Lokmat Sakhi >Health >Infertility > World Health Day: तरुण जोडप्यांमध्ये वाढते आहे वंध्यत्वाची समस्या, ५ गोष्टी बाळ हवे तर लक्षात ठेवा..

World Health Day: तरुण जोडप्यांमध्ये वाढते आहे वंध्यत्वाची समस्या, ५ गोष्टी बाळ हवे तर लक्षात ठेवा..

Rising cases of Infertility in India-Both men and women मूल होत नाही म्हणून निराश जोडप्यांनी तब्येत आणि लाईफस्टाईल दोन्ही सांभाळायला हवी कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2023 11:56 AM2023-04-07T11:56:28+5:302023-04-07T11:57:29+5:30

Rising cases of Infertility in India-Both men and women मूल होत नाही म्हणून निराश जोडप्यांनी तब्येत आणि लाईफस्टाईल दोन्ही सांभाळायला हवी कारण...

Rising cases of Infertility in India-Both men and women | World Health Day: तरुण जोडप्यांमध्ये वाढते आहे वंध्यत्वाची समस्या, ५ गोष्टी बाळ हवे तर लक्षात ठेवा..

World Health Day: तरुण जोडप्यांमध्ये वाढते आहे वंध्यत्वाची समस्या, ५ गोष्टी बाळ हवे तर लक्षात ठेवा..

लग्नानंतर प्रत्येक जोडप्याला असे वाटते की, आपले एक तरी मूल असावे. पण प्रत्येक जोडप्यास काही कारणास्तव बाळ होईलच असे नाही. त्यातीलच एक कारण म्हणजे इनफर्टिलिटी. जोडप्याला लग्नाच्या एका वर्षानंतर कोणतेही गर्भनिरोधक साधन न वापरता, शरीरसंबंध केल्यानंतर सुध्दा गर्भधारणा होत नसेल, तर त्या जोडप्यास वंध्यत्व आहे असे म्हणू शकतो. या समस्येला स्त्री किंवा पुरुष किंवा दोघेही कारणीभूत असू शकतात. या समस्येशी देशातील १५ टक्के लोकं झुंजत आहेत. पण अनेक जोडपी याबद्दल बोलण्यास संकोच बाळगतात.

आज ७ एप्रिल सर्वत्र जागतिक आरोग्य दिन साजरा केला जात आहे. साहजिकच हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश, लोकांमध्ये वाढणाऱ्या आरोग्य समस्यांबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. वंध्यत्व म्हणजे काय? त्याची कारणे काय आहेत ? ते कसे टाळता येईल? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे नवभारत टाईम्स या वेबसाईटशी बोलताना दिल्लीतील नर्चर क्लिनिकचे गायनोकॉलोजिस्ट, फर्टिलिटी एंड आईवीएफ एक्सपर्ट डॉक्टर अर्चना धवन बजाज, व सीके बिरला रुग्णालयातील ऑब्स्टट्रिशन गायनोकॉलोजिस्ट आणि लेप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर अंजली कुमार यांनी दिले आहे(Rising cases of Infertility in India-Both men and women).

वंध्यत्व म्हणजे काय?

जेव्हा एखाद जोडपं एक वर्षाहून अधिक काळ नैसर्गिक रित्या प्रयत्न करूनही गर्भधारण करू शकत नाही, तेव्हा ते जोडपं 'इनफर्टिलिटी' म्हणजेच वंध्यत्वाच्या समस्येने ग्रस्त आहे.

मूळव्याधाचा असह्य त्रास होतो? ५ पदार्थ नियमित खा, पाइल्सचा त्रास होईल कमी

महिलांमधील वंध्यत्वाची कारणे

पुरुष आणि स्त्रियांमध्ये वंध्यत्वाची वेगवेगळी कारणे असू शकतात. स्त्रियांमध्ये प्रामुख्याने-

ओवरी योग्यरित्या काम न करणे

फॅलोपियन ट्यूब काम न करणे

गर्भाशयमध्ये प्रॉब्लेम

शरीराचे हार्मोनल असंतुलित होणे

फॅलोपियन ट्यूबमध्ये टीबी होणे 

पुरुषांमधील वंध्यत्वाची कारणे

शुक्राणूंची गुणवत्ता कमी होणे

स्पर्मची संख्या कमी होणे

शुक्राणूंची गतिशीलता कमी होणे

शरीराचे हार्मोनल संतुलन बिघडणे

इरेक्षणमध्ये कमतरता

ताण

शुक्राणूंची संख्या कमी करणारे इतर रोग

वंध्यत्वासाठी जोखीम घटक

वर्किंग कपलच्या वेगवेगळ्या कामाच्या तासांमुळे जोडप्यांना एकत्र राहता येत नाही.

धूम्रपान, दारू, तंबाखूचे अतिसेवन.

योग्य वयात विवाह न करणे आणि मुलाचे नियोजन करण्यास विलंब.

पिरिअड पॅण्ट हा प्रकार काय असतो? महिलांना आरोग्याच्या दृष्टीने ते वापरणे फायद्याचे की तोट्याचे?

पुरुषांपेक्षा स्त्रियांना वंध्यत्वाचा धोका जास्त असतो का?

यासंदर्भात डॉक्टर अंजली सांगतात, ''वंध्यत्व या समस्येचा धोका स्त्रियांना जास्त आहे, असे नाही. यात ४० टक्के महिला, ४० टक्के पुरुष, १० टक्के दोघांचे कारण किंवा १० टक्के इतरही कारणे असू शकतात.

मासिक पाळीच्या चार दिवसात शारीरिक संबंध ठेवावेत का? डॉक्टर सांगतात, आरोग्यसाठी योग्य काय...

वंध्यत्वाची लक्षणे

लग्नाच्या एक वर्षानंतरही गर्भवती न होणे हे सर्वात मोठे आणि पहिले लक्षण आहे.

३५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांनी वर्षभर थांबू नये.

एंडोमेट्रिओसिसची लक्षणे - जसे की मासिक पाळी वेदनादायक होणे, हेवी पिरीयड, ताप, पाठीच्या खालच्या भागात दुखणे, योनीतून स्त्राव.

वंध्यत्वावर उपचार

या आजाराच्या उपचारासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, कुटुंब आणि जोडीदाराचा पाठिंबा. या आजारातून जोडपी बाहेर येऊ शकतात. जर आपण हेल्दी डाएटला प्राधान्य देत असाल व फिट राहत असाल तर, याचा धोका कमी असू शकतो. मुख्य म्हणजे ही समस्या स्त्री आणि पुरुष दोघांनाही होऊ शकते, त्यामुळे दोघांची तपासणी करून उपचार करणे आवश्यक आहे.

वंध्यत्व टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

लग्नाआधी मासिक पाळीशी संबंधित काही समस्या असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.

पीसीओ किंवा एग रिजर्व यांसारख्या समस्यांमुळे प्रजनन समस्या उद्भवू शकतात, म्हणून चाचणी करत राहा.

आहाराची विशेष काळजी घ्या.

वजन नियंत्रित ठेवा.

हलका फुलका व्यायाम करत राहा.

Web Title: Rising cases of Infertility in India-Both men and women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.