Join us
Daily Top 2 Weekly Top 5

लग्नापूर्वीच पुरुष गुपचूप करत आहेत ‘ही’ टेस्ट, रिपोर्ट पाहूनच तरुणींचा लग्नाला होकार-विषय मोठा नाजूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:39 IST

Infertility Increasing : लग्नाआधी एकमेकांना जाणून घेण्यासाठी कपल्स बोलू लागले आहेत. जेणेकरून पुढे काही अडचणी होऊ नये. पण आता काळानुसार हा ट्रेंड बदलला आहे.

Male infertility is rising: पूर्वी जास्त प्रथा अशीच होती की, परिवारातील लोक ज्यांच्याशी ठरवून देतील त्यांच्याशीच लग्न करायचं. नंतर तरुण-तरुणी आपल्या मनाने लग्न करू लागले. लग्नाआधी एकमेकांना जाणून घेण्यासाठी बोलू लागले. जेणेकरून पुढे काही अडचणी होऊ नये. पण आता काळानुसार हा ट्रेंड बदलला आहे. आता बरेच कपल्स लग्नाआधी हेल्थ चेकअप करू लागले आहेत. इतकंच नाही तर लग्न जुळलेले काही कपल्स तर लपून फर्टिलिटी टेस्टही करवून घेत आहेत. म्हणजे यावरून दिसतं की, पुरूष फॅमिली प्लॅनिंगबाबत गंभीरता दाखवत फर्टिलिटी टेस्ट करत आहेत.

डॉक्टर याबाबत सांगतात की, ओपीडीमध्ये असे भरपूर कपल्स येतात, जे लग्नानंतर होणारी संभावित समस्या टाळण्यासाठी आधीच आपली फर्टिलिटी टेस्ट करत आहेत. इंटरेस्टींग बाब ही आहे की, अनेक केसेसमध्ये ही समस्या अशा ठिकाणी समोर येते, जिथे असं काही होण्याची अजिबात आशा नसते.

शुक्राणूंची संख्या होतीये कमी

फर्टिलिटी एक्सपर्ट डॉ. अंजली मालपानी यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की, जगभरात शुक्राणूंची संख्या घटत चालली आहे. २०२२ मध्ये करण्यात आलेल्या एका मेटा-विश्लेषणात १९७३ ते २०१८ दरम्यानच्या पुरूषांमध्ये सरासरी स्पर्म काउंटमध्ये ५१.६ टक्के घट आढळून आली.

डॉ. अंजली सांगतात की, 'WHO, १५ मिलियन प्रति मिलीलीटरला नॉर्मल रेंजच्या खालचा स्तर मानतं. १९९० मध्ये जेव्हा देशात पहिली स्पर्म बॅंक सुरू करण्यात आली होती, तेव्हा डोनरसाठी यापेक्षा कितीतरी जास्त काउंटची गरज लागत होती. आज तशी स्थिती शक्य नाही'.

ओपीडीमध्ये वाढली नव्या कपल्सची संख्या गुरूग्राममधील मेंदाता हॉस्पिटलचे यूरोलॉजी आणि रीनल केअर डिपार्टमेंटचे प्रोफेसर एमेरिटस डॉ. नर्मदा प्रसाद गुप्ता सांगतात की, 'गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या ओपीडीमध्ये अशा तरूणांची संख्या वेगाने वाढली, ज्यांना त्यांची फर्टिलिटी टेस्ट करायची असते.

डॉक्टर सांगतात की, आजही बाळ न होण्यासाठी महिलांना जबाबदार धरलं जातं. पण काही आकडेवारींनुसार, देशातील बाळ न होण्याच्या एकूण केसेसमध्ये पुरूष ४० टक्के या गोष्टीसाठी जबाबदार असतात, ४० टक्के महिला जबाबदार असतात, १० टक्के दोन्ही पार्टनरमुळे बाळ होत नाही, तर १० टक्के केसेसमध्ये कारणंच समोर येत नाही'.

English
हिंदी सारांश
Web Title : Men Secretly Taking Fertility Tests Before Marriage: Delicate Issue

Web Summary : Rising male infertility prompts pre-marital fertility tests. Couples proactively assess fertility, often revealing unexpected issues. Sperm counts are declining globally, impacting family planning. More men are seeking fertility evaluations, challenging assumptions about infertility causes.
टॅग्स : प्रेग्नंसीलग्नआरोग्य