Join us
Daily Top 2 Weekly Top 5

तळपायांची आग होते- डोळे जळजळतात? शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी ३ सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2026 09:45 IST

3 Home Hacks to Reduce Heat in Body: उष्णतेमुळे तळपायांची आग होत असेल तर पुढे सांगितलेले काही उपाय करून बघा..(3 home hacks to keep your body cool in hot summer)

सध्या वातावरणातला उकाडा प्रचंड वाढलेला आहे. बहुतेक ठिकाणी तापमान ४२, ४३ डिग्री किंवा त्याच्याही पुढे गेलेले आहे. अशा होरपळून टाकणाऱ्या वातावरणात शरीरातली उष्णता वाढण्याचा त्रास खूप जणांना होतो. तुम्ही कितीही थंड पदार्थ खाल्ले तरी शरीरातली उष्णता कमी होत नाही. त्यामुळेच मग तळपायांची आग होऊ लागते. डोळे जळजळ करू लागतात किंवा डोळे मिटल्यानंतर गरम झाल्यासारखे वाटतात. उन्हामुळे असे त्रास तुम्हालाही व्हायला लागले असतील तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा. शरीरातली उष्णता कमी होऊन आराम वाटेल.(3 home hacks to keep your body cool in hot summer)

शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय 

 

१. शरीरातली उष्णता कमी करणारा पारंपरिक उपाय म्हणजे काशाची वाटी. काशाच्या वाटीला थोडेसे तूप लावा आणि ही वाटी तळपायावर घासा. जर तुपाचा रंग बदलून काळपट होऊ लागला असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरातली उष्णता बाहेर पडते आहे. 

उन्हामुळे त्वचा ड्राय झाली, टॅनिंग वाढलं? फक्त ५ रुपयांत मिळेल फेशियलसारखा ग्लो- घ्या घरगुती उपाय

२. देवघरात असणाऱ्या सहानीवर चंदन उगाळून घ्या आणि चंदनाचा लेप तुमच्या बेंबीच्या सभोवती लावून ठेवा. दररोज रात्री झोपण्यापुर्वी काही दिवस नियमितपणे हा उपाय करून पाहा. शरीरातली उष्णता हळूहळू कमी होईल.

 

३. शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी तंदुलोदन हा देखील एक आयुर्वेदिक उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी एक वाटी तांदूळ एका भांड्यात घ्या. त्यानंतर दोन ते तीन वेळा स्वच्छ धुऊन घ्या.

टरबूज खाल्लं की पोट फुगल्यासारखं वाटतं- जड होतं? बघा नेमकं काय चुकतं, काय बिघडतं

नंतर त्यामध्ये चांगलं पाणी घाला आणि पाच ते सहा तास ते पाण्यात भिजत ठेवा. यानंतर वरचं पाणी काढून घ्या आणि ते प्या. यामुळे शरीरातली उष्णता, पित्त, वाढलेली ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Beat the Heat: Simple Home Remedies for Body Cooling

Web Summary : High temperatures cause body heat issues like burning feet and eyes. Traditional remedies include rubbing ghee on feet with a bronze bowl, applying sandalwood paste around the navel, and drinking rice-soaked water to reduce body heat and acidity.
टॅग्स : आरोग्यसमर स्पेशल