Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > जेवताना पाणी प्यावं की जेवण झाल्यानंतर? डॉक्टर सांगतात पाण्याच्या बाबतीत 'हा' नियम पाळाच

जेवताना पाणी प्यावं की जेवण झाल्यानंतर? डॉक्टर सांगतात पाण्याच्या बाबतीत 'हा' नियम पाळाच

3 Ayurvedic Tips For Better Digestion: जेवताना पाणी प्यावं, जेवणाच्या आधी प्यावं की जेवण झाल्यानंतर काही वेळाने प्यावं? बघा आयुर्वेदिक डॉक्टर याविषयी काय सांगत आहेत..(3 important tips for better gut health)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2025 16:22 IST2025-02-17T16:22:04+5:302025-02-17T16:22:47+5:30

3 Ayurvedic Tips For Better Digestion: जेवताना पाणी प्यावं, जेवणाच्या आधी प्यावं की जेवण झाल्यानंतर काही वेळाने प्यावं? बघा आयुर्वेदिक डॉक्टर याविषयी काय सांगत आहेत..(3 important tips for better gut health)

3 Ayurvedic Tips for better digestion, how to get rid of indigestion and acidity, constipation, drinking water while eating is good or bad? | जेवताना पाणी प्यावं की जेवण झाल्यानंतर? डॉक्टर सांगतात पाण्याच्या बाबतीत 'हा' नियम पाळाच

जेवताना पाणी प्यावं की जेवण झाल्यानंतर? डॉक्टर सांगतात पाण्याच्या बाबतीत 'हा' नियम पाळाच

Highlightsआयुर्वेदाचा हा नियमच आहे की तुमच्या पोटाचा अर्धा हिस्सा अन्नाने भरलेला असावा. पाव हिस्सा पाण्याने किंवा द्रव पदार्थांनी भरलेला असावा आणि उरलेला पाव हिस्सा रिकामा असावा.

जेवण करणं, पाणी पिणं या तशा रोजच्या गोष्टी. पण त्यातही बऱ्याच जणांचे वेगवेगळे नियम आहेत. काही तज्ज्ञ असं सांगतात की जेवण करण्याच्या अर्धा तास आधी प्यावं आणि जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावं. यामुळे पचन क्रिया चांगली होते. ॲसिडीटीचा त्रास हाेत नाही. काही जण म्हणतात की जेवण करत असताना अजिबात पाणी पिऊ नये. अगदी खूपच पाणी प्यावं वाटत असेल तर एखादा घोट पाणी प्यावं आणि नंतर जेवण झाल्यानंतर काही वेळाने पाणी प्यावं. काही जणांच्या अभ्यासानुसार जेवण झाल्यानंतर लगेचच भरपूर पाणी पिण्याची सवय असेल तर ती चुकीची असते (how to get rid of indigestion, acidity and constipation?). आता प्रत्येकाच्या शरीरप्रकृतीनुसार त्यांना काय सहन होऊ शकतं आणि काय त्रासदायक ठरू शकतं, याची गणितं वेगवेगळी असतात (3 Ayurvedic Tips for better digestion and better gut health). आता एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी याविषयी दिलेली माहिती पाहूया... (drinking water while eating is good or bad?)

 

जेवताना पाणी प्यावं की जेवण झाल्यानंतर?

डॉ. मनिषा मिश्रा यांनी याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ dr.manisha.mishra या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला असून त्या म्हणतात की मी एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून हाच सल्ला देईल की जेवत असतानाच थोडं थोडं पाणी पिणं तुमच्या पचन क्रियेसाठी अधिक चांगलं असतं.

केस खूप पातळ झाले- सारखे गळतात? रोज 'ही' पावडर खा, काही दिवसांतच होतील दाट- लांब

त्या स्वत:सुद्धा त्यांचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हाच नियम पाळतात. त्या म्हणतात की आयुर्वेदाचा हा नियमच आहे की तुमच्या पोटाचा अर्धा हिस्सा अन्नाने भरलेला असावा. पाव हिस्सा पाण्याने किंवा द्रव पदार्थांनी भरलेला असावा आणि उरलेला पाव हिस्सा रिकामा असावा. जेवण झाल्यानंतर जर अशा पद्धतीने तुमच्या पोटाची स्थिती असेल तर पचनक्रिया अधिक चांगली होते.

 

पचन क्रिया चांगली होण्यासाठी हे नियमही पाळा..

खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होण्यासाठी जेवताना पाणी कधी प्यावं याविषयीची माहिती तर डॉक्टरांनी दिलीच आहे पण त्यासोबतच आणखी २ नियमही सांगितले आहेत. ते नेमके कोणते ते पाहूया..

मासिक पाळीत इतकं पोट दुखतं की जागेवरून उठावंही वाटत नाही? ३ उपाय- त्रास कमी होईल

१. पहिला नियम म्हणजे खूप गडबडीमध्ये, घाईघाईत जेवू नका. जो घास तोंडात घ्याल तो व्यवस्थित चावून खा. अगदी ३२ वेळेस नाही पण किमान १० ते १५ वेळा तरी घास चावून बारीक करायलाच हवा.

२. जेवण झाल्यानंतर ५ ते १० मिनिटांसाठी शतपावली करा. पाणी पिण्यासोबतच जर हे २ नियमही पाळले तर अपचनाचा त्रास होणार नाही.  


 

Web Title: 3 Ayurvedic Tips for better digestion, how to get rid of indigestion and acidity, constipation, drinking water while eating is good or bad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.