Join us
Daily Top 2 Weekly Top 5

बसल्याबसल्या करा ३ आसनं, गॅसेसचा त्रास चटकन होईल कमी- पचनक्रिया सुधारेल आणि वाटेल फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2026 17:29 IST

3 simple yoga poses to relieve gas quickly - improve digestion and feel fresh instantly : सोपी योगासने करा आणि मिळवा आराम.

पोटात गॅस साचणे ही वाढती समस्या आहे. चुकीचा आहार, उशिरा जेवणे, खूप तिखट किंवा तेलकट पदार्थ खाणे, तसेच कमी हालचाल करणे यामुळे पोटात गॅस तयार होतो. त्यामुळे पोट फुगणे, ढेकर येणे, पोटात दुखणे किंवा जडपणा जाणवणे असे त्रास होऊ शकतात. (3 simple yoga poses to relieve gas quickly - improve digestion and feel fresh instantly )अशा वेळी औषध घेण्यापेक्षा काही सोपी योगासनं केल्यास पोटातील गॅस कमी होण्यास मदत होते आणि पचनक्रियाही सुधारते. काही साधी आणि सहज करता येणारी आसनं रोज केली तर पोट हलके राहते.

पोटातील गॅस कमी करण्यासाठी पवनमुक्तासन हे खूप उपयोगी आणि सोपे आसन मानले जाते. या आसनासाठी सर्वप्रथम पाठीवर सरळ झोपावे. त्यानंतर एक पाय गुडघ्यात वाकवून तो छातीच्या दिशेने आणावा आणि दोन्ही हातांनी गुडघा धरून हलकेच पोटाकडे दाब द्यावा. काही सेकंद ही स्थिती ठेवून पुन्हा पाय सरळ करावा. त्याच पद्धतीने दुसऱ्या पायानेही हे आसन करावे. शेवटी दोन्ही पाय एकत्र वाकवून छातीच्या दिशेने आणून काही क्षण थांबावे. या आसनामुळे पोटावर हलका दाब येतो आणि गॅस बाहेर पडण्यास मदत होते.

दुसरे सोपे आसन म्हणजे वज्रासन. हे आसन जेवणानंतरही करता येते, त्यामुळे पचनासाठी ते विशेष उपयुक्त मानले जाते. वज्रासन करण्यासाठी जमिनीवर गुडघे टेकवून बसावे आणि दोन्ही पायांची टाच मागे ठेवून त्यावर बसावे. पाठ सरळ ठेवून हात गुडघ्यांवर ठेवावेत. या स्थितीत ५ ते १० मिनिटे शांतपणे बसल्यास पचनक्रिया सुधारते आणि पोटात गॅस साचण्याचा त्रास कमी होतो.

तिसरे आसन म्हणजे बालासन. हे आसन शरीराला आराम देणारे आणि पोटातील ताण कमी करणारे आहे. बालासन करण्यासाठी सर्वप्रथम गुडघे टेकवून बसावे. त्यानंतर शरीर पुढे झुकवत कपाळ जमिनीला टेकवावे आणि हात पुढे किंवा मागे सैल ठेवावेत. या स्थितीत काही क्षण शांतपणे श्वासन क्रिया करावी. या आसनामुळे पोटातील गॅस कमी होतो आणि गॅसचा त्रास पुढेही उद्भवण्याची शक्यता कमी होण्यास मदत होते.

पोटात गॅस होण्याचा त्रास टाळण्यासाठी योगासनांसोबत काही सवयीही महत्त्वाच्या ठरतात. अन्न हळूहळू आणि नीट चावून खाणे, भरपूर पाणी पिणे, तेलकट किंवा तिखट पदार्थ कमी खाणे आणि दररोज थोडा व्यायाम करणे यामुळे पचनक्रिया चांगली राहते. नियमितपणे ही सोपी आसनं केल्यास पोट हलके राहते आणि गॅसचा त्रासही कमी होण्यास मदत होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Three Yoga Poses for Gas Relief, Improved Digestion, Freshness

Web Summary : Relieve gas with yoga: Pawanmuktasana, Vajrasana, and Balasana. These poses aid digestion, reduce bloating, and promote a light, comfortable feeling. Combine with mindful eating and exercise for optimal results.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यहोम रेमेडीयोगासने प्रकार व फायदेव्यायाम