Lokmat Sakhi >Health > अपचन- गॅसेस- ॲसिडिटी-पोट फुगते? प्या ‘हा’ चहा, सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगतेय उपाय...

अपचन- गॅसेस- ॲसिडिटी-पोट फुगते? प्या ‘हा’ चहा, सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगतेय उपाय...

Celebrity Fitness Trainer Anshuka Parwani Recommends This Herbal Tea Remedy : Anti Bloting Tea Recipe : पोटफुगी, अपचन, गॅस, ॲसिडिटी यांसारख्या समस्यांवर घरगुती उपाय म्हणूंन पिऊन पाहा 'अँटी ब्लोटिंग चहा'....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2025 13:54 IST2025-06-16T13:49:13+5:302025-06-16T13:54:31+5:30

Celebrity Fitness Trainer Anshuka Parwani Recommends This Herbal Tea Remedy : Anti Bloting Tea Recipe : पोटफुगी, अपचन, गॅस, ॲसिडिटी यांसारख्या समस्यांवर घरगुती उपाय म्हणूंन पिऊन पाहा 'अँटी ब्लोटिंग चहा'....

Celebrity Fitness Trainer Anshuka Parwani Recommends This Herbal Tea Remedy Anti Bloting Tea Recipe | अपचन- गॅसेस- ॲसिडिटी-पोट फुगते? प्या ‘हा’ चहा, सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगतेय उपाय...

अपचन- गॅसेस- ॲसिडिटी-पोट फुगते? प्या ‘हा’ चहा, सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगतेय उपाय...

अपचन, गॅस, ॲसिडिटी अशा पचनाशी संबंधित तक्रारी आजकाल अगदी कॉमन झाल्या आहेत. आपल्यापैकी बऱ्याचजणांना वरचेवर पचनाशी संबंधित अनेक समस्या त्रास देतात. बदलती लाईफस्टाईल, चुकीच्या आहाराच्या सवयी, तणाव आणि झोपेचा अभाव यांसारख्या अनेक कारणांमुळे या समस्या वाढत आहेत. सतत  होणाऱ्या या पचनाशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी आपण गोळ्या वेगवेगळ्या प्रकारचे सिरप घेतो, या उपायांमुळे आपल्याला अगदी काही वेळात (Anshuka Parwani Celebrity Fitness Trainer) चटकन बर वाटत. परंतु या त्रासांवर तात्पुरते नव्हे तर नैसर्गिक आणि घरगुती उपाय शोधणं महत्त्वाचं ठरतं. आयुर्वेदात अशा पचनाच्या तक्रारी दूर करणारे अनेक घरगुती उपाय सांगितले आहेत. त्यापैकी ‘काढा’ हा एक अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो. स्वयंपाकघरातील सहज उपलब्ध साहित्यांपासून तयार होणारा हा काढा पचन सुधारतो, गॅस व ॲसिडिटी कमी करतो आणि पोट हलकं व आरामदायक वाटण्यासाठी मदत करतो(Celebrity Fitness Trainer Anshuka Parwani Recommends  Anti Bloting Tea Recipe).

सुप्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी हीने नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोटफुगी, अपचन, गॅस, ॲसिडिटी यांसारख्या समस्यांवर घरगुती उपाय म्हणूंन अँटी ब्लोटिंग  चहाची रेसिपी शेअर केली आहे. स्वतः अंशुका देखील पोटफुगी, अपचन, गॅस, ॲसिडिटी झाल्यास हाच औषधी आणि आयुर्वेदिक चहा पीत असल्याचे तिने सांगितले आहे. नेमकी काय आहे या चहाची सिक्रेट रेसिपी ते पाहूयात.

साहित्य :- 

१. आल्याचा तुकडा - १ इंचाचा छोटा तुकडा 
२. दालचिनी - १ 
३. सुंठ पावडर - १/२ टेबलस्पून 
४. तुळशीची पाने - ४ ते ५ पाने 
५. काळीमिरी पूड - १/२ टेबलस्पून 
६. ओरेगॅनो पावडर - १/२ टेबलस्पून 
७. वेलची - ३ ते ४ (बारीक पूड) 
८. लसूण पाकळ्या - २ पाकळ्या 
९. बडीशेप - १ टेबलस्पून 
१०. ओवा - १/२ टेबलस्पून 
११. हळद - १/२ टेबलस्पून 
१२. मध - १ टेबलस्पून 
१३. पाणी - १ ग्लास 

गरोदरपणात कियारा अडवाणीच्या चेहऱ्यावर तेज, आरोग्यासाठी ‘या’ सवयी गरोदरपणातही लाख मोलाच्या...

व्यायामाला वेळ नाही? महिलांनो, 'या' ३ पद्धतीने रोज चाला-लोक विचारतील वजन कमी करण्याचं सिक्रेट...

कृती :- 

अपचन, गॅस, ॲसिडिटी, ब्लॉटिंग होऊ नये यासाठी हा घरगुती काढा तयार करण्यासाठी सर्वातआधी एका भांड्यात पाणी घ्यावे. हे पाणी हलके गरम करून घ्यावे. या गरम पाण्यांत सगळे जिन्नस एकत्रित घालावे. सगळे जिन्नस पाण्यांत घातल्यानंतर, चमच्याच्या मदतीने हे पाणी हलवून घ्यावे. आता हे पाणी २ ते ५ मिनिटे गॅसच्या मंद आचेवर ठेवून त्याला हलकी उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यानंतर गॅस बंद करून हे तयार पाणी गाळणीच्या मदतीने गाळून घ्यावे. हे पाणी पिण्यासाठी तयार आहे.


Web Title: Celebrity Fitness Trainer Anshuka Parwani Recommends This Herbal Tea Remedy Anti Bloting Tea Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.