Who Should Avoid Salt : मीठ आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा पदार्थ आहे. मिठाशिवाय कोणतंही अन्न टेस्टी लागत नाही. पण मीठ जास्त खाल्लं तरी समस्या होतात आणि कमी खाल्लं तरी सुद्धा. त्यामुळे मीठ योग्य प्रमाणातच खाल्लं पाहिजे. पण असेही काही आजार असतात ज्यात मीठ कमी खावं किंवा पूर्णपणे टाळावं लागतं, कारण जास्त मीठ शरीरावर खूप वाईट परिणाम करू शकते. खाली जाणून घ्या कोणत्या आजारांमध्ये मीठ टाळणे आवश्यक आहे.
हाय ब्लड प्रेशर
मिठामध्ये सोडियम असतं, जे ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब वाढवण्याचं काम करतं. हाय ब्लड प्रेशर असलेल्या रुग्णांना मीठ कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून रक्तदाब नियंत्रित राहील.
हार्ट डिसीज
हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर किंवा इतर हृदयविकार असलेल्या रुग्णांनी मीठ कमी खावं. जास्त मिठामुळे ब्लड प्रेशर वाढतं आणि हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो.
गाऊट समस्या
गाऊटमध्ये सांध्यामध्ये सूज व तीव्र वेदना होतात. जास्त मीठ व सोडियमचं सेवन केल्यास शरीरातील यूरिक अॅसिड वाढतं, ज्यामुळे गाऊटचे त्रास अधिक वाढू शकतात.
किडनीचे आजार
किडनी फेल्युअर किंवा इतर गंभीर किडनी रोगांमध्ये जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील पाणी आणि सोडियमचं प्रमाण बिघडतं. यामुळे किडनीवर अतिरिक्त ताण येतो आणि स्थिती अधिक बिघडू शकते.
शरीरातील सूज
जर पाय, हात किंवा शरीराच्या इतर भागात सूज असेल तर मिठाचं सेवन कमी करणं आवश्यक आहे. जास्त मिठामुळे शरीरात पाणी धरून ठेवलं जातं, ज्यामुळे सूज वाढते.
