Lokmat Sakhi >Health > कोण म्हणतं मासिक पाळी सुरु असेल तर जांभळं खाऊ नयेत, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

कोण म्हणतं मासिक पाळी सुरु असेल तर जांभळं खाऊ नयेत, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Benefits of Eating Jamun During Periods : मासिक पाळीदरम्यान जांभळं खाऊन फायदे मिळतात का? असाही प्रश्न काही महिलांना पडतो. त्याचंच उत्तर एक्सपर्टकडून जाणून घेणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 13:50 IST2025-06-21T12:04:35+5:302025-06-21T13:50:58+5:30

Benefits of Eating Jamun During Periods : मासिक पाळीदरम्यान जांभळं खाऊन फायदे मिळतात का? असाही प्रश्न काही महिलांना पडतो. त्याचंच उत्तर एक्सपर्टकडून जाणून घेणार आहोत.

Is Eating Jamun During Periods Beneficial? Know What Expert Says | कोण म्हणतं मासिक पाळी सुरु असेल तर जांभळं खाऊ नयेत, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

कोण म्हणतं मासिक पाळी सुरु असेल तर जांभळं खाऊ नयेत, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Benefits of Eating Jamun During Periods : मासिक पाळीदरम्यान महिलांना एक नाही तर कितीतरी समस्यांचा सामना करावा लागतो. पोट दुखणं असो मूड स्विंग असो वा वाढलेला चिडचिडपणा असो, या समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय महिला करतात. इतकंच काय तर डाएटमध्ये सुद्धा बदल करतात. वेगवेगळी फळं खाणं या दिवसांमध्ये फायदेशीर मानलं जातं. सध्या जांभळांचा सीझन आहे. अनेक महिला मासिक पाळीदरम्यान जांभळं खातात. अशात या दिवसांमध्ये जांभळं खाऊन फायदे मिळतात का? असाही प्रश्न काही महिलांना पडतो. 

onlymyhealth.com या हेल्थसंबंधी वेबसाइटला डायटिशिअन आणि न्यूट्रिशनिस्ट दिव्या गांधी यांनी याबाबत माहिती दिली आहे. एक्सपर्ट सांगतात की, मासिक पाळीदरम्यान जांभळं खाणं फायदेशीर आणि सुरक्षित असतं. कारण यातून या दिवसांमध्ये आवश्यक असे पोषक तत्व मिळतात. ते काय हे जाणून घेऊ.

मासिक पाळीत जांभळं खाण्याचे फायदे

भरपूर आयर्न

जांभळांमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं. मासिक पाळीदरम्यान अनेक महिलांना अधिक रक्तस्त्राव होतो. ज्यामुळे महिलांना कमजोरी किंवा थकवा जाणवतो. अशात यादरम्यान जांभळं खाल्लीत तर शरीराला भरपूर आयर्न मिळतं. ज्यामुळे शरीरात लाल रक्तपेशीचं प्रोडक्शन वाढू शकतं.

व्हिटामिन सी

आयर्नसोबतच जांभळामध्ये भरपूर व्हिटामिन सी असतं. आयर्नच्या अ‍ॅब्जॉर्पशनसाठी व्हिटामिन सी ची गरज असते. म्हणजे जेव्हा तुम्ही मासिक पाळीदरम्यान जांभळं खाता तेव्हा व्हिटामिन सी आणि आयर्न दोन्ही तत्व शरीरात वाढतात. याचा एकंदर आरोग्याला सुद्धा फायदा मिळतो. 

एक्सपर्टचा सल्ला

एक्सपर्टनी हेही सांगितलं की, मासिक पाळीदरम्यान जांभळं खाल्ल्यानं फायदे मिळतात. कारण यानं शरीरात रक्त वाढतं. पण जांभळं जास्त प्रमाणात देखील खाऊ नये. या दिवसांमध्ये जर तुम्ही जास्त प्रमाणात जांभळं खाल तर यानं पचनासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कमी प्रमाणात जांभळं खावून फायदे मिळवू शकता.

Web Title: Is Eating Jamun During Periods Beneficial? Know What Expert Says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.