सुकामेवा सगळ्यांनीच खावा कारण तो आरोग्यासाठी फार उपयुक्त असतो. काजू, बदाम वरचेवर खाल्ले जातातच. मात्र काही प्रकार सारखे खाल्ले जात नाहीत. त्यापैकी एक म्हणजे खारीक. (1 teaspoon dried date powder is a superfood for women, Daily pain and constant grumbling will disappear)खारीक म्हणजे सुका खजूर. ही अतिशय पौष्टिक आणि उर्जादायी मानली जाते. खारीक वाळवून त्याची बारीक पूड केली तर ती सहज पचते आणि रोजच्या आहारात घेणे सोपे होते. विशेषतः महिलांनी दररोज चमचाभर खारीक पूड खाल्ल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
खारीक चावायला जरा कडक असते. त्यामुळे पूड करणे उत्तम. पूड न करता खारीक खाल्ली तरी फायद्याचेच आहे. यात भरपूर प्रमाणात लोह असते. तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, झिंक यांसारखी खनिजे असतात. जीवनसत्त्व 'ए', 'बी कॉम्प्लेक्स' आणि 'सी' भरपूर प्रमाणात आढळते. लोहामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढते, त्यामुळे रक्ताची कमतरता किंवा अॅनिमियाची समस्या असलेल्या महिलांसाठी खारीक पूड फार फायद्याची ठरते. मासिक पाळीच्या काळात थकवा, अशक्तपणा जाणवत असल्यास खारीक पूड ऊर्जा आणि ताजेपणा देते.
महिलांसाठी खारीक खास सांगितली जाते, कारण त्यातून कॅल्शियम व फॉस्फरस मिळून हाडे - दात मजबूत होतात. महिलांमध्ये हाडे झिजणे जास्त प्रमाणात आढळते. आवश्यक पोषणही मिळते. त्यामुळे महिलांसाठी अशक्तपणा दूर करण्यासाठी ही पूड फायद्याची ठरते. वृद्धपणात हाडे कमकुवत होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी खारीक पूड कॅल्शियमचा नैसर्गिक स्रोत म्हणून काम करते.
यात भरपूर फायबर असल्याने पचन सुधारते व बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. खारीक पूडमधील अँटी ऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक फ्री-रॅडिकल्स कमी करतात, त्यामुळे त्वचा निरोगी व तजेलदार दिसते आणि केसांनाही बळकटी मिळते. शिवाय नैसर्गिक गोडवा असल्याने ती गोड पदार्थांमध्ये साखरेऐवजी वापरता येते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. महिलांनी चमचाभर खारीक पूड नक्की खावी.