Join us
Daily Top 2 Weekly Top 5

हिवाळ्यात रात्रीचं जेवण कधी करावं? पाहा योग्य वेळ आणि यामागील नेमकं कारणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 11:28 IST

Winter Dinner Time : आपण काय खातो हे जितकं महत्त्वाचं आहे, तेवढंच कधी खातो हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे.

Winter Dinner Time : हिवाळा सुरू होताच दिवस लहान होतात आणि संध्याकाळ लवकर होऊ लागते. थंडीमुळे आपली लाइफस्टाइलही बदलते. अशा वेळी अनेक लोक रात्रीचं जेवण उशिरा करतात, जे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. आपण काय खातो हे जितकं महत्त्वाचं आहे, तेवढंच कधी खातो हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. अशात जाणून घेऊया हिवाळ्यात रात्रीचं जेवण करण्याचा योग्य वेळ आणि त्यामागील कारणं.

सर्केडियन रिदम आणि स्लो होणारी पचनक्रिया

मानवी शरीर २४ तास चालणाऱ्या एका आंतरिक जैविक घड्याळावर (Circadian Rhythm) काम करतं. ही घड्याळ दिवसाचा उजेड आणि रात्रीच्या अंधारानुसार शरीरातील प्रक्रिया नियंत्रित करते. संध्याकाळ लवकर होताच शरीराला संकेत मिळतो की आता विश्रांतीची वेळ झाली आहे. त्यामुळे मेटाबॉलिझम आणि पचनक्रिया हळू होऊ लागते. अशा वेळी जर तुम्ही उशिरा आणि जड जेवण केले, तर शरीर ते नीट पचवू शकत नाही. न पचलेले अन्न फॅटच्या स्वरूपात जमा होऊ शकतं.

उशिरा जेवण करण्याचे नुकसान

काही संशोधनातून हे समोर आले आहे की, रात्रीचं जेवण उशिरा केल्यानं आरोग्यासंबंधी अनेक समस्या होऊ शकतात. एका रिसर्चनुसार, जे तरूण रात्री १० वाजता जेवतात, त्यांचा ब्लड शुगर लेव्हल ६ वाजता जेवणाऱ्या लोकांपेक्षा २०% जास्त आढळला. उशिरा जेवणाऱ्यांमध्ये फॅट बर्निंगची क्षमता १०% कमी होत असल्याचेही दिसून आले. अन्नाचे प्रमाण आणि प्रकार समान असला तरी हा फरक दिसतो. सतत उशिरा जेवत राहिल्यास लठ्ठपणा व टाइप-२ डायबिटीसचा धोका वाढू शकतो.

मग रात्रीचे जेवण नक्की कधी करावे?

हिवाळ्यात शरीराच्या नैसर्गिक लयीनुसार चालायचे असेल तर रात्रीचं जेवण ७ वाजण्यापूर्वी करणं चांगलं ठरेल. आदर्श वेळ संध्याकाळी ६ च्या आसपास जेवण करणे. या वेळेत जेवल्यास शरीराला अन्न नीट पचवायला पुरेसा वेळ मिळतो. जर उशिरा जेवण करावं लागलं तर झोपण्यापूर्वी किमान 2–3 तास आधी जेवून घ्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Optimal Winter Dinner Time: Timing and Health Benefits Explained

Web Summary : Eating dinner early in winter, ideally before 7 PM, aligns with the body's natural circadian rhythm. Late dinners disrupt digestion, potentially leading to weight gain, high blood sugar, and increased risk of type-2 diabetes. Allow 2-3 hours before sleep for proper digestion.
टॅग्स : थंडीत त्वचेची काळजीआरोग्यहेल्थ टिप्स