lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Gynaecology Disorder > उन्हाळ्यात नाजूक जागेचं इन्फेक्शन वाढलं, व्हजायनल दुर्गंधीचा त्रास होतोय? इन्फेक्शन आणि आजार टाळायचा तर..

उन्हाळ्यात नाजूक जागेचं इन्फेक्शन वाढलं, व्हजायनल दुर्गंधीचा त्रास होतोय? इन्फेक्शन आणि आजार टाळायचा तर..

How to Get Rid of Vaginal Odors :

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 05:02 PM2023-04-07T17:02:42+5:302023-04-07T17:52:12+5:30

How to Get Rid of Vaginal Odors :

How to Get Rid of Vaginal Odors : 4 Tips will help you to manage your vaginal odor | उन्हाळ्यात नाजूक जागेचं इन्फेक्शन वाढलं, व्हजायनल दुर्गंधीचा त्रास होतोय? इन्फेक्शन आणि आजार टाळायचा तर..

उन्हाळ्यात नाजूक जागेचं इन्फेक्शन वाढलं, व्हजायनल दुर्गंधीचा त्रास होतोय? इन्फेक्शन आणि आजार टाळायचा तर..

योनीमार्ग अर्थात व्हजायनामधून व्हाइट डिसचार्ज होत असतोच. तिथं ओल असणं नाजूक जागेच्या आरोग्यासाठी गरजेचं असतो.  व्हजायनल टिश्यूंमधून निघणाऱ्या चिकट द्रवाला एक प्रकारचा दुर्गंध असतो. अनेकदा तो दुर्गंध वाढतोही. हे तसे नॉर्मल आहे त्यात काही आजार नाही. मात्र उन्हाळ्यात अनेक महिलांना वाटते की दुर्गंधी वाढली आहे. असे कशाने होते? सतत घाम आल्याने तो गंध वाढतो का, त्यानं इन्फेक्शन होण्याचा धोका असतो का हे समजून घ्यायला हवे.  (Tips to avoid vaginal odor) 

उन्हाळ्यात प्रायव्हेट पार्ट्सच्या बाबतीत केलेला निष्काळजीपणा मोठी समस्या निर्माण करू शकतो. अति घामामुळे योनिमध्ये इन्फेक्शन, रॅशेज येऊ शकतात. (How to Get Rid of Vaginal Odors) यामुळे व्हजायनल स्मेल येतो. डॉक्टर आस्था दयाल यांनी हेल्थ शॉट्सशी बोलताना उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची, प्रायव्हेट पार्ट्सना दुर्गंध येऊ नये म्हणून काय करायचं याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

1) व्हजायनल दुर्गंधीचे कारण शोधा

योनीतून जास्त वास असेल तर सर्वप्रथम त्याचे कारण शोधा कारण तुम्ही योनीच्या स्वच्छतेची काळजी घेत नसाल तर तुम्हाला इन्फेक्शन किंवा एलर्जी असू शकते. 

२) शक्य तितकी स्वच्छता ठेवा

व्हाजायनल हायजीनची खबरदारी घ्या. लैंगिक संबंधांनंतर लघवी करा. व्हजानल दुर्गंधीपासून वाचण्यासाठी सुंगधित, केमिकल्सयुक्त साबणाचा वापर करू नका. यामुळे पीएच लेव्हल असंतुलित होण्याचा धोका असतो. उन्हाळ्यात जास्त घाम येत असेल तर दिवसातून दोनदा अंडरगारमेंट बदलावे. शक्य असल्यास, रात्री अंडरगारमेंट घालणे टाळा, जेणेकरून योनीला श्वास घेण्याची संधी मिळेल. कपडे घालण्यापूर्वी योनी स्वच्छ कापडानं पुसून घ्या. 

३) घट्ट अंडरगारमेंट्स घालू नका

घट्ट अंडरगारमेंट्स घातल्यानं फ्लूएड आणि घाम व्हजायनाला चिकटून राहतो अशा स्थितीत जास्त घाम येतो. यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो. म्हणूनच नेहमी सैल आणि कॉटनचे कपडे घाला.

४) नारळाचं तेल आणि ट्रि टी ऑईल

जर उन्हाळ्याच्या दिवसात योनीतून जास्त दुर्गंध येत असेल तर तुम्ही कोकोनट आणि टी ट्री तेलाचा वापर करू शकता. यात एंटी फंगल तसेच एंटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. यामुळे बॅक्टेरिया, जर्म्स कमी होण्यास मदत होते.  पण हे तेल व्हजायनाच्या आत जाणार नाही याची काळजी घ्या

Web Title: How to Get Rid of Vaginal Odors : 4 Tips will help you to manage your vaginal odor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.