Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > १० सेकंदात निघेल कानात साचलेला मळ; डॉक्टर सांगतात 3 उपाय, मळ निघेल-ऐकूही नीट येईल

१० सेकंदात निघेल कानात साचलेला मळ; डॉक्टर सांगतात 3 उपाय, मळ निघेल-ऐकूही नीट येईल

Easy Ways To Remove Shares Ear Wax (kanatil mal kasa kadhava in marathi) : कानाचा मळ कोणतीही घाण असून कानांच्या सुरक्षेसाठी आणि सफाईसाठी महत्वाचा असतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 13:22 IST2025-09-01T13:10:57+5:302025-09-01T13:22:38+5:30

Easy Ways To Remove Shares Ear Wax (kanatil mal kasa kadhava in marathi) : कानाचा मळ कोणतीही घाण असून कानांच्या सुरक्षेसाठी आणि सफाईसाठी महत्वाचा असतो.

3 Easy Ways To Remove Shares Ear Wax Senior Ent Surgeon At Apollo Hospital Dr. Naseeruddin | १० सेकंदात निघेल कानात साचलेला मळ; डॉक्टर सांगतात 3 उपाय, मळ निघेल-ऐकूही नीट येईल

१० सेकंदात निघेल कानात साचलेला मळ; डॉक्टर सांगतात 3 उपाय, मळ निघेल-ऐकूही नीट येईल

कानाचा मळ म्हणजेच इअरवॅक्स (Ear Wax) ज्याला वैदयकीय परीभाषेत सेरूमेन असंही म्हणतात. हा कानात तयार होणारा एक नैसर्गिक पदार्थ आहे. ज्यामुळे हलका पिवळा आणि चिकट मेणासारखा पदार्थ तयार होतो. कानतील मळ हा कानाच्या छोट्या छोट्या ग्रंधींद्वारे तयार होतो. कानाचा मळ ही कोणतीही घाण नसून कानांच्या सुरक्षेसाठी आणि सफाईसाठी महत्वाचा असतो. (How To Remove Earwax Easily)

कानाचा मळ काढण्याचे अनेक फायदे आहेत जसं की यामुळे कानांची सुरक्षा होते. धूळ, माती, लहान किडे, बॅक्टेरिया कानांच्या आत जाण्यापासून रोखता येतं. कानात मॉईश्चर टिकून राहतं. ज्यामुळे कानांची धूळ आणि घाण बाहेर निघण्यास मदत होते. (Senior Ent Surgeon At Apollo Hospital Dr. Naseeruddin Share 3 Easy Ways To Remove Ear Wax)

 

ईयरवॅक्स अशावेळी धोकादायक ठरतं जेव्हा ते जास्त प्रमाणात जमा होतं आणि हा मळ कानांच्या नसा ब्लॉक करतो. ज्यामुळे ऐकण्याची क्षमता कमी होते. वेदना आणि दबावाचं कारण ठरू शकते. डॉ. मोहम्मद नसीरुद्दीन यांनी कानाचा मळ काढण्याचे काही उपाय सांगितले आहेत. (Ref)

७० वर्षांचे अनुपम खेर रोज करतात हा व्यायाम; साधंसोपं फिटनेस सिक्रेट-तब्येत ठेवतं ठणठणीत

कानांची साफाई तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकता. हे एक एंडोस्कोपिक क्लिअरंस टेक्निक आहे. ज्यात कानात एक इडोस्कोपिक कॅमेरा घातला जातो. या कॅमेराच्या मदतीनं स्क्रिनवर कानाच्या आतील पूर्ण कॅव्हिटीज दिसून येतात आणि एक छोटं उपकरण आत घालून कानात जमा घालेला मळ बाहेर काढला जातो.

पोट लटकतंय-कंबरेचा शेपच बिघडला? सकाळी १ ग्लास पाण्यात 'हे' चूर्ण घ्या, झरझर उतरेल चरबी

वॅक्स सॉफ्टनर ड्रॉप्स

जर कानातील मळ खूपच घट्ट झाला असेल तर रुग्णाला वॅक्स सॉफ्टनर ड्रॉप्स म्हणजेच मळ मऊ करणारे ड्रॉप्स दिले जातात. हे थेंब काही दिवस वापरावे लागतात जर मळ मऊ झाला असेल तर रुग्णाला ३ ते ५ दिवसात बोलावून सफाई केली जाते.

ईअरवॉश किंवा सिरिंज

कानाचा मळ साफ करण्यासाठी ही खूपच सामान्य आणि सुरक्षित पद्धत आहे. यात शरीराच्या तापमानाबरोबर गरम झालेला सलाईन म्हणजेच पाणी-मीठ मिसळून कानात घातलं जातं. ज्यामुळे मळ सहज बाहेर येतो. कानाचे पडदे म्हणजेच इअरड्रम्सना कोणतंही नुकसान पोहोचत नाही.

अनेक वर्षांपासून डॉक्टर या पद्धतीनं मळ बाहेर काढत आहेत. डॉक्टर सांगतात की कान साफ करण्यासाठी इअरबड्स वापर करू नये. जर कानाचे त्रास असतील, ऐकू येत नसेल तर त्वरीत इएनटी तज्ज्ञांशी संपर्क साधा.

Web Title: 3 Easy Ways To Remove Shares Ear Wax Senior Ent Surgeon At Apollo Hospital Dr. Naseeruddin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.