lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > निपलविषयी २ गैरसमज देतात महिलांना न्यूनगंड, गैरसमज टाळून आत्मविश्वास हवा तर लक्षात ठेवा 'या' गोष्टी

निपलविषयी २ गैरसमज देतात महिलांना न्यूनगंड, गैरसमज टाळून आत्मविश्वास हवा तर लक्षात ठेवा 'या' गोष्टी

2 Important facts about nipples : निपलच्या बाबतीत असणाऱ्या २ महत्त्वाच्या गैरसमजांविषयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2024 09:15 AM2024-02-08T09:15:04+5:302024-02-08T09:20:01+5:30

2 Important facts about nipples : निपलच्या बाबतीत असणाऱ्या २ महत्त्वाच्या गैरसमजांविषयी

2 misconceptions about nipples make women feel inferior, if you want to avoid misconceptions and gain confidence, remember these things | निपलविषयी २ गैरसमज देतात महिलांना न्यूनगंड, गैरसमज टाळून आत्मविश्वास हवा तर लक्षात ठेवा 'या' गोष्टी

निपलविषयी २ गैरसमज देतात महिलांना न्यूनगंड, गैरसमज टाळून आत्मविश्वास हवा तर लक्षात ठेवा 'या' गोष्टी

स्तन हा आपल्या अवयावांपैकी एक महत्त्वाचा भाग असतो. त्याचप्रमाणे त्यावर असणारे निपलही महत्त्वाचे असतात. स्तनांच्या बाबतीत आपल्याला ते लहान आहेत, मोठे आहेत, ओघळलेले आहेत अशाप्रकारच्या काही ना काही तक्रारी असतात. मात्र या निपलकडे आपण म्हणावे तितके लक्ष देत नाही. काही जणींचे निपल खूप बारीक असतात, काहींचे खूप मोठे असतात इतकेच आपल्याला माहीत असते. साधारणपणे निपलची ठेवण ही बाहेर असते आणि शारीरिक संबंधांच्या वेळी किंवा गारठयाने ते ताठरतात हे आपल्याला माहीत आहे. पण काही जणींना निपलच्या बाबतीत काही अडचणी असतात. याबाबत आपल्याकडे तितके मोकळेपणाने बोलले जात नाही. बोलले तरी फारच दबक्या आवाजात बोलले जाते.आज आपण निपलच्या बाबतीत असणाऱ्या २ महत्त्वाच्या गैरसमजांविषयी समजून घेणार आहोत (2 Important facts about nipples).

(Image : Google)
(Image : Google)

१. काही जणींचे निपल बाहेर असण्याऐवजी आतमध्ये गेलेले असतात. अशावेळी महिलांना कॉम्प्लेक्स येण्याची शक्यता असते. पण अशाप्रकारे निपल आतमध्ये असणे ही अतिशय सामान्य बाब आहे, त्याचा ताण घेण्याची आवश्यकता नाही. असे निपल असतील तर स्तनपान देताना त्रास होऊ शकतो. कारण बाळाला ते ओढता येत नाहीत.अन्यथा असे निपल असणे काहीही वाईट नाही. 

२. निपलच्या आजूबाजूला केस असणे ही समस्या काही महिलांना असते. आपल्याला नको तिथे केस आहेत म्हणून काहीवेळी महिला याचा ताण घेताना दिसतात. पण अशाप्रकारे निपल्सच्या बाजूला केस असणे हेही अगदी सामान्य आहे. एशाप्रकारे एखाद दोन केस असतील तर या केसांचा आपल्याला काहीही त्रास होत नाही. हे केस तुम्हाला नको वाटत असतील तर वॅक्स करणे किंवा प्लकिंग करणे हे सर्वात सोपे पर्याय असू शकतात. अन्यथा ते तसेच राहील्याने काहीच फरक पडत नाही. 

Web Title: 2 misconceptions about nipples make women feel inferior, if you want to avoid misconceptions and gain confidence, remember these things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.