Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Infertility > कोलेस्टेरॉल वाढलं तर कळतंही नाही, पाहा काय असतात बॅड कोलेस्टेरॉल वाढल्याचे काही घातक संकेत

कोलेस्टेरॉल वाढलं तर कळतंही नाही, पाहा काय असतात बॅड कोलेस्टेरॉल वाढल्याचे काही घातक संकेत

Cause of high Cholesterol : शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढलं की, हार्ट अ‍ॅटॅक आणि इतरही गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, जगभरात इस्केमिक हार्ट डिजीज आणि स्ट्रोकचं एक मोठं कारण कोलेस्टेरॉल वाढणं आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 10:17 IST2025-12-05T10:16:07+5:302025-12-05T10:17:29+5:30

Cause of high Cholesterol : शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढलं की, हार्ट अ‍ॅटॅक आणि इतरही गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, जगभरात इस्केमिक हार्ट डिजीज आणि स्ट्रोकचं एक मोठं कारण कोलेस्टेरॉल वाढणं आहे. 

Hidden symptoms of high cholesterol level | कोलेस्टेरॉल वाढलं तर कळतंही नाही, पाहा काय असतात बॅड कोलेस्टेरॉल वाढल्याचे काही घातक संकेत

कोलेस्टेरॉल वाढलं तर कळतंही नाही, पाहा काय असतात बॅड कोलेस्टेरॉल वाढल्याचे काही घातक संकेत

Cause of high Cholesterol : आजकाल लोक टेस्टच्या नादात असं काही खाऊ लागले आहेत की, हळूहळू त्यांचं आरोग्यही बिघडत चाललं आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे निर्माण होणारी गंभीर आणि जीवघेणी समस्या म्हणजे कोलेस्टेरॉल वाढणं. शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढलं की, हार्ट अ‍ॅटॅक आणि इतरही गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, जगभरात इस्केमिक हार्ट डिजीज आणि स्ट्रोकचं एक मोठं कारण कोलेस्टेरॉल वाढणं आहे. 

हार्वर्ड मेडिकल स्कूलनुसार, जर आपल्याला हाय कोलेस्टेरॉलमुळे हृदयासंबंधी रोगांचा धोका कमी करायचा असेल तर तुम्ही रेड मीट, तळलेले पदार्थ, प्रोसेस्ड मीट आणि बेक्ड पदार्थांचं सेवन कमी करावं लागेल. आश्चर्याची बाब म्हणजे लोक माहीत असून सुद्धा हे पदार्थ आवडीने खातात.

कशाने वाढतं कोलेस्टेरॉल?

रेड मीट

रेड मीटला नेहमीच कोलेस्टेरॉलसाठी धोकादायक मानलं जातं. हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांना नेहमीच रेड मीट न खाण्याचा सल्ला दिला जातो. एक्सपर्ट सांगतात की, तुम्ही मांस खाणं पूर्णपणे टाळलं पाहिजे. प्रोटीनसाठी त्याऐवजी तुम्ही दुसरे पदार्थ खाऊ शकता.

प्रोसेस्ड मीट

एक्सपर्ट कोलेस्टेरॉलच्या रूग्णांना प्रोसेस्ड फूड न खाण्याचाही सल्ला देतात. प्रोसेस्ड मीटमध्ये कोलेस्टेरॉल आणि सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण अधिक असतं. ज्यामुळे समस्या अधिक वाढू शकते. 

बेक्ड फूड

अनेक लोकांसाठी कुकीज आणि पेस्ट्री सर्वात स्वादिष्ट पदार्थ असतील. अनेकजण नाश्त्यात हे पदार्थ नियमितपणे खात असतील. एक्सपर्ट्सनी इशारा दिला आहे की, लोणी, शॉर्टिंग आणि शुगरचं अधिक प्रमाणात सेवन करणं मानवी शरीरासाठी चांगलं नाही. जर तुम्ही आधीच कोलेस्टेरॉलचे रूग्ण असाल तर तुम्ही हे पदार्थ पूर्णपणे टाळले पाहिजे.

फ्राइड फूड

बऱ्याच लोकांना कुरकुरीत तळलेले पदार्थ खाणं खूप आवडतं. तज्ज्ञांनी तळलेल्या पदार्थांबाबत इशारा दिला आहे. एक्सपर्ट सांगतात की, डीप फ्राय केल्याने पदार्थातील उर्जा घनत्व आणि कॅलरीचं प्रमाण वाढतं. तज्ज्ञ पदार्थ तळण्यासाठी एअर फ्रायर किंवा चांगलं तेल वापरण्याचा सल्ला देतात.

