचं अजिबात मन होत नाही. खासकरून जर तुम्हाला हाइपोथायरॉयडिज्म असेल, तर याचा अर्थ तुमच्या शरीरात थायरॉइड हार्मोनचं प्रमाण कमी झालं आहे. अशा स्थितीत शरीरात एनर्जी कमी राहते आणि सतत सुस्ती व आळस जाणवतो.
झोपेसंबंधी आजार
जर झोपेसंबंधी काही आजार असेल तर सकाळी झोपेतून उठण्याचं मन होत नाही. या स्थितीत व्यक्ती गाढ आणि पुरेशी झोप घेऊ शकत नाही. ज्यामुळे त्यांना सकाळी उठण्यास त्रास होतो. तसेच स्लीप एप्निया स्थितीमध्येही सकाळी झोपेतून उठणं होत नाही. या स्थितीत झोपेदरम्यान श्वास थांबल्यानं पुन्हा पुन्हा झोपमोड होते. इनसोम्निया समस्येतही सकाळी झोपेतून उठणं होत नाही. यात व्यक्तीला झोप येत नाही आणि झोप पुन्हा पुन्हा मोडते.
एनीमिया
शरीरात रक्ताची कमतरता झाल्यावर सकाळी झोपेतून उठण्याचं मन होत नाही. अशा स्थितीत शरीरात आयर्नची कमतरता होते, ज्यामुळे रक्तात हीमोग्लोबिन लेव्हल कमी होते आणि ऑक्सिजन शरीरात सगळीकडे व्यवस्थित पोहोचू शकत नाही. या स्थितीत सकाळी झोपेतून उठण्याची इच्छा न होण्यासोबतच थकवा, चक्कर येणे, श्वास भरून येणे अशाही समस्या होतात.