Empty Stomach Lemon Water: हेल्थ एक्सपर्ट्स, डायटिशिअन, आयुर्वेद वैद्य लोकांना रोज सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी पिण्याचा सल्ला देतात. सोबतच यापासून होणारे फायदेही सांगतात. वजन कमी करण्यास, पचन सुधारण्यास, एनर्जी मिळण्यास आणि बॉडी डिटॉक्स होण्यास यानं मदत मिळते असा दावा केला जातो. तर काही लोकांचं मत आहे की, उपाशीपोटी लिंबू पाणी प्यायल्यामुळे हाडं कमजोर होऊ शकतात किंवा अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. अशात उपाशीपोटी लिंबू पाणी प्यावं की नाही? किंवा उपाशीपोटी लिंबू पाणी पिणं फायदेशीर ठरतं का? असे प्रश्न काही लोकांना पडतात. यावर आयुर्वेद एक्सपर्टचं काय मत आहे हे पाहुयात.
आयुर्वेद डॉक्टर सलीम जैदी यांनी एका यूट्यूब व्हिडिओत याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, उपाशीपोटी लिंबू पाणी प्यावं की नाही, याबाबत बरेच लोक संभ्रमात असतात. मुळात लिंबू पाणी पिऊन आपल्याला अनेक फायदे मिळू शकतात. पण हे पित असताना काही गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं ठरतं.
काय काळजी घ्याल?
डॉक्टर जैदी सांगतात की, अनेकांचं असं मत असतं की, लिंबू पाणी प्यायल्यानं शरीरातील जॉइंट्समध्ये वेदना होतात किंवा हाडं कमजोर होतात. पण हा ऐक गैरसमज आहे. लिंबामधील व्हिटामिन सी मुळे हाडं मजबूत होतात आणि जॉइंट्सची समस्याही दूर होते.
पण ज्या लोकांना आधीच गंभीर अॅसिडिटी आहे किंवा असते, पोटात अल्सर झाला असेल किंवा सिट्रिक फळांची म्हणजे आंबट फळांची अॅलर्जी असेल तर त्यांनी लिंबू पाणी पिऊ नये. त्यांच्यासाठी हे पाणी नुकसानकारक ठरू शकतं.
कसं प्याल?
रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस टाका. यात साखर टाकून नका. हलकं मीठ टाका आणि टेस्टसाठी थोडं मध टाकू शकता. तेही हवं असेल तरच. हे पाणी आपणं नाश्ता करण्याच्या १५ ते ३० मिनिटांआधी प्यावं. लिंबू पाण्यातील अॅसिडमुळे दातांचं नुकसान होऊ नये म्हणून पिण्यासाठी आपण स्ट्रॉ चा वापर करू शकता. आणखी एक म्हणजे लिंबू पाणी प्यायल्यावर गुरळा करायला विसरू नका.
लिंबू पाणी पिण्याचे फायदे
लिंबू पाणी प्यायल्यानं पचन सुधारतं, गॅस, ब्लोटिंग आणि बद्धकोष्ठता यांसारख्या कॉमन समस्या दूर होतात. तसेच बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी सुद्धा हे पाणी फायदेशीर ठरतं. इतकंच नाही तर लिंबू पाण्याचे त्वचेला सुद्धा फायदे मिळतात. यातील व्हिटामिन सी नं कोलेजनचं उत्पादन वाढतं. अशात त्वचा टाइठ आणि चमकदार राहते. लिंबू पाण्याचा एक मोठा फायदा म्हणजे यानं इम्यूनिटी मजबूत होते. त्यामुळे इन्फेक्शन आणि वायरल आजारांपासून बचाव होतो. वजन कमी करण्यासाठी सुद्धा लिंबू पाणी एक चांगला पर्याय ठरू शकतं.