कोलेस्टेरॉल वाढल्याची लक्षणं

हाता-पायांना झिणझिण्या

कोलेस्टेरॉल शरीरातील रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करतं. त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढल्यावर नेहमी शरीरातील अवयवांमध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचत नाही. याकारणाने हाता-पायांना मुंग्या येणे, झिणझिण्या येणे अशा समस्या होतात. अनेकदा एकाच जागेवर फार जास्त वेळ बसल्यानेही हाता-पायांना झिणझिण्या येतात. पण केवळ एकाच जागेवर न बसताही तुम्हाला असे होत असेल तर तुमचं कोलेस्टेरॉल वाढलं असं समजा. त्यामुळे कोलेस्टेरॉल लेव्हल वेळीच तपासूण घ्यावे. 

डोकेदुखी

जर आपल्याला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल किंवा डोकं जड वाटत असेल तर वेळीच सावध व्हा. कारण हे वाढलेल्या कोलेस्टेरॉलचं लक्षण असू शकतं. कोलेस्टेरॉल वाढल्यावर डोक्यातील नसांना योग्य प्रमाणात रक्त पुरवठा होत नाही. त्यामुळे ही समस्या होते. याच कारणाने डोकेदुखी आणि चक्कर येणे अशा समस्या होतात. 

दम लागणे

जर थोडं काम केल्यानंतर किंवा मेहनत केल्यानंतर श्वास भरून येत असेल तर हे कोलेस्टेरॉल वाढल्याचा संकेत असू शकतात. श्वास भरुन येणे किंवा थकवा जाणवण्याची अनेक कारणं असू शकतात. पण असे होत असेल तर तुम्ही कोलेस्टेरॉलची टेस्ट करणं गरजेचे आहे. कोलेस्टेरॉल वाढल्याने जास्त काम न करताही थकवा जाणवतो. खासकरुन लठ्ठ लोकांमध्ये ही समस्या अधिक बघायला मिळते. 

लठ्ठपणा

जर तुम्हाला वाटतं असेल की विनाकारण तुमचं वजन वाढलं आहे, तर हा कोलेस्टेरॉल वाढण्याचा संकेत असू शकतो. त्यासोबतच तुम्हाला पोटात जड वाटत असेल किंवा नेहमीपेक्षा जास्त घाम येत असेल तर आणि गरम जाणवत असेल तर कोलेस्टेरॉल तपासून घ्यावा. 

छातीत दुखणे आणि अस्वस्थता

कोलेस्टेरॉल वाढल्याने मुख्यपणे हृदय रोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. त्यामुळे जर तुम्हाला छातीत वेदना होते असेल, अस्वस्थ वाटत असेल किंवा हृदयाचे ठोके प्रमाणापेक्षा जास्त होत असतील हा कोलेस्टेरॉल वाढण्याचा संकेत असू शकतो. याकडे दुर्लक्ष करणे जीवघेणं ठरु शकतं. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल. 

Web Title : उच्च कोलेस्ट्रॉल: मूक खतरा, चेतावनी संकेत और आहार ट्रिगर

Web Summary : उच्च कोलेस्ट्रॉल, अक्सर चुपचाप, हृदयघात का खतरा बढ़ाता है। लाल मांस, प्रसंस्कृत खाद्य पदार्थ, बेक्ड सामान और तले हुए आइटम कोलेस्ट्रॉल बढ़ाते हैं। लक्षणों में झुनझुनी, सिरदर्द, सांस फूलना, वजन बढ़ना और सीने में दर्द शामिल हैं। नियमित जांच और आहार परिवर्तन महत्वपूर्ण हैं।

Web Title : उच्च कोलेस्ट्रॉल: मूक खतरा, चेतावनी संकेत और आहार ट्रिगर

Web Summary : उच्च कोलेस्ट्रॉल, अक्सर चुपचाप, हृदयघात का खतरा बढ़ाता है। लाल मांस, प्रसंस्कृत खाद्य पदार्थ, बेक्ड सामान और तले हुए आइटम कोलेस्ट्रॉल बढ़ाते हैं। लक्षणों में झुनझुनी, सिरदर्द, सांस फूलना, वजन बढ़ना और सीने में दर्द शामिल हैं। नियमित जांच और आहार परिवर्तन महत्वपूर्ण हैं।

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.