Join us

इतक्यात मूल नको म्हणताय? तिशी उलटल्यावर आई व्हायचं असेल तर 'या' ५ गोष्टींची काळजी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 18:01 IST

Late pregnancy : उशीरा लग्न करणं, करीअरवर फोकस, खासगी निर्णय अशा अनेक कारणांमुळे महिला उशीरा आई होण्याचं ठरवतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते ३५ वर्षानंतर प्रेग्नंसी प्लॅनिंगमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो

सध्याच्या काळात अनेक कारणांमुळे महिला तिशीनंतर आई बनण्याचा विचार करतात. पण ३० नंतर गर्भधारणेसाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे गर्भपाताचाही धोका वाढतो. आई होण्यासाठी वयाची कोणतीही वयाची अट नाही पण हेल्दी प्रेग्नंसीसाठी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तब्येत चांगली ठेवता येऊ शकते. (Late pregnancy age complications symptoms not to ignore risk)

उशीरा लग्न करणं, करीयरवर फोकस, खासगी निर्णय अशा अनेक कारणांमुळे महिला उशीरा आई होण्याचं ठरवतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते ३५ वर्षानंतर प्रेग्नंसी प्लॅनिंगमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याचा परिणाम फर्टिलिटी रेटवरही होतो. याव्यतिरिक्त मिसकॅरेज, प्लेसेंटा प्रीवियातील समस्या, डिलिव्हरी आणि डाऊन सिंड्रोमसारख्या आजारांचा सामना करावा लागू शकतो.  हेल्थ एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार उशीरe प्रेग्नंसी प्लॅनिंग करत असलेल्या महिलांन काही गोष्टी लक्षात घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी.

३७ वर्षांच्या आधी  प्रेग्नंट होणं योग्य मानलं जातं. महिलांनी आपलं आरोग्य आणि मेनोपॉजच्या वेळेबाबत सजग राहायला हवं. ३५ नंतर गर्भधारणा होत नाही असं नाही पण ३५ नंतर एग्स क्वालिटी आणि फर्टिलिटी कमी होऊ लागते. ज्यामुळे प्रेग्नंसीची शक्यता कमी होते. पण  हे अशक्य होतं असं नाही.  प्रेग्नंसीसाठी पार्टनरचं वय काय आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. पुरूषांमध्ये प्रजनन क्षमता वाढत्या वयात कमी होत जाते. पण महिलांच्या तुलनेत  हा दर कमी असतो. 

डॉक्टरांशी संपर्क साधायला उशीर करू नये

जर तुमचं आणि पार्टनरचं वयसुद्धा ३० पेक्षा  जास्त असेल आणि ६ महिन्यांच्या प्रयत्नानंतरही तुम्हाला मूल होत नसेल तर डॉक्टरांची मदत घेण्यात अजिबात संकोत बाळगू नका. बेबी प्लॅन करण्याआधी फर्टिलिटी स्क्रिनिंग करायला हवी. यामुळे तर भविष्यात काही अडचण येणार असेल तर याबाबत आधीच माहिती मिळवता येऊन त्यावर उपचार करता येऊ शकतात.

फर्टिलिटी ट्रिटमेंटनं प्रत्येक समस्या दूर होऊ शकत नाही

तुम्ही ३५ नंतर बेबी प्लॅन करत असाल तर लक्षात घ्यायला हवं की फर्टिलिटी ट्रिटमेंट प्रत्येक प्रकारची समस्या दूर करू शकत नाही. समस्येबाबत आधी माहिती मिळाल्यानं  फर्टिलिटी ट्रिटमेंट अधिक यशस्वी होऊ शकते. जसं की २०, ३० वयात इंट्रायुटरिन ट्रिटमेंट अधिक यशस्वी होऊ शकते. 

हेल्दी लाईफस्टाईल

हेल्दी लाईफस्टाईल असल्यास फर्टिलिटी लवकर खराब होत नाही. जर तुमचं वय ३५ पेक्षा जास्त असेल तर  लाईफस्टाईल, खाण्यापिण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी तुम्ही न्यूट्रिशनिस्ट्सचीही मदत घेऊ शकता. याव्यतिरिक्त नियमित आहार घ्या, ताण तणाव कमी करा, साखर, कॅफेनचे सेवन कमी प्रमाणात करा,  सिगारेट, मद्याचे सेवन अजिबात करू नका. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यगर्भवती महिला